Join us   

Milk in Diabetes : शुगर लेव्हल वाढण्यासाठी कारणीभूत ठरतंय रात्री दूध पिऊन झोपणं? वाचा तब्येतीवर कसा होतो परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 12:06 PM

Milk in Diabetes How to control diabetes : दुधाचे सेवन शरीरासाठी फायदेशीर ठरतं पण डायबिटीक रुग्णांसाठी (Milk in Diabetes) हे चांगले आहे की नाही या बाबतीत तज्ज्ञांचे मत वेगळे आहे.

डायबिटीसचं निदान होणं अनेकदा त्रासदायक ठरू शकतं. कारण या आजारात एखाद्या व्यक्तीला त्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक बंधने लावावी लागतात आणि काहीही खाण्यापिण्यापूर्वी अनेक वेळा विचार करावा लागतो. डायबिटीक लोकांच्या मनात एक प्रश्न आहे आणि जो कायम राहतो की डायबिटीक रुग्ण रात्री दूध पिऊ शकतात का?

दुधाचे सेवन शरीरासाठी फायदेशीर ठरतं पण डायबिटीक रुग्णांसाठी (Milk in Diabetes) हे चांगले आहे की नाही या बाबतीत तज्ज्ञांचे मत वेगळे आहे. चला तर मग जाणून घेऊया डायबिटीक रुग्णांसाठी दूध पिणे किती फायदेशीर आहे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी खरोखर वाढते का आणि मधुमेही रुग्णांनी दिवसात किती दूध प्यावे याबाबत जाणून घ्या.

सेक्स हार्मोन्सच्या कमतरतेमुळे पुरूषांमध्ये उद्भवतात 'या' समस्या; हॅप्पी सेक्स लाईफसाठी लक्षणं जाणून घ्या

डायबिटीक रुग्णांनी रात्री पिणे सुरक्षित आहे का हे जाणून घेण्यापूर्वी, ते त्यांच्यासाठी चांगले आहे की नाही हे आधी जाणून घेऊया. एकीकडे काही लोक म्हणतात की डायबिटीक असलेल्या लोकांसाठी दूध खूप चांगले आहे. काहींच्या मते, त्याचा रक्तातील साखरेवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे, संशोधक असेही म्हणतात की दुधाचे सेवन केल्याने शुगर नियंत्रणात ठेवण्यास खूप मदत होते.

रात्री दूध पिण्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात?

दुधात लॅक्टोज असते, जो साखरेचा एक प्रकार आहे. चुकीच्या पद्धतीने घेतल्यास साखरेचं जास्त प्रमाण हानिकारक असू शकते. म्हणूनच तुम्ही एका दिवसात किती दूध पिता याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दुधात  फॅट्स असतात. शरीरातील चरबीचे प्रमाण नियंत्रित न राहिल्यास हृदय आणि कोलेस्टेरॉलचा त्रास होऊ शकतो. दूध प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी प्रभावित होते. परंतु त्याच वेळी कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे, जे डायबिटीस असलेल्या लोकांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.

फक्त ५ मिनिटांत काळं पडलेलं स्विच बोर्ड होईल चकचकीत; 'या' घ्या बटन्स साफ सफाईच्या सोप्या टिप्स

उच्च प्रथिने असलेले दूध डायबिटीक रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. तज्ञांचे म्हणणे आहे की डायबिटीक रुग्णांनी त्यांच्या आरोग्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य वेळी खाणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी दुधात असलेल्या कॅलरीजचे प्रमाण शरीरासाठी धोकादायक ठरू शकत असल्याने डायबिटीक रुग्णांनी झोपेच्या वेळी दूध पिणे नेहमीच योग्य नसते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढेल आणि तुम्हाला अस्वस्थता जाणवू लागेल. त्याच वेळी, काही लोकांच्या मते, रात्री दूध पिणे चांगले असू शकते. कारण ते प्यायल्यानंतर झोप चांगली लागते आणि शरीराला अनेक पोषक द्रव्येही मिळतात.

डायबिटीक रुग्णांनी काय करायला हवं?

डायबिटीक रुग्णांसाठी योग्य प्रकारचे दूध निवडणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करेल, ज्यामुळे रात्री शुगर वाढण्याची शक्यता खूप कमी होईल. आरोग्याचे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून, दुधाचे सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे. तज्ज्ञांच्या मते दुधात असलेले लॅक्टोज रक्तातील साखर वाढवू शकतात. कमी-कॅलरी आणि कमी चरबीयुक्त दुधात खूप कमी साखर असते. त्यामुळे कमी चरबीयुक्त दुधाचा पर्याय म्हणून सेवन करणे हे डायबिटीक रुग्णांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.

 फक्त २ मिनिटात गंजलेलं, अस्वच्छ गॅस बर्नर होईल साफ; या घ्या बर्नर चकचकीत करण्याच्या सोप्या टिप्स

डायबिटीक रुग्णांनी दिवसभरातून किती दूध प्यायला हवं

तज्ञांच्या मते डायबिटीक रुग्णांनी दुधाचे सेवन करणे आवश्यक आहे. परंतु काही प्रमाणात सावधगिरी बाळगावी. सकाळी नाश्त्यासोबत दूध घेणे चांगले. त्यामुळे सकाळी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. अशा परिस्थितीत, दुधातील कार्बोहायड्रेट्स आणि फॅट रक्तातील साखरेची पातळी संतुलित करण्यात आणि ऊर्जा देण्यासाठी खूप मदत करतात.

टॅग्स : मधुमेहआरोग्यहेल्थ टिप्स