Join us   

थंडीत कोलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये ठेवायचंय? चपात्या करताना कणकेत 'हा' पदार्थ मिसळा-आजार होतील दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 12:48 PM

Mix These 3 Flour Include in Your Diet : जर तुम्ही गव्हाच्या पिठापासून चपात्या बनवत असाल त्यात ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. कार्बोहायड्रेट्सचे प्रमाणही जास्त असते.

डायबिटीस (Diabetes) हा एक गंभीर आजार आहे. सुरूवातीला या आजाराची लक्षणं दिसून येत नाहीत पण हळूहळू शरीर डॅमेज होऊ लागते. डायबिटीस सारख्या आजारांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात हार्ट डिसीज, किडनी फेल्योर, लिव्हर फेल्योर यांसारखे आजार पसरण्याचा धोका असतो. (How to control diabetes and cholesterol) भारतात कार्बोहायड्रेट आधारीत आहार मोठ्या प्रमाणात घेतला जातो यामुळे ब्लड शुगर आणि कोलेस्टेरॉल मोठ्या प्रमाणात वाढते. (How to Reduce Cholesterol For Diabetic Patient)

खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देऊन त्यात सुधारणा करायला हवी. आहारतज्ज्ञ  आणि डायबेटोलॉजिस्ट डॉ. प्रियांका यांनी यांनी रोजच्या आहारात कोणते बदल केल्यास ब्लड शुगर नियंत्रणात राहते याबाबत अधिक माहिती दिली आहे.  यासाठी तुम्हाला जास्त मेनहत करावी लागणार नाही. (What Can I Eat to Keep My Blood Sugar and Cholesterol Low)

बेसन पीठ

जर तुम्ही गव्हाच्या पिठापासून चपात्या बनवत असाल त्यात ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. कार्बोहायड्रेट्सचे प्रमाणही जास्त असते. पण गव्हाच्या पीठात काही प्रमाणात बेसन मिसळल्यास चवीत बदल होऊ शकतो यात प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते.  या पिठापासून बनवलेल्या चपात्या खाल्ल्याने दिवसभर तुम्हाला फ्रेश  वाटेल आणि शुगर लेव्हलही वाढणार नाही. 

पोट कमी करायचं-व्यायामासाठी वेळ नाही? ५ मिनिटं भिंतीला पाय लावा-झरझर घटेल चरबी

जवसाचे पीठ

जवसात मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात. यामुळे मेटाबॉलिझ्म बुस्ट होतो आणि शुगर वाढत  नाही. जवसाचे पीठ इंसुलिन सेंसिटिव्हीटी वाढवते. ज्यामुळे ग्रेड इंफ्लामेशन कमी होते आणि शरीराचा अनेक आजारांपासून बचाव होतो. म्हणूनच जर तुम्ही गव्हाच्या पिठाच्या चपात्या बनवत असाल तर पीठ मळताना अधिक लक्ष द्या जेणेकरून शुगर लेव्हल वाढणार नाही कोलेस्टेरॉलही नियंत्रणात राहील.

नारळाच्या शेंड्या टाकून देता? ५ भन्नाट फायदे, पिकलेले केसही होतील काळेभोर-पूर्ण पैसे वसूल

नाचणीचे पीठ

जर तुम्ही शुगर पेशंट असाल तर गव्हाच्या पीठात थोडं नाचणीचे पीठ मिसळू शकता. अशी चपाती खाल्ल्याने शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहील. नाचणी फायबर्ससह इतर पोषक तत्वांचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. नाचणीत कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, प्रोटीन्स, पॉलिसॅच्युरेडे फॅट्स असतात. नाचणी अनेक प्रकारच्या क्रोनिक आजारांपासून बचाव करते. 

ज्वारीचे पीठ

सध्या थंडीचे दिवस आहेत. ज्यामुळे ज्वारी, बाजरी अशा धान्यांचा तुम्ही आहारात समावेश करायला हवा. गव्हाबरोबर थोडं ज्वारीचे पीठ घेऊन  त्याच्या पोळ्या केल्या तर त्यातील पोषणमूल्य वाढतील आणि आतड्यांचे आरोग्यही चांगले राहील.

टॅग्स : हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स