Join us   

मनाचे आजार म्हणजे वेड लागणे नव्हे, योग्य उपचार आजार बरे करतात, पण आजारच नाकारला तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2023 1:49 PM

Schizophrenia Symptoms and Causes मानसिक आजार कुणालाही होवू शकतात, गरज असते योग्य उपचार आणि आपल्या माणसांच्या सहकार्याची..

शरीराला आजार होतात तसे मनालाही आजार होतात. डिप्रेशन, स्क्रिझोफेनिया हे आजार कुणालाही होवू शकतात. त्यामुळे त्याची अनाठायी भीती न बाळगता योग्य वेळी उपचार घ्यायला हवेत. मेंटल हेल्थ केअर अँड रिहॅबिलिटेशन सेंटरचे संचालक डॉ. राजेश कुमार सांगतात, "मानसिक आजार समजून घेणे आवश्यक आहे. या आजारात एखादी व्यक्ती मानसिक आजाराशी झुंज देत असते. परंतु, वास्तविक आणि काल्पनिक यातील फरक त्यांना समजून येत नाही. ती व्यक्ती काल्पनिक विश्वात जगत असते.

हा आजार अनुवांशिकही असल्याचे अनेक संशोधनातून आढळले आहे. जर एखाद्या पालकाला स्किझोफ्रेनिया हा आजार झाला असेल, तर मुलाला हा आजार होण्याची संभावना ४० टक्के असू शकते. काही रुग्णांच्या मेंदूतील रसायनांमध्ये असंतुलन निर्माण होते, जसे की सेरोटोनिन आणि डोपामाइनचे प्रमाण वाढल्यामुळे देखील हा आजार होऊ शकतो."

एका सर्वेक्षणानुसार, 70 टक्के लोक या आजारावर उपचार घेतल्यानंतर सामान्य जीवन जगताना दिसले आहेत, त्यातील 20 टक्के लोकांवर हा आजार बराच काळ दिसून आला. तर दुसरीकडे 10 टक्के लोकांनी आपले मौल्यवान जीवन सोडून मृत्यूला कवटाळले आहे. त्यापैकी बहुतेक तरुण आणि प्रौढ पुरुष होते.

स्किझोफ्रेनियाचे लक्षणे

या आजारात व्यक्तीला कल्पना आणि वास्तव यातील फरक समजून येत नाही. बऱ्याच प्रकरणांमध्ये व्यक्तीला भ्रम दिसून येते. विविध आवाज ऐकू येतात. जे प्रत्यक्षात नसतात. काही प्रकरणांमध्ये ती व्यक्ती विविध गोष्टी, किंवा आकृत्या पाहते. अशा वेळी हळूहळू व्यक्ती उदासीन होते आणि आपल्या विश्वात जगायला सुरुवात करते.

त्यातील मुख्य लक्षणे -

मनात नेहमी भ्रम, शंका किंवा संशय निर्माण होणे

सतत गोंधळलेले मन

लक्ष केंद्रित न होणे

चेहऱ्यावर भाव नसणे

कसली तरी चिंता वाटू लागणे

एकलकोंडा स्वभाव होणे

विचित्र हावभाव करणे

बारीकसारीक गोष्टीवरून चिडचिड होणे

या आजारात व्यक्तीला कोणत्याही गोष्टीतून आनंद मिळत नाही. अशी लक्षणे दिसल्यास विलंब न करता मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेणं आवश्यक आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वेळेवर रुग्णावर उपचार करणे खूप महत्वाचे आहे, जितका जास्त उशीर होईल. तितकाच त्रास वाढतच जाईल.

टॅग्स : आरोग्यमानसिक आरोग्यहेल्थ टिप्स