Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कणकेत फक्त २ गोष्टी मिसळा, खा पौष्टिक चपात्या रोज! व्हिटामिन B-12 मिळेल रोजच्या जेवणातून

कणकेत फक्त २ गोष्टी मिसळा, खा पौष्टिक चपात्या रोज! व्हिटामिन B-12 मिळेल रोजच्या जेवणातून

Mix Soda Or Yeast With Wheat Flour For Vitamib B-12 : शरीरात व्हिटामीन बी-१२ कमतरता भासल्यास थकवा, कमजोरी, यांसारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 16:11 IST2024-11-27T12:22:39+5:302024-11-27T16:11:29+5:30

Mix Soda Or Yeast With Wheat Flour For Vitamib B-12 : शरीरात व्हिटामीन बी-१२ कमतरता भासल्यास थकवा, कमजोरी, यांसारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

Mix Soda Or Yeast With Wheat Flour For Vitamib B-12 Vitamib B-12 With Wheat Flour | कणकेत फक्त २ गोष्टी मिसळा, खा पौष्टिक चपात्या रोज! व्हिटामिन B-12 मिळेल रोजच्या जेवणातून

कणकेत फक्त २ गोष्टी मिसळा, खा पौष्टिक चपात्या रोज! व्हिटामिन B-12 मिळेल रोजच्या जेवणातून

व्हिटामीन बी-१२ (Vitamin B-12) शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक असते. जे लोक वेळेवर जेवत नाहीत, जंक फूड जास्त खातात, घरातलं अन्न कमी खातात त्याच्या शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासते. यामुळे एनर्जी बूस्ट होते आणि मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यासही मदत होते.  त्वचा ग्लोईंग दिसते.

शरीरात व्हिटामीन बी-१२ कमतरता भासल्यास  थकवा, कमजोरी, यांसारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. रोजच्या जेवणात जर तुम्ही चपाती खात असाल तर चपाती खाऊन तुम्ही व्हिटामीन बी-१२ कमतरता भरून काढू शकता. (Mix Soda Or Yeast With Wheat Flour For Vitamin B-12)

यीस्टच्या अर्कात नैसर्गिक स्वरूपात व्हिटामीन बी-१२ असते ते कोणत्याही प्राण्यापासून मिळवले जात नाही. ताज्या यीस्टमध्ये कार्बोहायड्रेट्स, व्हिटामीन्स, मिनरल्स असतात.  यीस्ट एक्स्ट्रॅक्ट यीस्ट सेल्सपासून तयार होते. शाकाहारी आणि वेगन लोकांसाठी हे फायदेशीर ठरते.

जर तुम्ही रोज चपाती बनवण्यासाठी पीठ मळत असाल तर पिठात सोडा आणि यीस्ट मिसळून पीठ मळल्यानं यात व्हिटामीन्स आणि मिनरल्स वाढतात. यीस्ट आणि सोडा गव्हाच्या पीठाच्या कणकेत मिसळून चपाती बनवल्यानं यातून शरीराला नॅच्युरली व्हिटामीन बी-१२ मिळते. यीस्टमधील पोषक तत्व व्हिटामीन बी-१२ कॉम्पलेक्स व्हिटामीन  बी-१२ ची कमतरता पूर्ण करते. 

दुधात ‘हा’ पदार्थ कालवून खा- व्हिटामीन B-12 वाढेल भराभर, अशक्तपणाही होईल झरझर कमी

पिठात यीस्ट आणि सोडा मिसळून चपाती बनवल्यानं त्यात फर्मेंटेशन होऊ लागते. यामुळे चपातीत व्हिटामीन्स आणि मिनरल्स वाढतात. हे खाल्ल्यानं डायजेस्टिव्ह सिस्टिम चांगली राहते. नॉनव्हेज आणि डेअरी प्रोडक्टस न खाल्ल्यामुळे व्हिगन आणि व्हेजिटेरीयन लोकांमध्ये व्हिटामीन बी-१२ कमतरता उद्भवते. शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासल्यास तुम्ही यीस्टची चपाती बनवून खाऊ शकता.

फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये बॅक्टेरिया एक्टिव्हेट होतात. ज्यामुळे व्हिटामीन बी-१२ इतर एंजाईम्स निर्माण करतात. यामुळे चपाती केवळ पौष्टीक बनत नाही तर चपातीची चवसुद्धा वाढते. सोडा यीस्टला एक्टिव्ह करते ज्यामुळे पिठात फर्मेंटेशनची प्रक्रिया वेगानं होते. यामुळे चपाती चांगली फुगते आणि व्हिटामीन बी-१२ मिळते. 

घाईघाईत जेवल्यानं अचानक येऊ शकतो मृत्यू; जेवणाचे ३ आयुर्वेदीक नियम-पाहा जेवण्याची योग्य पद्धत

चपाती बनवण्यासाठी २ कप गव्हाच्या पीठात अर्धा चमचा यीस्ट आणि अर्धा चमचा सोडा घेऊन कोमट पाण्यात मिसळून घाला.  नंतर कणिक मळून घ्या. मळलेलं पीठ २ तास तसंच ठेवून नंतर चपात्या बनवा. ही चपाती खाल्ल्यानं शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासत नाही आणि इम्यूनिटी स्ट्राँग होते. 

Web Title: Mix Soda Or Yeast With Wheat Flour For Vitamib B-12 Vitamib B-12 With Wheat Flour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.