Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > बॅड कोलेस्टेरॉल वाढवणारे ३ पांढरे पदार्थ, कितीही चमचमीत असले तरी पोटात गेले की छळणारच..

बॅड कोलेस्टेरॉल वाढवणारे ३ पांढरे पदार्थ, कितीही चमचमीत असले तरी पोटात गेले की छळणारच..

Maida, Mayonnaise and Makhana - Cholesterol Causing Foods बॅड कोलेस्टेरॉल वाढणं तब्येतीसाठी घातक, त्यामुळे ते वाढवणाऱ्या गोष्टी आहारातूनच बंद करणं सोपं आणि सोयीचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2023 06:43 PM2023-05-15T18:43:09+5:302023-05-15T18:43:59+5:30

Maida, Mayonnaise and Makhana - Cholesterol Causing Foods बॅड कोलेस्टेरॉल वाढणं तब्येतीसाठी घातक, त्यामुळे ते वाढवणाऱ्या गोष्टी आहारातूनच बंद करणं सोपं आणि सोयीचं

Maida, Mayonnaise and Makhana - Cholesterol Causing Foods | बॅड कोलेस्टेरॉल वाढवणारे ३ पांढरे पदार्थ, कितीही चमचमीत असले तरी पोटात गेले की छळणारच..

बॅड कोलेस्टेरॉल वाढवणारे ३ पांढरे पदार्थ, कितीही चमचमीत असले तरी पोटात गेले की छळणारच..

कोलेस्टेरॉल वाढणे आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. लोकांमध्ये ही समस्या वाढत चालली आहे. ज्यामुळे शरीरात जीवघेण्या आजारांचा धोका वाढतो. कोलेस्टेरॉल दोन प्रकारचे असतात. एलडीएल कोलेस्टेरॉल याला वाईट कोलेस्टेरॉल देखील म्हणतात, जे आरोग्यावर गंभीर परिणाम करते. तर, एचडीएल कोलेस्टेरॉल शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक आहे. कोलेस्टेरॉल अनेक कारणांमुळे वाढते. मुख्य म्हणजे चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने वाईट कोलेस्टेरॉल शरीरात वाढते. ज्यात ३ पांढऱ्या पदार्थांचा देखील समावेश आहे.

लोणी, मैदा आणि मेयोनीज़ या तीन पदार्थांचे सेवन सध्या वाढत चालले आहे. जे चवीला अप्रतिम लागतात. परंतू, आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. या पदार्थांच्या अतिसेवनामुळे वाईट कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. जे थेट रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन जमा होते. ज्यामुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो(Maida, Mayonnaise and Makhana - Cholesterol Causing Foods).

मेदांता हॉस्पिटलमधील व्हॅस्कुलर सर्जरीचे अध्यक्ष डॉ. राजीव प्रकाश यांच्या मते, ''या ३ पांढऱ्या पदार्थात चरबी असते, जे हृदयाच्या नसांमध्ये जमा होते. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. यासह स्ट्रोकची समस्या देखील निर्माण होते. जर आपल्याला कोलेस्टेरॉल व आरोग्याच्या समस्या टाळायच्या असतील तर, या पांढऱ्या गोष्टींचे सेवन कमी करा किंवा खाणे टाळा.''

मैदा

मैदा रिफायनिंग करून बनवला जातो, ज्यामुळे त्यातील सर्व पोषक तत्व संपतात. मैदाच्या अतिसेवनामुळे खराब कोलेस्टेरॉल वाढते. ज्यामुळे लठ्ठपणा, रक्तवाहिन्या ब्लॉक होणे, रक्तदाब वाढणे, रक्तातील साखर वाढणे, अशा गंभीर समस्या निर्माण होतात.

लोणी

लोणी आपल्या पदार्थाची चव दुप्पट करू शकते. पण यातील सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक मानले जाते. यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढू शकते.

मेयोनीज

आजकाल लोकांमध्ये मेयोनीजची क्रेझ वाढत चालली आहे. पिझ्झापासून बर्गरपर्यंत प्रत्येक पदार्थात मेयोनीजचा समावेश असतो. याचा अधिकतर फास्ट फूडमध्ये वापर होतो. मेयोनीजमध्ये अधिक प्रमाणावर फॅट असते. ज्यामुळे खराब कोलेस्टेरॉल वाढते.

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी खा हे पदार्थ

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात हेल्दी आणि लो फॅटयुक्त पदार्थांचा समावेश करा. आपल्या आहारात ओट्स, धान्य, सोयाबीन, भेंडी, वांगी, फळे, नट, सोया, आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा, व बाहेरचं खाणं टाळा.

Web Title: Maida, Mayonnaise and Makhana - Cholesterol Causing Foods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.