काही दिवसात मान्सूनचं आगमन होईल. काही भागात तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी पावसाची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. पाऊस पडला की आपण अनेक ठिकाणी फिरायला जातो. थंड वातावरणात ठेल्यावरचं गरमागरम पदार्थ खातो. कांदा भजी, मक्का, वडा पाव, असे अनेक पदार्थ लोकं आवडीने खातात.
हा ऋतू जितका आनंददायी वाटतो, तितकाच या काळात आजारांचा धोकाही जास्त वाढतो. या ऋतूत निरोगी राहण्यासाठी, यासह आजार दूर ठेवण्यासाठी, आपण आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पावसाळ्यात पचनाच्या समस्या आणि अन्नातून विषबाधा होण्याचा धोका जास्त असतो. असे काही पदार्थ आहेत जे पावसाळ्यात खाल्ले तर आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. हे पदार्थ कोणते आहेत हे पाहूयात(Monsoon diet: Foods to eat and avoid during rainy season).
पालेभाज्या
पालेभाज्या या सिझनमध्ये अधिक प्रमाणात मिळतात. या भाज्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतात. मात्र, पावसाळ्यात ह्यूमिडिटी व पाणी साचल्यामुळे या भाज्या दूषित होतात. पालेभाज्यांमध्ये बॅक्टेरिया आणि पॅरासाइट लवकर निर्माण होतात. या भाज्यांच्या सेवनामुळे पाचन समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे या दिवसात जर आपण पालेभाज्या खात असाल तर, नीट धुवून - शिजवून खा.
शुगर आहे तर गव्हाची चपाती खाणे बंद? मग कोणती चपाती - भाकरी खाणे चांगले ठरेल..
स्ट्रीट फूड
पावसाळ्यात लोकं स्ट्रीट फूड जास्त प्रमाणात खातात. हे पदार्थ चवीला उत्कृष्ट व जिभेची चव वाढवतात. पण पावसाळ्यात हे पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो. रस्त्यावरील खाद्यपदार्थ पूर्णपणे स्वच्छ नसतात, त्यामुळे ते लवकर दूषित होऊ शकतात. चाट, पकोडे, समोसे असे सर्व रस्त्यावरचे पदार्थ आपल्या पचनासाठी चांगले नसतात. त्यामुळे हे पदार्थ घरी करून खा, पण बाहेरचे हे पदार्थ खाणे टाळा.
दुग्ध उत्पादने
पावसाळ्यात डेअरी प्रॉडक्ट्स ह्यूमिडिटी व योग्य रेफ्रिजरेशन न केल्यामुळे ते लगेच खराब होतात. कच्चे दूध, दही किंवा पनीर यांसारख्या नॉन-पाश्चराइज्ड डेअरी उत्पादनांमध्ये अनेक हानिकारक जीवाणू असतात. जे आपले पचनसंस्था बिघडवू शकतात. त्यामुळे हे पदार्थ खाताना शिजवून खा.
जेवल्यानंतर पोट डब्ब होतं, फुगल्यासारखं वाटतं? तज्ज्ञ सांगतात, ६ उपाय- पचन सुधारेल लवकर
पाणी
पावसाळ्यात पाणी दुषित होण्याचं प्रमाण अधिक असते. अशावेळी पाणी नेहमी गाळून, उकळवून, स्वच्छ करूनच प्यावे. अस्वच्छ पाणी प्यायल्यामुळे जुलाब, उलट्या, गॅस्ट्रो, कावीळ, असे गंभीर आजार निर्माण होऊ शकतात.