ब्रेस्ट कॅन्सरचा धोका महिलांना जास्त असतो याचा अर्थ असा नाही की पुरूषांना या आजाराचा धोका अजिबात नसतो. हा आजार पुरूषांनाही होऊ शकतो. पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका असतो. त्याला मेल ब्रेस्ट कॅन्सर असं म्हटलं जातं. (Male breast cancer symptoms which you should not ignore it know male breast cancer signs) जेव्हा स्तनाच्या आतल्या पेशी वेगानं वाढू लागतात तेव्हा स्तनाचा कर्करोग होतो. हळूहळू ही गाठ आजूबाजूच्या उती आणि अवयवांमध्ये पसरून घातक बनते. या आजारात एक विशेष प्रकारचा स्त्राव असतो. नेमका हा आजार काय असतो, कशानं होतो, लक्षणं काय असतात. ते पाहूया..
NHS.UK च्या अहवालानुसार स्तनाच्या कर्करोगाचे नेमके कारण अद्याप ज्ञात नसले तरी, कुटुंबातील जीन्ससह अनेक घटक कारणीभूत असल्याचे मानले जाते. लठ्ठपणा, क्लाइनफेल्टर सिंड्रोम, यकृत सिरोसिस आणि इस्ट्रोजेन हार्मोन वाढणे हे देखील याचे कारण असू शकते. स्तनाच्या कर्करोगासाठी रेडिओथेरपीही कारणीभूत ठरू शकते.
१) स्तनामध्ये सूज येणं
२) स्तनाग्रांचा स्त्राव
३) स्तनाची त्वचा लालसर होणे
४) स्तनाच्या त्वचेवर जळजळ
५) स्तनाग्र दुखणे
हा आजार कधी होऊ शकतो?
सीडीसीच्या रिपोर्टनुसार पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची सर्वाधिक प्रकरणे वयाच्या ५० नंतर होतात. याशिवाय कौटुंबिक पार्श्वभूमी, हार्मोन थेरपी उपचार, रेडिएशन थेरपी उपचार इत्यादींमधून जात असलेल्या व्यक्तींना जास्त धोका असू शकतात. यकृताचा आजार असलेल्या पुरुषांना स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. कारण, यकृत खराब झाल्यामुळे, एंड्रोजनची पातळी कमी होऊ लागते आणि इस्ट्रोजेनची पातळी वाढते. त्यामुळे या कर्करोगाचा धोका खूप वाढतो.
हा उपचार महिला आणि पुरुषांसाठी समान आहे. ज्यासाठी शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, हार्मोन थेरपी आणि अन्य थेरपीची मदत घेतली जाऊ शकते. पुरुष स्तनाचा कर्करोग पूर्णपणे टाळू शकत नाहीत. मात्र अल्कोहोलचे सेवन कमी करणे, वजन नियंत्रित ठेवणे, शारीरिक क्रिया इत्यादीद्वारे त्याचा धोका कमी केला जाऊ शकतो.
स्तनांच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असल्यास, मग तो पुरुष असो वा स्त्री, ३० वर्षांनंतर नियमितपणे डॉक्टरांकडे जाऊन आवश्यक तपासण्या करुन घ्यायल्या हव्यात. छातीभोवती गाठ दिसू लागताच किंवा निप्पलचा रंग बदलू लागला की लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा. छातीभोवती कोणताही विचित्र बदल दिसताच डॉक्टरांना दाखवा