Join us   

पन्नाशीतही विशीप्रमाणे तरूण दिसाल; मलायका करते ती ५ योगासनं तुम्हीही घरीच करा, फिट राहा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2023 1:19 PM

Malaika Arora Fitness Tips : वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही ती तितकीच फिट आणि सुंदर दिसते. 

मलायका अरोरा आपल्या डान्सव्यतिरिक्त फिटनेसमुळेही बरीच चर्चेत असते. (Malaika Arora's diet and fitness plan) ती जिथेही जाते तिकडे तिथे फॅन्स येऊन पोहोचतात. मलायकाच्या जिम लूकचे आणि व्यायामाचे व्हिडिओज, फोटोज सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत असतात. (Malaika Arora Fitness Tips) 

मलायकाचं वय ४८ वर्ष असून तिचा फिटनेस पंचविशीतील तरूणीप्रमाणे आहे. (What Is Malaika Arora's Fitness Secret) मलायकाचे फॅन्स नेहमीच तिच्या फिट, टोन्ड बॉडीचे कौतुक करतात. मलायका स्ट्रिक्ट डाएट फॉलो करण्याबरोबरच रोज योगा, व्यायामही करते. वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही ती तितकीच फिट आणि सुंदर दिसते. (How to Look Yonger in Age of 48) 

1) नौकासन

हे आसन केल्याने पोटाचे स्नायू मजबूत होतात आणि मांसपेशीसुद्धा चांगल्या राहतात. याशिवाय बॅक मसल्स टोन्ड होतात. हे आसन केल्यानं कंबरेचे, पाठीचे दुखणे कमी होण्यास मदत होते आणि वाढत्या वयात कंबरेचे दुखणे उद्भवत नाही.

2) उत्कटासन

चेअर पोजच्या स्वरूपात हे आसन केले जाते. हे आसन शरीराच्या विविध मांसपेशींना स्ट्राँग करते. पाठीच्या खालच्या भागाला तसंच कोअर मसल्सना मजबूत करण्यासही मदत करते. ही पोज खुर्चीवर बसल्याप्रमाणे असते. 

3) नटराजासन

या आसनाला नर्तक मुद्रा असंही म्हटलं जातं. हे योगासन शरीराचे संतुलन चांगले ठेवते आणि शरीर लवचीक बनवते. ही मुद्रा शिवाच्या नावावरून ठेवली आहे. 

4) वृक्षासन

हे आसन शरीर संतुलित ठेवते. या आसनामुळे कोअर मसल्स संतुलित राहतात. यामुळे मेंदूचे कार्य अधिक सुरळीत होते आणि मन स्थिर राहते.

5) सर्वांगासन

हे आसन शरीराला फिट ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते.  हे  करताना खांद्यांवर तुम्हाला पूर्ण वजन बॅलेन्स करावे लागते. शरीर फिट ठेवण्यासाठी मलायका वॉकिंग, योगा, रनिंग आणि स्विमिंग करते. याव्यतिरिक्त ती डाएट प्लॅनसुद्धा फॉलो करते.  तिच्या म्हणण्यानुसार ती सर्व काही खाते पण योग्य प्रमाणात खाते. मलायका आपल्या दिवसाची सुरूवात योगासनांनी करते. यानंतर ती आऊटडोअर व्यायाम करते. रोज १ तास व्यायाम केल्यानंतर चालायला जाते. वॉक केल्यानं शरीर टोन्ड राहण्यास मदत होते.

तरूणपणातच गुडघे, कंबर दुखणं वाढलं? रोज सकाळी १ लाडू खा-कॅल्शियम, प्रोटीन भरपूर मिळेल

मलायका दिवसाची सुरूवात १ लिटर पाणी पिऊन करते. पाण्यात मध, लिंबाचा रस मिसळून पिते. बॉडी डिटॉक्स राहण्यासाठी भरपूर पाणी पिते. मलायका कोणताही डाएट चार्ट फॉलो करत नाही. हेल्दी पदार्थ जास्तीत जास्त खाते. तेलकट, ऑयली, फास्ट फूड आणि मैदायुक्त पदार्थ खाणं टाळते.

पोट झटपट कमी करायचंय? ५ हलके फुलके पदार्थ कितीही खा, १ किलोही वजन वाढणार नाही

नाश्त्यामध्ये तिला ताजी फळं, इडली, उपमा किंवा मल्टीग्रेन टोस्ट खायला आवडते तर स्नॅक्समध्ये फ्रेश फ्रुट्स, ब्राऊन ब्रेड टोस्ट आणि  एग व्हाईट खायला आवडते.  दुपारच्या जेवणात चपाती, भात, भाज्या, स्प्राऊट्स खाते. तिला स्टिम्ड व्हेजिटेब्लसह सॅलेड, सूप खायला फार आवडते. 

टॅग्स : फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सहेल्थ टिप्स