Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पोट साफच होत नाही? कॉन्स्टिपेशनमुळे हैराण? दुधात मिसळा '१' खास गोष्ट; रोजचा त्रास होईल कमी

पोट साफच होत नाही? कॉन्स्टिपेशनमुळे हैराण? दुधात मिसळा '१' खास गोष्ट; रोजचा त्रास होईल कमी

Milk of Magnesia and Constipation Relief : पोटाच्या संबंधित समस्या वाढत असेल तर, दुधात एक गोष्ट मिसळून प्या - पोट होईल साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2024 10:00 AM2024-06-06T10:00:41+5:302024-06-06T10:05:01+5:30

Milk of Magnesia and Constipation Relief : पोटाच्या संबंधित समस्या वाढत असेल तर, दुधात एक गोष्ट मिसळून प्या - पोट होईल साफ

Milk of Magnesia and Constipation Relief | पोट साफच होत नाही? कॉन्स्टिपेशनमुळे हैराण? दुधात मिसळा '१' खास गोष्ट; रोजचा त्रास होईल कमी

पोट साफच होत नाही? कॉन्स्टिपेशनमुळे हैराण? दुधात मिसळा '१' खास गोष्ट; रोजचा त्रास होईल कमी

आजकाल कामाचा वाढता व्याप आणि इतर कारणांमुळे आरोग्याच्या निगडीत समस्या वाढत चालल्या आहेत (Constipation). वेळेवर न जेवणे, घरगुती पदार्थ न खाणे, यामुळे पोटाचे विकार वाढत जातात (Health Tips). खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी, शरीरात पाण्याची कमतरता, व्यायामाचा अभाव, यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. बद्धकोष्ठतेमुळे, एखाद्या व्यक्तीला सामान्यपणे शौचास कठीण होते. यामुळे काही वेळा पोटदुखीही होते.

याच बरोबर मुळव्याध होण्याची शक्यताही वाढते. जर आपल्याला बद्धकोष्ठतेपासून सुटका हवी असेल तर, कोमट दुधात एक गोष्ट मिसळून प्या. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होईल. शिवाय पोटाचे विकार आपल्यला छळणार नाही(Milk of Magnesia and Constipation Relief).

बद्धकोष्ठतेसाठी घरगुती उपाय

दूध हा प्रत्येक आहाराचा भाग आहे. दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते जे हाडे मजबूत ठेवतात. याशिवाय प्रथिने आणि व्हिटॅमिन डीसह अनेक खनिजे त्यात आढळतात. ज्यामुळे आरोग्याला बरेच फायदे मिळतात. पण फक्त दूध पिऊ नका. दुधात आपण २ चमचे तूप घालू शकता. हे दूध प्यायल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पोट सहज साफ होईल. शिवाय पोटाचे विकारही दूर राहतील.

शुगर कंट्रोल ते बॅड कोलेस्टेरॉलवर खास उपाय, रोज आहारात हवी कोथिंबीर! फायदे किती? घ्या यादी..

बद्धकोष्ठतेवर या टिप्स देखील उपयुक्त ठरतील

- लिंबाच्या रसाचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळेल. रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लास पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. लिंबू पाणी आपण दिवसातून एक किंवा दोनदा पिऊ शकता.

ICMR सांगते उन्हाळ्यात उसाचा रस पिणे टाळा; येऊ शकतो हृदयविकाराचा झटका- मधुमेह आणि..

- बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर, आपण अधिक लिक्विडचे सेवन करावे. अशा परिस्थितीत सूप, गरम पाणी किंवा हर्बल चहा पिऊ शकता.

- सकाळी एक चमचा ऑलिव्ह ऑइलचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. ऑलिव्ह ऑइल पचनसंस्थेसाठी उपयुक्त ठरते.

- औषधी गुणधर्मांनी भरपूर आलं खाल्ल्याने आले ठेचून गरम पाण्यात घालून हा चहा प्या. यामुळे पोट फुगणे आणि मळमळण्याच्या समस्येपासून देखील आराम मिळेल.

Web Title: Milk of Magnesia and Constipation Relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.