Join us   

स्टिलच्या भांड्यांत 'हे' पदार्थ शिजवणं टाळा; तब्येत बिघडेल- भांडी वापरताना ३ गोष्टी लक्षात ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2023 12:25 PM

Metals You Must Avoid For Cooking (Steel chi bhandi kashi vapravi) : स्टिलच्या भांड्यांमध्ये जेवण बनवताना त्यावर खाद्य तेलाची कोटींग केल्यास धोका टाळता येतो.

आधीच्या काळी जेवण बनवण्यासाठी मातीच्या भांड्याचा वापर केला जायचा पण  बदलत्या काळात मातीच्या भांड्यांची जागा मेटलच्या भांड्यांनी घेतली आहे. आपल्या घरांमध्ये स्लिटची भांडी बरीच असतात.  ज्यात जेवण बनवणं खूपच सोपं असतं आणि ही भांडी स्वच्छ करायला जास्त वेळही लागत नाही. (Harmful metals you must avoid for cooking food) एक्सपर्ट्सच्या एल्युमिनियमच्या भांड्यात  जेवण बनवल्यास याची रिएक्शन होण्याची शक्यता जास्त असते.

स्टिलच्या भांड्यांमध्ये जेवण बनवताना त्यावर खाद्य तेलाची कोटींग केल्यास धोका टाळता येतो. युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो कॅनडाचे प्रोफेसर बेन हॅटर यांनी दिलेल्या माहितीनुसार स्टेनलेस स्टिलच्या भांड्यावर तेलाचे कोटींग केल्याने बॅक्टेरीया तयार होत नाहीत.  कारण वारंवार ही भांडी वापरल्याने त्यावर सुक्ष्म फटी तयार होता. बॅक्टेरीया लपण्याचे हे ठिकाण असते. (3 Thing you should never do when using stainless steel pans)

१) ज्या पदार्थांना शिजायला जास्त वेळ लागतो ते स्टिलच्या भांड्यात शिजवू नका. ज्यामुळे बेस फारच पातळ होतो, स्टिलच्या भांड्यांमध्ये जेवण बनवल्यास त्या धातूचे  काही अंश खाण्यात एकत्र होतात म्हणूनच जेवण  मंद आचेवर शिजवावे. जर याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर जेवण खराब होऊ शकतं किंवा खालच्या बाजूने करपते. स्टिलच्या भांड्याचा स्मोक पॉईंट गरजेपेक्षा जास्त तापल्यास त्यातील ट्रायग्लिसराईट्स तुटतात आणि फॅटी एसिड्स बनतात. हे पाण्यात मिसळतात ज्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो. 

तरुणपणात कंबर-गुडघे दुखू लागले? रोज १ लाडू खा,कॅल्शियम-प्रोटीन मिळेल, बळकट होतील हाडं

२) खासकरून आपण नुडल्स, पास्ता, मॅक्रेोनी स्टिलच्या भांड्यांमध्ये शिजवतो. यात  मीठ आण तेलाचा बेस जमा होतो आणि खारट पाण्याचे निशान दिसून येतात. मीठ तळाशी साठते. म्हणून  हे पदार्थ शिजवण्यासाठी दुसऱ्या भांड्यांचा वापर करा. तुम्ही कोमट पाणी किंवा गरम पाण्याचाही वापर करू शकता. 

ढाबास्टाईल चविष्ट दाल तडका १५ मिनिटांत घरीच करा, सोपी रेसिपी-पोट भरेल, मन भरणार नाही

३) अनेकदा आपण स्टिलची भांडी ओव्हनमध्ये ठेवतो. जे शरीरासाठी नुकसानकारक ठरतं. मेटल हे इलेक्ट्रिसिटी कंडक्टर असते. म्हणूनच त्याला आग लागण्याची भिती असते. ३० सेंकंदापेक्षा जास्तवेळ स्टिलचे भांडे मायक्रोव्हेव्हमध्ये ठेवल्यास याचा तब्येतीला धोका उद्भवू शकतो.  अन्न खराब होण्याची शक्यता असते आणि तब्येतीलाही धोका  असतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स