मखाने (Makhana) खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. यात अनेक महत्वाची पोषक तत्व असतात जे अनेक आजारांसाठी फायदेशीर ठरते. जे लोक गुडघेदुखीच्या वेदनेनं त्रस्त आहेत त्यांनी मखान्यांमध्ये काही पदार्थ मिसळून खाल्ले तर तब्येत चांगली राहण्यास मदत होते. मखान्यांमध्ये गूळ, बडिशेप, तीळ घालून तुम्ही गुडघेदुखीच्या वेदना दूर करू शकता. याचे अनेक फायदे आहेत. (Makahana Health Benefits) गुडघ्याच्या वेदनांपासून त्रस्त असलेले लोक काही घरगुती उपाय करून गुडघ्याच्या समस्यांपासून आराम मिळवू शकता. ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. (Makhana Eating Benefits)
अमाला इर्थच्या रिपोर्टनुसार प्रत्येकी 100 ग्रॅम मखान्यांमध्ये 9.7 ग्रॅम प्रोटीन असते. फायबर्स 14.5 ग्रॅम असतात, कॅल्शियम 60 ग्रॅम असतात आयर्नचे प्रमाण 1.4 ग्रॅम इतके असते, कार्बोहायड्रेट्स 76.9 ग्रॅम असतात. मखाने खाल्ल्याने ८ फायदे मिळतात जसं की वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं, एजिंग प्रोसेस मंदावते, इफ्लामेशन उद्भवत नाही, हृदयाचे आरोग्य चांगले राहते, आर्थरायटिसचा त्रास उद्भवत नाही, किडनीचे आरोग्य चांगले राहते आणि फर्टिलिटीसुद्धा वाढते. (Makhana Home Remedies For Knee Pain)
मखाने कसे करायचे? (How To Make Makhana)
१) मखाने - ३ कप
२) गुळ - १ कप (गरजेनुसार)
३) बडिशेप - १ चमचे
४) तीळ - १ चमचा
५) बेकींग पावडर - १ टिस्पून
६) काळं मीठ - १ टिस्पून
७) साजूक तूप - १ टेबलस्पून
८) पाणी- गरजेनुसार
गुडघे आणि सांध्यांच्या वेदना दूर करण्यासाठी तुम्ही हा घरगुती उपाय करू शकता. यासाठी सगळ्यात आधी १ नॉनस्टिक पॅन घ्या नंतर १ चमचा साजूक तूप घाला त्यानंतर मध्यम आचेवर गरम करा. जेव्हा तूप वितळेल तेव्हा त्यात मखाने घाला. नंतर एक मिनिटं चमच्यानं ढवळत राहा मग मखाने रोस्ट करा. नंतर मखाने एका बाऊलमध्ये घालून वेगळे ठेवा.
नंतर पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घाला त्यानंतर गुळाचे तुकडे घालून वितळेपर्यंत ढवळत राहा. नंतर गुळ वितळू लागेल तेव्हा २ टेबलस्पून पाणी घालून शिजवा. गुळ जेव्हा पूर्णपणे वितळेल तेव्हा त्यात बडिशेप, काळं मीठ आणि चुटकीभर बेकिंग सोडा घाला नंतर चमच्यानं व्यवस्थित मिक्स करा.
कायम गळतात-केस पातळ झाले? चमचाभर बियांचा खास घरगुती उपाय करा-लांब, दाट होतील केस
कढईत एक चमचा तीळ घाला. नंतर फ्राय केलेले मखाने पॅनमध्ये घालून गुळाबरोबर व्यवस्थित मिक्स करा. हे मिश्रण नंतर एक मिनिटं शिजू द्या त्यानंतर गॅस बंद करा. गुडघ्यांच्या वेदना कमी करण्यासाठी मखान्यांसाठी तुम्ही होम रेमेडी बनून तयार असेल. एक एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करा.
घरगुती उपाय करण्याची योग्य पद्धत (Makhana Good For Knee Pain)
सांधेदुखीच्या वेदनांपासून त्रस्त असाल तर मखान्यांचा हा उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. हा उपाय करण्यासाठी घरगुती उपाय करण्यासाठी रोज ५ ते ७ मखाने घेऊन संध्याकाळी दुधाबरोबर घेऊ शकता. हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला फरक दिसून येईल.