लठ्ठपणा ही सध्याची सर्वात मोठी समस्या बनली आहे. लठ्ठपणाची समस्या अनेक कारणांमुळे उद्भवते. मुख्य म्हणजे चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि बैठी जीवनशैलीमुळे ही समस्या आणखी वाढली आहे. वाढलेलं वजन तुमचे सौंदर्य तर बिघडवतेच यासह आरोग्यासाठी देखील हानिकारक ठरत आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोग यासह जीवघेण्या आजारांचा धोका वाढतो.
वजन कमी करण्यासाठी लोकं विविध आहार व व्यायाम करतात. वजन कमी करण्यासाठी योग्य व निरोगी आहार घेणं गरजेचं आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकांना व्यायाम व योग्य आहाराचे सेवन करणे जमत नाही. यासाठी एक आयुर्वेदिक उपाय आपल्याला मदत करेल.
'कपिल त्यागी - आयुर्वेदिक क्लिनिक'चे संचालक डॉ. कपिल त्यागी यांनी, वजन कमी करण्यासाठी एका आयुर्वेदिक पावडरची माहिती दिली आहे. जे विविध औषधी वनस्पतींचे मिश्रण आहे(Miracle Powder for Quick Weight Loss).
वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक पावडर
डॉक्टरांच्या मते, ''आयुर्वेदात अशा अनेक जडीबुटी आहेत, ज्या वजन कमी करण्यासाठी मदत करतात. बडीशेप, धणे, हिंग यांसारखे मसाले पोटाची चरबी कमी करू शकतात. यांच्या मिश्रणाने बनवलेली ही पावडर आतड्यांच्या कार्याला चालना देते आणि वजन कमी करते.
३० मिनिटांत करा ४ सोपे व्यायाम, परफेक्ट फिगरचं स्वप्न होईल पूर्ण- कॅलरी बर्न झटपट
आयुर्वेदिक पावडर करण्यासाठी लागणारं साहित्य
जिरं
ओवा
थायरॉईडमुळे वजन वाढत चाललंय? प्या मसूर डाळीचे पौष्टिक सूप, बघा वजनात घट
बडीशेप
हिंग
अशी बनवा आयुर्वेदिक पावडर
सर्वप्रथम, जिरे, ओवा, बडीशेप, आणि हिंग समप्रमाणात घेऊन मिक्स करा. आता तवा गरम करण्यासाठी ठेवा, त्यात हे मसाले भाजून घ्या. मसाले भाजल्यानंतर थोडं थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून मसाल्यांची पावडर तयार करा. मसाल्यांची पावडर रेडी झाल्यानंतर एका हवाबंद डब्यात ठेवा.
वजन कमी करण्यासाठी या पद्धतीने खा पावडर
वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. यासाठी रोज सकाळी एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा पावडर मिसळून मिक्स करा. व हे पाणी प्या. आपण या पावडरचा वापर सॅलडमध्ये मसाला म्हणूनही करू शकता.
सेक्स केल्यानं वजन वाढलं, पोटासह मागचा भाग खूप वाढला, हा महिलांचा समज खरा की खोटा?
आयुर्वेदिक पावडर वजन कमी कसे करते?
डॉक्टरांच्या मते, ''आयुर्वेदात जिरं, ओवा, बडीशेप, हिंग या मसाल्यांचा वापर होतोच. या गोष्टींचे मिश्रण अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. जे पाचन तंत्र निरोगी ठेवण्यासोबत, गॅस्ट्रिकसारखी समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते.
हे मसाले शरीरातील चयापचय योग्य ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. या मासाल्यांमधील दाहक-विरोधी गुणधर्मामुळे पोट भरल्यासारखे वाटते. यासह भूक नियंत्रित करण्यास मदत होते. ज्यामुळे कॅलरीजचे सेवन कमी होते.