Join us   

आलिया भट सांगते, सहा तास वॉशरुमला जाता आलं नाही! मात्र तासंतास लघवीला न जाणं घातक कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2024 5:14 PM

Met Gala 2024: Alia Bhatt Says She Didn't Go To The Washroom For 6 Hours In Her Outfit; Trolls Mock Her Struggle : तुम्हीही जास्त वेळ लघवी रोखून ठेवत असाल तर; वेळीच ही सवय सोडा कारण..

बहुतांशवेळा आपलं आरोग्य बिघडण्यास आपल्याच काही सवयी कारणीभूत ठरतात (Alia Bhatt). अशीच एक सवय म्हणजे लघवी रोखून ठेवणे. लघवी लागलेली असतांनाही लघवीस न जाणं ही अत्यंत वाईट सवय (Peeing). अनेक महिलांना अशी सवय असते. लघवीला जायला जागा नसणे, स्वच्छ शौचालय नसणे म्हणून पाणीच कमी पिणे आणि लघवी लागली तरी ती रोखून धरणे असं अनेकजणी करतात (Health Tips).

त्यात प्रवास करत असतील तरी लघवीला जाणं टाळतात. या सवयीमुळे गंभीर आजार होऊ शकतो. आणि अगदी सामान्य महिलाच नाही तर अनेकदा आलिया भटसारख्या (Alia) सेलिब्रिटींनाही लघवीला तासंतास जाता येत नाही, त्यातूनही तब्येतीला अपाय होतो(Met Gala 2024: Alia Bhatt Says She Didn't Go To The Washroom For 6 Hours In Her Outfit; Trolls Mock Her Struggle).

नुकतंच कपिल शर्मा शोमध्ये अभिनेत्री आलिया भटने हजेरी लावली होती. ज्यात तिने अनेक किस्से शेअर केले. आलियाने यंदाच्या मेट गाला कार्यक्रमात तब्बल २३ फूट लांबीची साडी नेसली होती. ज्यात ती खूप सुरेख तर दिसत होतीच, पण या साडीमुळे तिला ६ तास वॉशरूमला जातं आलं नाही असं तिनं सांगितलं.

तेलकट पदार्थ खाणे बंद करूनही वजन घटेना? ' हे ' ४ तेल स्वयंपाकासाठी वापरा, वजन वाढणारच नाही

आलिया म्हणते, 'माझी साडी खूपच सुंदर होती पण असा लूक की त्यामुळे वॉशरुमला जाणंच शक्य नव्हतं. मी स्वत: सहा तास वॉशरुमला नव्हते गेले.' आलियाची समस्या वेगळी असली तरी असं लघवीला तासंतास न जाणं घातक ठरु शकतं.

लघवी रोखल्यामुळे काय होऊ शकतं?

यूरोलॉजिस्ट  डॉ. आशुतोष बघेल यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार 'मूत्राशय लघवीने भरताच मेंदूला सिग्नल मिळतो. पण जर आपण लघवी रोखून ठेवली तर लघवी साचत जाते. ज्यामुळे मुत्राशयाववर दबाव वाढतो आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.'

लघवी रोखण्याचे दुष्परिणाम

- लघवी सतत रोखून धरल्याने मासपेशी कमजोर होतात.

- लघवीला जास्त वेळ दाबून ठेवल्याने लघवीतील बॅक्टेरियांची संख्या वाढते. जे मूत्राशयाच्या आत पोहोचतात आणि संसर्गास कारणीभूत ठरतात.

- महिलांना लघवी कंट्रोल करणं अवघड जातं. पण तरीही तुम्ही लघवी थांबवत असाल तर, युरिनरी ब्लॅडरवर परिणाम होऊन सतत लघवी लागण्याची समस्या निर्माण होऊ शकते. ज्यामुळे लघवी करताना त्रास होऊ शकतो.

तेलकट पदार्थ खाणे बंद करूनही वजन घटेना? ' हे ' ४ तेल स्वयंपाकासाठी वापरा, वजन वाढणारच नाही

- यूटीआय ही महिलांमध्ये सर्वाधिक जाणत असेलेली समस्या आहे. यात मुत्राशयात इन्फेक्शन होतं.

- लघवी रोखल्यामुळे किडनी स्टोनही होऊ शकतं. शिवाय किडनीचे विविध आजारही उद्भवू शकतात.

टॅग्स : आलिया भटहेल्थ टिप्सआरोग्य