Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दोनदा ब्रश केला तरी किडतील दात, ५ नैसर्गिक गोष्टींनी घरीच बनवा उत्तम माउथवाॅश- सांभाळा तोंडाचे आरोग्य

दोनदा ब्रश केला तरी किडतील दात, ५ नैसर्गिक गोष्टींनी घरीच बनवा उत्तम माउथवाॅश- सांभाळा तोंडाचे आरोग्य

मौखिक आरोग्यासाठी दोन वेळेसच्या ब्रशसोबतच माउथवाॅश (mouthwash) करणंही गरजेचं असतं. बाहेर मेडिकलमध्ये माउथवाॅश मिळत असले तरी मीठ, कोरफड, बेकिंग सोडा आणि खोबरेल तेल यांच्या सहाय्यानं घरच्याघरी (homemade mouthwash) स्वस्तात मस्त आणि प्रभावी माउथवाॅश तयार करता येतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2022 08:05 AM2022-08-23T08:05:56+5:302022-08-23T16:37:31+5:30

मौखिक आरोग्यासाठी दोन वेळेसच्या ब्रशसोबतच माउथवाॅश (mouthwash) करणंही गरजेचं असतं. बाहेर मेडिकलमध्ये माउथवाॅश मिळत असले तरी मीठ, कोरफड, बेकिंग सोडा आणि खोबरेल तेल यांच्या सहाय्यानं घरच्याघरी (homemade mouthwash) स्वस्तात मस्त आणि प्रभावी माउथवाॅश तयार करता येतात.

Make Mouthwash at home. Natural mouthwash with kitchen ingredients. | दोनदा ब्रश केला तरी किडतील दात, ५ नैसर्गिक गोष्टींनी घरीच बनवा उत्तम माउथवाॅश- सांभाळा तोंडाचे आरोग्य

दोनदा ब्रश केला तरी किडतील दात, ५ नैसर्गिक गोष्टींनी घरीच बनवा उत्तम माउथवाॅश- सांभाळा तोंडाचे आरोग्य

Highlightsरात्री जेवणानंतर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या अवश्य कराव्यात.कोरफड माउथवाॅश वापरल्यानं तोंडात ताजेपणा राहातो.चहा किंवा इतर पेयांमुळे तोंडात निर्माण होणारे हानीकारक जिवाणू बेकिंग सोड्यामुळे रोखले जातात.खोबरेल तेलाच्या माउथवाॅशद्वारे दात किडण्याचा धोका टाळता येतो.

आरोग्याची काळजी घेताना मौखिक स्वच्छता (oral healh care)  पाळणं महत्वाचं असतं. त्यासाठी केवळ दोन वेळा ब्रश करणं पुरेसं नाही. मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यास तोंडात हानिकारक जिवाणू तयार होतात. यामुळे दात आणि हिरड्यांचं आरोग्य बिघडतं. मौखिक आरोग्य सांभाळण्यासाठी ब्रश करण्यासोबतच थोडी अधिक काळजी घेणं आवश्यक असतं . त्यासाठी माउथवाॅश (mouthwash)  वापरणं गरजेचं असतं. हे माउथवाॅश मेडिकलमध्ये मिळत असले तरी घरातल्या नैसर्गिक घटकांचा वापर करुन  घरच्याघरी प्रभावी माउथवाॅश स्वस्तात (  home made mouthwash with kitchen ingredients ) तयार करता येतं. मीठ, कोरफड, बेकिंग सोडा, खोबऱ्याचं तेल या चार गोष्टींनी माउथवाॅश तयार करता येतं. 

Image: Google

घरच्याघरी माउथवाॅश

1. मिठाच्या पाण्याचा माउथवाॅश

ब्रश केल्यानंतर किंवा खाऊन झाल्यानंतर मिठाच्या पाण्यानं गुळणी करणं फायदेशीर ठरतं. मिठाच्या पाण्यानं गुळणी केल्यानं तोंडातील हानिकारक जिवाणू बाहेर पडतात. तोंडात दीर्घकाळापर्यंत ताजेपणा जाणवतो. काही खाल्ल्यानंतरच नाही तर सकाळी उठल्यानंतरही मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करता येतात. मौखिक आरोग्यासाठी मिठाच्या पाण्याच्या गुळण्या फायदेशीर असतात. मिठाच्या पाण्याचं माउथवाॅश करण्यासाठी अर्ध्या ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून ते चांगलं हलवून घ्यावं. या पाण्यानं तीन चार वेळा चूळ भरुन गुळण्या कराव्यात. रात्री जेवणानंतर तर अवश्य मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. 

Image: Google

2. कोरफड माउथवाॅश

कोरफडमुळे तोंडात ताजेपणा राहातो. दात किडणाऱ्या जिवाणुंचा प्रसार रोखला जातो. कोरफड माउथवाॅशद्वारे हिरड्यातून होणारा रक्तस्त्राव रोखला जातो. यासाठी अर्ध्या  ग्लास  पाण्यामध्ये अर्धा ग्लास कोरफडचा ज्यूस घालून तो पाण्यात चांगला एकजीव करावा. सकाळी ब्रश केल्यानंतर या पाण्यानं गुळण्या कराव्यात. 

Image: Google

3. बेकिंग सोडा माउथवाॅश

'नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन' द्वारे प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात दातांच्या आरोग्यासाठी बेकिंग सोडा फायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. बेकिंग सोडा हा दातांवरील नैसर्गिक उपचाराचा भाग मानला जातो. चहा किंवा इतर पेयांमुळे तोंडात निर्माण होणारे हानीकारक जिवाणू बेकिंग सोड्यामुळे रोखले जातात. बेकिंग सोड्याचं माउथवाॅश तयार करण्यासाठी एक ग्लास गरम पाण्याततार्धा चमचा बेकिंग सोडा घालावा. बेकिंग सोडा पाण्यात पूर्ण विरघळेपर्यंत पाणी हलवावं. या पाण्यानं नंतर गुळण्या कराव्यात. सकाळी ब्रश केल्यानंतर बेकिंग सोड्याचा माउथवाॅश वापरावा.

Image: Google

4. खोबरेल तेलाचं माउथवाॅश

खोबरेल तेलामुळे हिरड्या, दातातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. खोबरेल तेलाच्या माउथवाॅशद्वारे दात किडण्याचा धोका टाळता येतो. दात स्वच्छ तर होतातच शिवाय दातांवर नैसर्गिक चमक येते. खोबरेल तेलाचा माउथवाॅश तयार करण्यासाठी थोडं खोबरेल तेल घ्यावं. ते दातांना आणि हिरड्यांना बोटाच्या सहाय्यानं व्यवस्थित लावावं.  5 मिनिट खोबरेल तेलानं दात आणि हिरड्या घासल्यानंतर साध्या पाण्यानं गुळण्या कराव्यात. 

Web Title: Make Mouthwash at home. Natural mouthwash with kitchen ingredients.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.