चेहरा डल वाटू नये, काळेपणा दूर व्हावा यासाठी अनेक मुली चेहऱ्याला कॉम्पॅक्ट पावडर लावतात.कॉम्पॅक्ट पावडर चेहऱ्याला लावल्याने बरेच फायदे मिळतात. चेहरा आपल्या स्किन टोनपेक्षा अधिकच उजळदार दिसतो. (How To Make Compact Powder At Home) केमिकल्सयुक्त पावडर रोज चेहऱ्याला लावल्यानं त्वचेवर डाग पडतात किंवा त्वचा खराब दिसू लागते. घरच्याघरी कॉम्पॅक्ट पावडर बनवणं अगदी सोपं आहे ही पावडर चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावर मस्त तेज येईल. (Make compact powder at home for Rs 10)
सगळ्यात आधी एका वाटीत पावडर घ्या, त्यात ब्रु कॉफी पावडर घाला, त्यात थोडं पाणी घाला. त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण एकत्र करून घ्या. हे मिश्रण वाटीत पसरवून घ्या. पूर्ण सुकल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण काढून घ्या, कॉम्पॅक्ट पावडर तयार आहे. सुकल्यानंतर एका डब्यात ही पावडर भरा. स्पंजच्या साहाय्याने ही पावडर तुम्ही चेहऱ्याला लावू शकता.
जर तुम्ही मेकअप बिनिगर असाल आणि तुम्हाला वाटत असेल की फाऊंडेशन वेगवेगळ्या पद्धतीने लावता येतं अशा स्थिती कॉम्पॅक्ट पावडरचा वापर उत्तम ठरेल. फाऊंडेशन लावल्यानंतर त्वचेवर फेस पावडर लावा. ज्यामुळे फाऊंडेशनला फिनिशिंग मिळेल आणि इव्हन लूक देणयास मदत होईल.
फेस पावडर कॉम्पॅक्ट पावडरची एक खासियत असते की सेटिंग पावडरच्या स्वरूपात तुम्ही याचा वापर करू शकता. जर चेहऱ्यावर जास्त तेल आलं असेल किंवा चेहरा जास्त तेलकट झाला असेल तर तुम्ही चेहऱ्यावर थोडं कॉम्पॅक्ट पावडर लावू शकता. ज्यामुळे तुमच्या त्वचेला रिफ्रेशिंग लूक मिळेल.
एका दिवसाला किती तूप खावं? आहारतज्ज्ञ रुजूता दिवेकर सांगतात तूप खाण्याची योग्य पद्धत-पाहा
कॉम्पॅक्ट पावडर नॉर्मल किंवा तेलकट स्किन असलेल्या महिला लावतात तुमची त्वचा कोरडी असले तर तुम्ही याचा वापर करू सकता. यासाठी स्किनवर मॉईश्चरायजर लावणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर अतिरिक्त मॉईश्चरायजर टिश्यू पेपरच्या मदतीने काढून टाका.
ना औषध, ना गोळी-शरीरातलं रक्त वाढवतील ५ पदार्थ; रोज खा, नसानसांत वाढेल हिमोग्लोबिन
कॉम्पॅक्ट पावडरने तुमचा लूक अधिकच सुंदर दिसेल. कॉम्पॅक्ट पावडर किंवा फेस पावडर स्किला स्मूद लूक देते. तुम्ही कमीत कमी प्रमाणात हे वापरा. जास्त कॉम्पॅक्ट पावडर वापरल्याने त्वचा कोरडी होणार नाही आणि चेहऱ्यावर क्रॅक्स येऊ लागतील.