Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स वापरतांना घ्यायची काळजी, ५ सोप्या टिप्स... डोळ्यांच्या संसर्गापासून करा बचाव...

पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स वापरतांना घ्यायची काळजी, ५ सोप्या टिप्स... डोळ्यांच्या संसर्गापासून करा बचाव...

Tips To Take Care Of Your Contact Lenses This Monsoon : पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स संसर्गाचे कारण बनू नये यासाठी काही खास टिप्स फॉलो कराव्यात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2023 08:22 PM2023-07-14T20:22:37+5:302023-07-14T20:41:48+5:30

Tips To Take Care Of Your Contact Lenses This Monsoon : पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स संसर्गाचे कारण बनू नये यासाठी काही खास टिप्स फॉलो कराव्यात...

Monsoon Eye Care : 5 Tips To Keep Infections and Irritation Away In Monsoon Season. | पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स वापरतांना घ्यायची काळजी, ५ सोप्या टिप्स... डोळ्यांच्या संसर्गापासून करा बचाव...

पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स वापरतांना घ्यायची काळजी, ५ सोप्या टिप्स... डोळ्यांच्या संसर्गापासून करा बचाव...

पावसाळा आला की आपल्या सगळ्यांना आनंद होतोच. पावसाळ्यात उष्णतेपासून आणि उन्हापासून आराम मिळत असला तरीही आजारपणाच्या अनेंक समस्या घेऊन येणारा हा पाऊस काहीवेळा नकोसा वाटतो. पावसाळ्यात आजारपणा सोबतच अनेक प्रकारचे इंफेक्शसन्स होण्याचा धोका संभवतो. यासाठीच पावसाळ्यात इंफेक्शसन्स होऊ नये म्हणून स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. आजकाल आपण चष्मा न वापरता डोळ्यांसाठी कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करतो. परंतु पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करणे हे डोळ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने धोक्याचे ठरू शकते. 

जे लोक आपल्या डोळ्यांसाठी कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करतात त्यांना पावसाळ्यात खूपच काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात ओलाव्यामुळे व आर्द्रतेमुळे कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करण्याऱ्या अनेक व्यक्तींना असंख्य समस्यांचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात जर डोळ्यांची किंवा कॉन्टॅक्ट लेन्सची योग्य ती काळजी घेतली नाही तर डोळ्याला खाज येणे, चुरचुरणे, डोळे लाल होणे, पापण्यांना सूज येणे अशा समस्या उद्भवतात. यासाठीच पावसाळ्यात डोळ्यांसाठी लेन्सचा वापर अतिशय काळजीपूर्वक करावा लागतो(Monsoon Eye Care : 5 Tips To Keep Infections and Irritation Away In Monsoon Season).

पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी ?      

१. लेन्स हाताळण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा :- कॉन्टॅक्ट लेन्स डोळ्यांत घालताना आपण पहिली एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे आपल्या हातांची स्वच्छता. लेन्स हाताळण्यापूर्वी हात साबणाने आणि पाण्याने चांगले धुवा. यामुळे हाताला चिकटलेली घाण किंवा जीवाणू लेन्सला चिकटत नाही. यामुळे  डोळ्यांच्या संसर्गास प्रतिबंध करण्यास मदत होईल. 

२. सनग्लासेसचा वापर करावा :- पावसाळ्यात पडणारा पाऊस आणि वाऱ्यापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी सनग्लासेस घाला. यामुळे कॉन्टॅक्ट लेन्स कोरडे ठेवण्यास मदत होईल. पावसाळ्यात सनग्लासेसचा वापर केल्याने जोरात कोसळणाऱ्या पावसांच्या सरीं अचानकपणे डोळ्यांवर येत नाही. यामुळे आपले डोळे व कॉन्टॅक्ट लेन्स पावसांत न भिजता सुरक्षित राहतात. 

पावसाळ्यात महिलांना होणारा ब्रेस्ट इन्फेक्शनचा त्रास कसा टाळायचा? पाहा कारणे आणि उपाय...

३. लेन्स केस कायम सोबत ठेवा :- कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांनी नेहमी लेन्स केस सोबत ठेवावे. कॉन्टॅक्ट लेन्स खराब किंवा कोरड्या झाल्यास, त्या आपण  काढून लेन्स केसमध्ये ठेवू शकता, ज्यामुळे ते सुरक्षित राहतील.    

पावसाळ्यात त्वचेला होणारे फंगल इन्फेक्शन कसे टाळायचे? ५ उपाय- गंभीर त्वचारोगांचा धोका टाळा...

४. पाण्याचा जास्त वापर टाळा :- लेन्स वापरणाऱ्यांनी पावसाळ्यात डोळ्यांना पाण्यापासून वाचवावे. याचबरोबर पावसाशिवाय इतर कोणत्याही प्रकारच्या ओलाव्यापासून संरक्षित केले पाहिजे. याचे मुख्य कारण असे की पाण्यात बॅक्टेरिया असू शकतात ज्यामुळे डोळ्यांना जळजळ आणि संसर्ग देखील होऊ शकतो. लेन्स घातल्यानंतर डोळे पाण्याच्या संपर्कात येऊ देऊ नये. पाण्यात असणारे बॅक्टेरिया लेन्सला चिकटण्याची शक्यता असते. शक्यतो लेन्स लावले असताना पाण्यांत भिजणे टाळावे. 

पावसाळ्यात मॉर्निंग वॉकला जाता येतं नाही? ६ सोपे उपाय, घरातच राहून वजन होईल कमी...

५. लेन्सची व्यवस्थित स्वछता राखावी :- लेन्स सुरक्षित व जंतू विरहित ठेवण्याकरता लेन्स केसच वापरा. दर २ महिन्याला लेन्स केस बदला. लेन्स डबीत ठेवताना अंतर्गोल असणारा भाग वरच्या बाजूस राहील असा ठेवावा. लेन्स कापडाने अथवा कागदाने पुसू नये. उत्तम प्रतीचे लेन्स सोल्युशन लेन्स साफ करण्यासाठी वापरा. लेन्स काढल्यावर डबीत ठेवाव्यात. सेमी सॉफ्ट आणि लेन्स नेहमी सोकिंग सोल्युशनमध्ये बुडवून ठेवाव्यात.

Web Title: Monsoon Eye Care : 5 Tips To Keep Infections and Irritation Away In Monsoon Season.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.