Join us   

पावसाळ्यात मुलं वारंवार आजारी पडतात, आलं-तुळशीचा चमचाभर रस ठरतो गुणकारी, पाहा कसा घ्यायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2022 4:14 PM

Monsoon Special Home Remedies for cough and cold and Immunity Boosting : हवाबदल होताना सर्दी-खोकला होऊ नये किंवा झाल्यावर लवकर बरा व्हावा यासाठी सोपा घरगुती उपाय...

ठळक मुद्दे मुलांना किंवा घरात कोणालाही कफ किंवा सर्दी-खोकला होणार असल्याची लक्षणे दिसल्यास हे चाटण नियमितपणे द्यावे.  तुळस आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असल्याने तिला आयुर्वेदात आणि धर्मातही बरेच महत्त्व आहे

पावसाळा सुरू होतो तशा शाळाही सुरू होतात. उकाडा संपून अचानक कधी दमट तर गार अशी हवा पडायला लागते. मधेच कडक ऊन पडते. (Monsoon Special) हवामानात होणारे बदल शरीरावर परिणाम करतात. शाळेत एकमेकांच्या सहवासात आल्याने विशेषत: या काळात लहान मुलांना पटकन सर्दी-खोकला, ताप, जुलाब अशा समस्या उद्भवतात. (Health care Tips) थोडी सर्दी झाली की ने डॉक्टरकडे आणि दे औषध असे केले तर मुलांची प्रतिकारशक्ती आहे त्यापेक्षा कमी होत जाते (Parenting tips). सतत औषधे घेतली तर शरीराची स्वत: एखाद्या विषाणूशी लढण्याची क्षमता कमी होत जाते. मात्र असे होणे आरोग्यासाठी चांगले नसते (Home Remedies for cough and cold and Immunity Boosting). 

(Image : Google)

यावर उपाय म्हणून आयुर्वेदात एक अतिशय सोपा उपाय सांगितला आहे. हा उपाय नियमित केल्यास मुलांची प्रतिकारशक्ती तर सुधारतेच. पण पावसाळ्याच्या दिवसांत होणाऱ्या संसर्गजन्य विकारांपासून त्यांची सुटका होऊ शकते. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून तयार होणारे आयुर्वेदिक चाटण पालकांनी या काळात मुलांना आवर्जून द्यायला हवे. इन्स्टाग्रामवर स्पेक्ट्रा मॉम या पेजवर याविषयी एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. घरच्या घरी एगदी ५ मिनीटांत हे औषध कसे करायचे, ते केव्हा द्यायचे आणि त्यामुळे होणारे फायदे याविषयी अगदी थोडक्यात सांगण्यात आले आहे. 

‘व्हिटॅमिन डी’ सतत आणि जास्त प्रमाणात घेतलं तर, सावधान तब्येत बिघडण्याचा धोका आहे..

१. तुळशीचे चाटण का? 

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुळस अतिशय उपयुक्त असते त्यामुळे आयुर्वेदातही तुळशीला अतिशय महत्त्व आहे. घरात सहज उपलब्ध असल्याने फारसे वेगळे काही न करता हे औषध तयार करता येते. हवामानबदलामुळे होणारी सर्दी-खोकला यांवर हे तुळस प्रभावी आहे. तुळशीमध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म असल्याने आरोग्यासाठी ती अतिशय उपयुक्त असते. 

२. चाटण कसे घ्यावे? 

तुळशीची ५ ते ७ पाने तोडून ती स्वच्छ धुवून घ्यावीत. ही पाने खलबत्ता किंवा मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून वाटावीत. यामध्ये थोडासा मध घालून पावसाळ्यात नियमितपणे मुलांना हे चाटण द्यावे. मधामुळे गोडसर चव आल्याने मुले आवडीने हे पितात. यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या विविध प्रकारच्या संसर्गांपासून दूर राहण्यास मदत होते. मुलांना हवाबदलामुळे थोडी सर्दी किंवा कफ असेल तर याच तुळशीच्या रसात थोडासा आल्याचा रस घालून द्यावा. आल्यामध्येही अनेक औषधी गुणधर्म असल्याने त्याचा सर्दी-कफ बरा व्हायला चांगली मदत होते. 

३. हे चाटण कधी द्यावे? 

- साधारणपणे मुलांची शाळा सुरू व्हायच्या आधी काही दिवस आणि सुरू झाल्यानंतर काही दिवस हे चाटण आवर्जून द्यायला हवे.  - ऋतूबदल म्हणजेच हवाबदल होतानाही हे चाटण आवर्जून द्यायला हवे.  - मुलांना किंवा घरात कोणालाही कफ किंवा सर्दी-खोकला होणार असल्याची लक्षणे दिसल्यास हे चाटण नियमितपणे द्यावे.  

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स