दूध हाडांसाठी फायदेशीर ठरते (Milk). यात कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे लहानग्यांपासून थोरामोठ्यांपर्यंत दूध व दुधाचे पदार्थ खातात (Health Tips). पण आरोग्यासाठी दूध चांगले की दही (Curd)? काहींना दुधाची चव आवडत नाही. किंवा दूध प्यायल्यानंतर अपचन किंवा पोट फुग्ण्याची समस्या निर्माण होते. पण तरीही हाडांना बळ मिळावे म्हणून दूध पीत राहतात. पण जर दुधाचा त्रास होत असेल तर, दही खायला सुरुवात करा.
दुधाऐवजी दही खाण्याचे फायदे किती? यामुळे आरोग्याला कितपत फायदा होतो? याची माहिती न्यूरोलॉजिस्ट डॉ.प्रियांका शेरावत यांनी दिली आहे. दुधाप्रमाणेच दही देखील शरीराला कॅल्शियम प्रदान करते. पोटासाठी दूध चांगले की दही? पाहूयात(Milk versus Curd: Which one is healthier).
पोटासाठी चांगले
- दही आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यासह पोटासाठीही आरामदायी ठरते. कारण दही हे एक फरमेण्टेड अन्न आहे. दही प्रोबायोटिक्सप्रमाणे कार्य करते. फरमेण्टेशनमुळे आतड्यामध्ये निरोगी बॅक्टेरिया तयार होतात. ज्यामुळे पोटाचे विकार दूर होतात.
फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल
- दह्यामध्ये प्रोबायोटिक्स, प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळते. नियमित दही खाल्ल्याने पचन सुधारते. प्रतिकारशक्ती वाढते, यासह हाडंही बळकट होतात. त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठीही आपण दही खाऊ शकता.
दही व्यतिरिक्त कोणते फरमेण्टेड पदार्थ खाणं योग्य?
इडली
योगर्ट
डोसा
ढोकळा
दुधापेक्षा दही चांगले?
एका ग्लास दुधात जेवढे कॅल्शियम आढळते तेवढे प्रमाण दह्याच्या एका वाटीत असते. 1 ग्लास दुधात सुमारे 300 मिलीग्राम कॅल्शियम असते. एक वाटी दही खाल्ल्याने शरीराला तितकेच कॅल्शियम मिळते. यासोबतच प्रोबायोटिक्सही मिळतात, जे दुधातून मिळत नाही.
थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा
दही कुणी खावे?
ॲसिडिटीने त्रस्त, अपचनाचा त्रास, पोट फुगणे, पोटदुखीचा त्रास यासह पोटाचे विकार दूर करण्यासाठी आपण दही खाऊ शकता.