Join us   

पावसाळ्यात ५ प्रकारच्या डाळी 'या' पद्धतीने खाल तर पचनक्रिया बिघडेल; वजनही वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2024 6:25 PM

Monsoon diet: 5 pulses to avoid during rainy season : ५ प्रकारच्या डाळी शिजवण्यापूर्वी भिजत घालावी का?

डाळी पौष्टिकतेने परिपूर्ण आहेत (Monsoon). यामध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम आणि लोह भरपूर प्रमाणात असते. तसेच शरीरातील अशक्तपणा दूर होण्यास मदत होते (Health care). पण प्रत्येक ऋतूनुसार खाद्यपदार्थ खाणं अवश्य आहे. अन्यथा हेल्दी पदार्थ खाऊनही आपण आजारी पडू शकता. प्रत्येक प्रकारची डाळ खायला हवी. पण पावसाळ्यात काही डाळी अशा आहेत, जे पचायला जड असतात. नीट पचन न झाल्यास गॅस, ॲसिडिटी, छातीत जळजळ, पोट फुगणे, पोटदुखी असे त्रास होऊ शकतात. पावसाळ्यात कोणत्या डाळी खाऊ नये पाहा(Monsoon diet: 5 pulses to avoid during rainy season).

'या' डाळी पचायला जड असतात

मसूर डाळ

चणा डाळ

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंच्या जेवणात सोयाबीन असल्याची चर्चा, पाहा भरपूर प्रोटीनसाठी सोयाबीन खाण्याचे फायदे

उडीद डाळ

हरभरा

राजमा

5 डाळी खाताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

जर आपल्याला या डाळी खायचे असतील तर, शिजवण्यापूर्वी त्यांना अधिक वेळ भिजत ठेवा. डाळीला फोडणी घालताना त्यात आलं, काळी मिरी, जिरे, हिंग या मसाल्यांचा वापर करा. यामुळे या डाळी पचायला वेळ लागणार नाही.

सॉरी, माय लव्ह! इटलीच्या खेळाडूने मागितली बायकोची जाहीर माफी, ऑलिंपिकमध्ये पाहा त्याने काय घोळ केला..

वेट लॉससाठी मदत

डाळी आणि राजमा खाण्याचे अनेक फायदे आहेत. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडीसीन या वेबसाईटनुसार, डाळी आणि राजमामध्ये फॅट आणि ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतात. शिवाय यात फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

व्हिटॅमिन-मिनरलची कमतरता होईल दूर

डाळीमध्ये व्हिटॅमिन बी, लोह, फोलेट, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक यांसारखे पोषक घटक असतात. या डाळीतील पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे नसा, हाडे आणि मेंदूचे कार्य बिघडू शकते.

ऊर्जेचा स्रोत

डाळीमध्ये हेल्दी कार्ब्स असतात. जे उर्जेचं उत्तम स्त्रोत आहे. त्यातील अँटिऑक्सिडंट पेशींना नुकसान होण्यापासून वाचवण्यास मदत करतात. डाळीमधील आयर्न हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहते.

टॅग्स : हेल्थ टिप्समोसमी पाऊसआरोग्य