जोपर्यंत कोणताही आजार होत नाही तोपर्यंत आपण बरे आहोत असं प्रत्येकालाच वाटत असतं. गुडघ्यांच्या बाबतही हे लागू होते. आजकाल सांधेदुखी, गुडघेदुखीची समस्या वाढली आहे. लोक आपल्या गुडघ्यांच्या दुखण्यासाठी मोठ्मोठ्या डॉक्टरांकडे जातात पण पायांच्या दुखण्यात तात्पुरता फरक पडतो नंतर पुन्हा वेदना जाणवू लागतात. गुडघ्यांमध्ये जाणवणाऱ्या वेदना आणि सूज टाळण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पती आणि प्रसिद्ध कार्डीयाक, वॅस्कुलर सर्जन डॉ. श्री राम नेने यांनी युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून फॅन्सना गुडघे चांगले ठेवण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. (5 tips to avoid knee and joint pain).
गुडघे शरीराचा ८० टक्के भार उचलतात
डॉ. नेने सांगतात की आपल्या पूर्ण जीवनकाळात ८० टक्के शरीराचा भार गुडघ्यांवर पडतो. फक्त चढण्या उतरण्यसाठीच नाही तर चालताना, वाकताना, उड्या मारताना, नाचताना वस्तू वर उचलताना गुडघ्यांचाच आधार घ्यावा लागतो. भारतातच नाही तर विदेशातही लोकांना गुडघ्याचं दुखणं उद्भवणं खूपच सामान्य आहे. अनेक देशांमध्ये नी रिप्लेसमेंट सर्जरी केली जाते. प्रत्येकालाच ऑपरेशनची आवश्यकता असतेच असं नाही. जर तुम्हाला गुडघ्यांची वेळीच काळजी घेतली तर सर्जरीची आवश्यकता नसेल.
गुडघ्यांना बळकट कसं बनवायचं?
१) गुडघे चांगले राहण्यासाठी व्यायाम करायला हवा. व्यायाम सुरू करण्याआधी स्ट्रेचिंग जरूर करा. हलक्या फुलक्या व्यायामानं सुरूवात करा, पोहणे, सायकल चालवणं, पायी चालणं, छोटं-मोठं सामान उचलणे हे व्यायाम तुम्ही करू शकता. गुडघे आणि कोअर मांसपेशी मजबूत करण्यासाठी तुम्ही वेट लिफ्टींग, लंजेस करू शकता.
२) वॉर्मअप करण्याआधी ५ ते ६ मिनिटं ट्रेडमिलवर चाला. कोणत्याही प्रकारचा व्यायाम करताना घाई करू नका. हळूहळू व्यायामाला सुरूवात करा.
३) जर तुमचं वजन जास्त असेल विशेषत: गुडघ्यांवर जास्त प्रेशर येईल. फॅट असे केमिकल्स रिलिज करते ज्यामुळे सूज वाढते आणि गुठळ्या होतात.
४) जॉगिंग, फूटबॉल आणि बास्केटबॉल यांसारख्या हाय इंपॅक्ट एक्टिव्हिटीज पटकन करू नका. जेव्हा तुम्ही रोज वेगानं चालता तेव्हा जखम होण्याचा धोका असतो. समस्या वाढल्सास नी कॅप घाला.
५) योग्य आकाराचे शूज स्वत:साठी निवडा. ज्या महिला हिल्सची सॅण्डल घालतात त्यांच्या पायांवर. गुडघ्यांवर अधिक तणाव येतो. उभं राहतानाही बॉडी पोश्चर योग्य ठेवा.