Join us   

Monsoon Diet : पावसाळ्याच्या दिवसात चुकूनही खाऊ नका ४ भाज्या;  घर बसल्या कधी आजारी पडाल कळणारही नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 12:49 PM

Monsoon Diet : फुलकोबीमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते, तसेच फायबरमुळे पचनक्रिया चांगली राहते. मात्र पावसाळ्यात खाल्ल्यास ही भाजी अनेक प्रकारे तुमचे नुकसान करू शकते.

पावसाळ्याचा महिना सुखावणारा तितकाच आरोग्यासाठी घातकही असतो. पावसाने कडाक्याची उष्णता, ऊन आणि प्रदूषणापासून दिलासा मिळतो, पाऊस पडला की आनंदाची अनुभूती येते. त्याच वेळी, या हंगामात जागोजागी पाणी तुंबते, रोग वाढतात आणि आर्द्रता असते.  पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी पोषणाचीही गरज असते. काही भाज्या अशा आहेत, ज्या खूप आरोग्यदायी असू शकतात, परंतु पावसाळ्यात तुम्हाला आजारी बनवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया पावसाळ्यात कोणत्या भाज्या खाऊ नयेत. (Vegetables you must avoid during the rainy season) जेणेकरून तुम्हाला तब्येत सांभाळता येईल.

वांगी

वांगी बर्‍याचदा बटाटे घालून किंवा भाजून बनवले जातात. जे भारतातील सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. वांग्याला इंग्रजीत एग्प्लान्ट किंवा ब्रिन्जल म्हणतात. एग्प्लान्ट अल्कलॉइड्सचा समृद्ध स्रोत आहे, एक प्रकारचे विषारी रसायन आहे जे काही भाज्या कीटकनाशके आणि कीटकांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी बनवतात. पावसाळ्यात किडींमुळे होणारे संक्रमण वेगानं पसरते. त्यामुळे या ऋतूत ते खाणे टाळावेत. अल्कलॉइड्समुळे मळमळ, पुरळ उठणे, अंगावर पित्ताच्या गाठी आणि इतर विविध एलर्जीची लक्षणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. म्हणून वांगी खाणं टाळावं.

हिरव्या पालेभाज्या

पावसाळा हा जिवाणू आणि सूक्ष्मजंतूंच्या प्रजननाचा काळ असतो ज्यामुळे हिरव्या पालेभाज्या दूषित होतात. लोह, फायबर, आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे जास्त असल्यामुळे या भाज्या खाण्याची शिफारस केली जाते, परंतु जर तुम्हाला पावसाळ्यात आजारी पडायचे नसेल तर त्या टाळल्या पाहिजेत.

रोज हे फळ खा, डायबिटीस, घातक कॉलेस्टेरॉल कायमचा टळेल धोका, NIH सांगितले ५ फायदे

फुलकोबी

फुलकोबीमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते, तसेच फायबरमुळे पचनक्रिया चांगली राहते. मात्र पावसाळ्यात खाल्ल्यास ही भाजी अनेक प्रकारे तुमचे नुकसान करू शकते. त्यात असलेले ग्लुकोसिनोलेट्स एक संयुग आहे. ज्याचे सेवन केल्याने पावसाळ्यात आजरपण येऊ शकते. 

शिमला मिरची

शिमला मिरची लाल, पिवळा आणि हिरव्या अशा अनेक रंगात येते. या भाजीमध्ये व्हिटॅमिन-सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. पण पावसाळ्यात शिमला मिरची खाल्ल्यावर ग्लुकोसिनोलेट्स आयसोथिओसायनेटमध्ये मोडतात. ज्यामुळे श्वसनाचा त्रास, मळमळ, उलट्या आणि जुलाब होऊ शकतात. म्हणून पावसाळ्याच्या दिवसात ही भाजी कमी प्रमाणात खावी.  

टॅग्स : अन्नहेल्थ टिप्स