Join us   

रोजच्या जगण्यातल्या ४ साध्या चुका देतात हार्ट अटॅकला आमंत्रण, बघा तुम्ही रोज किती चुकताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2022 5:00 PM

Mistakes that Leads to Heart Attack : आता अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे थेट हृदयावर परिणाम होऊ शकतो, ते पाहूया...

ठळक मुद्दे एसीमुळे आपल्या रक्तावाहिन्या गारठून जातात आणि त्याचा हृदयावर परिणाम होऊ शकतो.     हृदयाच्या आरोग्याकडे आपण म्हणावे तितके लक्ष देत नाही, पण एकाएकी हृदयरोग उद्भवला की मात्र आपले धाबे दणाणते, त्याआधीच ४ गोष्टींची काळजी घ्या...

हार्ट अॅटॅक ही अशी गोष्ट आहे की जी अचानक उद्भवते आणि काही क्षणात व्यक्तीचे होत्याचे नव्हते होते. हार्ट अॅटॅकटे नेमके कारण अद्याप कोणीही सांगू शकत आहे. मात्र विविध कारणांनी हृदयावर आणि हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांवर ताण आल्याने त्यांच्या कार्यात अडथळा निर्माण होतो आणि हृदयाशी संबंधित तक्रारी उद्भवतात (Risk of Heart Attack). या सगळ्यासाठी आपली चुकीची जीवनशैली हे महत्त्वाचे कारण असते. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, ताणतणावरहित जीवन यांचा शरीराचे सगळेच कार्य सुरळीत राहण्यासाठी उपयोग होतो. (Heart disease) पण काही गोष्टींकडे आपण सातत्याने दुर्लक्ष करत असलो तरी भविष्यात त्या गोष्टी आपल्याला नक्कीच महागात पडू शकतात. आता अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे थेट हृदयावर परिणाम होऊ शकतो, ते पाहूया (Mistakes that Leads to Heart Attack)... 

(Image : Google)

१. कमी झोपणे (Less Sleep)

कधी ऑफीसच्या कामाचा ताण, कधी कुटुंबातील जबाबदाऱ्या आणि त्यामुळे असणारी कामे, कधी लहान मुले तर कधी आणखी काही कारणाने अनेक जण रात्री उशीरा झोपतात. सकाळी उठल्यावर आवरुन कामाला जायची घाई असल्याने लवकर उठावे लागते. अशात आपली झोप पुरेशी होत नाही. व्यक्तीला किमान ७ ते ८ तासांची झोप आवश्यक असते. एखादवेळी काही कारणाने कमी झोप होणे ठिक आहे, पण सतत असे व्हायला लागले तर त्याचा हृदयावर विपरीत परीणाम होतो आणि हार्ट अॅटॅकचा धोका वाढतो. 

घसा खवखवतोय, ५ घरगुती उपाय, पावसाळ्यात होणारी घसादुखी टाळा; पावसात राहा तंदुरुस्त

२. वायू प्रदूषण (Air Pollution)

आपल्याला रोज वावरताना हवेत किती जास्त प्रमाणात प्रदूषक घटक आहेत हे जाणवत नाही. पण प्रत्यक्षात हवेमध्ये प्रदूषण करणाऱ्या घटकांचे प्रमाण जास्त असते. हे घटक नकळत श्वासाद्वारे आपल्या शरीरात जातात आणि त्याचा हृदयाच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. वाहने, कारखाने, फटाक्यांसारखे घटक यांसारख्या गोष्टींमध्ये असलेला विषारी वायू आरोग्यासाठी घातक असतो. तो शरीरात जाऊन आपल्या हृदयाला हानी पोहचवतो. 

३. सिगारेट आणि दारुचे व्यसन (Smoking and Drinking)

दारु आणि सिगारेट आपल्या आरोग्यासाठी चांगली नसते हे आपल्याला माहित असते. मात्र तरीही व्यसन असल्याने आपण त्या गोष्टींपासून दूर राहू शकत नाही. या व्यसनांचा परिणाम आपल्या शरीरावर होत असून त्यामुळे ब्लडप्रेशन, कोलेस्टेरॉल, डायबिटीस यांसारख्या समस्यांचे प्रमाण वाढते आणि त्याचा परीणाम आपल्या हृदयावर होत असल्याने दारु आणि सिगारेटचे व्यसन टाळलेले केव्हाही चांगले.

(Image : Google)

हाडांच्या बळकटीसाठी आहारात नियमित हवेत ३ पदार्थ, सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ सांगतात...

४. जास्त प्रमाणात गारठा (Excessive Cold Temperature)

आपण प्रमाणापेक्षा जास्त थंड वातावरणात बसत असू तर त्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या गारठ्यामुळे आकुंचन पावतात. त्यामुळे हाय ब्लड प्रेशर होण्याची शक्यता असते. याच दरम्यान आपण शरीराला ताण देणाऱ्या गोष्टी केल्यास हार्ट अॅटॅक येण्याचा धोका असतो. अनेकदा आपण ऑफीसमध्ये दिवसभर एसीमध्ये बसतो. पण एसीमुळे आपल्या रक्तावाहिन्या गारठून जातात आणि त्याचा हृदयावर परिणाम होऊ शकतो.     

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहृदयविकाराचा झटकाहृदयरोग