Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दुधात तूप घालून प्यायल्यानं मिळतील जबरदस्त फायदे; चांगली झोप येईल, पोटही होईल साफ

दुधात तूप घालून प्यायल्यानं मिळतील जबरदस्त फायदे; चांगली झोप येईल, पोटही होईल साफ

Milk With Ghee at Night : तुपात अनसॅच्यूरेडेट फॅट्स आणि कॅलरीज असतात.  त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून कमी प्रमाणात दुधा, तुपाचे सेवन करायला हवं. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 02:59 PM2023-01-15T14:59:47+5:302023-01-15T15:19:07+5:30

Milk With Ghee at Night : तुपात अनसॅच्यूरेडेट फॅट्स आणि कॅलरीज असतात.  त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून कमी प्रमाणात दुधा, तुपाचे सेवन करायला हवं. 

Milk With Ghee at Night : Drinking milk with ghee every night will give tremendous benefits | दुधात तूप घालून प्यायल्यानं मिळतील जबरदस्त फायदे; चांगली झोप येईल, पोटही होईल साफ

दुधात तूप घालून प्यायल्यानं मिळतील जबरदस्त फायदे; चांगली झोप येईल, पोटही होईल साफ

रात्री झोपताना दूध पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जातो.  लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वांनाच दूध प्यायल्यास बरेच फायदे मिळतात. दुधात तूप हे आयुर्वेदात पारंपारिक औषध मानले जाते.  आयुर्वेद देखील तूप मिसळून दूध पिण्याचा सल्ला देतो. याद्वारे अनेक प्रकारचे आजारही बरे होऊ शकतात. गायीचे शुद्ध तूप देखील एक सुपरफूड मानले जाते, कारण ते अँटीऑक्सिडंट्स तसेच अँटीबॅक्टीरियल आणि अँटीफंगल गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. (Drinking milk with ghee every night will give tremendous benefits)

दुधात तूप घालून पिण्याचे फायदे या लेखात समजून घेऊया. 

१) तूप ब्युटीरिक ऍसिडमध्ये समृद्ध आहे, एक शॉर्ट चेन फॅटी ऍसिड जे पचन सुधारण्यास आणि पचनमार्गातील जळजळ कमी करण्यास मदत करते.

२) तूप झोपण्यापूर्वी घेतल्यास चांगली झोप येण्यास मदत होते.  

३) तूप हे ऊर्जेचा एक चांगला स्रोत आहे, कारण ते कॅलरीज आणि पोषक तत्वांनी समृद्ध आहे. रात्री दुधाबरोबर याचे सेवन केल्याने शक्ती येते, थकवा जाणवत नाही.

४) सांधेदुखीचा त्रास होत असेल तर तूप मिसळून दूध अवश्य प्या. तूप सांध्यातील वंगण वाढवते आणि जळजळ कमी करते. त्यात ओमेगा ३ आणि ६ फॅटी अॅसिड असतात. दुधामध्ये असलेले कॅल्शियम हाडे मजबूत करते. यामुळे पायांचा जडपणाही दूर होतो.

पोट, मांड्यांचा आकार खूपच वाढलाय? रोजच्या नाश्त्याला ५ पदार्थ खाणं सोडा; झरझर घटेल चरबी

५) तुपात अनसॅच्यूरेडेट फॅट्स आणि कॅलरीज असतात.  त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून कमी प्रमाणात दुधा, तुपाचे सेवन करायला हवं. 

६) वाढता ताणतणाव आणि प्रदूषणामुळे त्वचेचे खूप नुकसान होत आहे. त्यामुळे कोरडेपणा आणि चमक निघून जाते. हे टाळण्यासाठी तूप मिसळून दूध पिणे फायदेशीर ठरू शकते.  

Web Title: Milk With Ghee at Night : Drinking milk with ghee every night will give tremendous benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.