मकर संक्रातीच्या (Makar Sankranti 2024) दिवशी तीळ-गूळ (TilGul) घराघरांत खाल्ले जातात. शरीराला उष्णता देण्याचे काम तीळ करतात. हिवाळ्याच्या दिवसात चमचाभर तिळ खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहू शकता. (Makar Sankranti Special Food) सतत आजारी पडणं, वयस्कर झाल्यानंतर उद्भवणाऱ्या समस्या टाळण्यासाठी फायदेशीर ठरते. तिळाचे तेलही अनेक दृष्ट्या फायदेशीर ठरते. (Eating Sesame Seeds Benefits)
आयुर्वेदानुसार तिळात उष्णता असते. ज्यामुळे पोटातील पचन अग्नी वाढतो. (Til khanyache fayde) रक्तात उष्णता टिकून राहते. तिळाची चिक्की, लाडू, तिळाची भाकरी, तिळाची बर्फी अशा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये तुम्ही वापरू शकता. मंकर संक्रांतीला अशा पदार्थांचा सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. (Amazing Benefits Of Consuming Sesame Seeds)
1) पचनक्रिया चांगली राहते (Good For Digestion)
हिवाळ्यात पचनक्रिया संथ होते. ज्यामुळे गॅस, अपचनाच्या समस्या उद्भवचतात. तिळ खाल्ल्याने फायबर्स मिळतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि पोट साफ होण्यासही मदत होते. रिसर्च गेटवर प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार तिळाच्या बिया खाल्ल्याने बरेच फायदे मिळतात.
अंगदुखी-अशक्तपणा-कॅल्शियम कमी झालं? रामदेव बाबा सांगतात ५ उपाय, हाडं होतील बळकट
2) नसांमधून घातक पदार्थ बाहेर निघतात (Body Detox
एलडीएल कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईडला अपशिष्ट पदार्थ असं म्हटलं जातं. ज्यामुळे नसांधील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. सिसम सिड्समध्ये हेल्दी फॅट्स असतात. ज्यामुळे आजार उद्भवत नाहीत.
3) मसल्समध्ये ताकद येते (Muscles Strenth)
हेल्दी राहण्यसाठी प्लांट प्रोटीन गरजेचे असते. यामुळे हाडं आणि मसल्सही चांगली राहतात. तिळाच्या बियांमध्ये प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे मसल्स ग्रोथ चांगली होते. हॉर्मोन्सचे उत्पादन चांगले होते. हे एक मॅक्रोन्युट्रिएंट असून यामुळे त्वचा आणि केस चांगले राहण्यास मदत होते.
भरपूर प्रोटीन असलेले ५ स्वस्त पदार्थ खा; तिशीतही दिसाल तरुण आणि फ्रेश कायम
4) व्हिटामीन बी-12 मिळते (Vitamin B-12)
तिळात व्हिटामीन बी असते. ज्यातून बी१, बी२, बी६ मिळते. यातील पोषक तत्व शरीराला निरोगी ठेवतात. व्हिटामीन बी च्या कमतरतेमुळे शारीरिक कमजोरीसुद्धा येऊ शकते. याशिवाय तीळ खाल्ल्याने रक्ताची कमतरता दूर होते, ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं आणि आर्थरायटिसच्या वेदनाही दूर होतात.
5) सूज कमी होते (Inflammation)
इंफ्लामेशनकडे कधीच दुर्लक्ष करू नये. आतील सूज लठ्ठपणापासून ते कॅन्सरचं कारण ठरू शकते. यात सिड्स एंटी ऑक्सिडंट्स आणि एंटी इंफ्लामेटरी गुण असतात. ज्यामुळे इंफ्लामेशन कमी होते.