Join us   

अचानक ब्लडप्रेशर वाढलं तर काय कराल? डॉक्टर सांगतात १ व्यायाम ६ सेकंद करा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 11:39 AM

Blood Pressure Control Tips : या समस्येकडे लक्ष दिले नाही तर हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची समस्या वाढते.

गरजेपेक्षा जास्त ताण-तणाव आणि चिंता केल्याने ब्लड प्रेशर (Blood Pressure) वाढण्याची समस्या उद्भवते. याव्यतिरिक्त लाईफस्टाईलमध्ये प्रोसेस्डे फूड, जंक फूड, पॅकेज्ड फूड खाल्ल्यामुळे शरीरातील मिठाचे प्रमाण वाढते. हाय ब्लड प्रेशर हे त्याचे सगळ्यात मोठे कारण आहे. (How To Control Blood Pressure)  वेळीच या समस्येकडे लक्ष दिले नाही तर हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची समस्या वाढते. (How To Manage High Blood Pressure)

जर तुमचंही ब्लड प्रेशर  हाय होत असेल तर एक सोपा व्यायाम करून तुम्ही बीपी कंट्रोलमध्ये ठेवू शकता. हेल्थ एक्सपर्ट्स डॉ. एंडी गॅल्पिन यांनी एका व्यायामाबद्दल सांगितले आहे.  ज्यामुळे हाय बीपीच्या समस्येपासून सुटका मिळवता येते. (Lower Your Blood Pressure With This Simple Exercise Told By Doctor) मायो क्लिनिकच्या रिपोर्टनुसार रोज व्यायाम करा, हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करा, आहारात मीठाचे प्रमाण कमी असावे, मद्यपान-धुम्रपान करू नका. रात्री चांगली झोप घ्या. ताण-तणाव येणार नाही याची काळजी घ्या. 

हाय बीपीसाठी हॅण्ड ग्रिप व्यायाम

ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी एक्सपर्ट्सनी हॅण्ड ग्रिप व्यायामाबाबत सांगितले आहे. साधारणपणे हॅण्ड ग्रिपचा वापर केल्याने एथलीट  बोटं मजबूत होतात. याचा वापर  कोणत्याही वयातील व्यक्तीसाठी खूपच सोपा असतो.  हा व्यायाम करण्यासाठी सगळ्यात आधी पूर्णपणे रिलॅक्स व्हा,  नंतर डाव्या हातात ग्रिप किंवा डायनमोमीटर पकडून दाबून घ्या. कमीत कमी  6 सेकंद ही टाईट ग्रिप करून ठेवा नंतर सोडून द्या. काही आठवडे 8 ते 12 वेळा हा उपाय केल्याने तब्येत चांगली राहील.

ब्लड प्रेशर कसे कमी करावे

1) हॅण्ड ग्रिप व्यायाम केल्याने ब्लड वेसल्समध्ये ब्लड फ्लो वेगाने होते. या कारणामुळे ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टिम उत्तम पद्धतीने कार्य करते. ज्यामुळे हृदयाचे ठोके, ब्लड प्रेशर, ब्लड वेसल्स नियंत्रणात राहतात. 

2) बीपी कमी करण्यासाठी व्यायाम नियमित करून डॉक्टरांनी सांगितलेली औषध घ्या. डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधं घेणं बंद करू नका अन्यथा समस्या वाढू शकतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल