Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मान्सूनचं आगमन होताच मुलं आजारी पडतात? ४ हेल्दी पदार्थ; इम्युनिटी होईल बुस्ट - ताकद वाढेल..

मान्सूनचं आगमन होताच मुलं आजारी पडतात? ४ हेल्दी पदार्थ; इम्युनिटी होईल बुस्ट - ताकद वाढेल..

Monsoon tips for children: How to boost immunity in kids : पावसाळ्यात रोगांशी लढण्याची ताकद वाढेल, फक्त आहारात ४ गोष्टींचा समावेश करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2024 03:35 PM2024-06-12T15:35:46+5:302024-06-12T15:36:58+5:30

Monsoon tips for children: How to boost immunity in kids : पावसाळ्यात रोगांशी लढण्याची ताकद वाढेल, फक्त आहारात ४ गोष्टींचा समावेश करा..

Monsoon tips for children: How to boost immunity in kids | मान्सूनचं आगमन होताच मुलं आजारी पडतात? ४ हेल्दी पदार्थ; इम्युनिटी होईल बुस्ट - ताकद वाढेल..

मान्सूनचं आगमन होताच मुलं आजारी पडतात? ४ हेल्दी पदार्थ; इम्युनिटी होईल बुस्ट - ताकद वाढेल..

भारतात मान्सूनचे आगमन झाले आहे (Monsoon Tips). काही भागात धो- धो तर काही भागात तुरळक पावसाच्या सरी बरसत आहे. पण पावसाळा सुरु झाला की, लोक आजारी पडू लागतात (Immunity Boost). रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. या दिवसात स्वतःची काळजी घेतली नाही तर, इतर गंभीर आजारांनी आपले शरीर ग्रासते (Health Tips).

मुख्य म्हणजे लहान मुले अधिक आजारी पडतात. त्यामुळे या ऋतूत लहान मुलांची विशेष काळजी घ्यायला हवी. लहान मुलांना या दिवसात काय खायला द्यावे? कोणत्या गोष्टी खायला देऊ नये? यासंदर्भातील माहिती बालरोगतज्ज्ञ डॉक्टर अमित गुप्ता यांनी दिली आहे. त्यांच्या मते, 'मुलांच्या आहारात व्हिटॅमिन डी, झिंक आणि व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा'(Monsoon tips for children: How to boost immunity in kids).

लहान मुलांच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा?

लसूण

लसूणमध्ये अँटी-ऑक्सिडंट असतात जे शरीराची प्रतिकारशक्ती आणि चयापचय वाढवण्यास मदत करतात. लसूण आपण कोणत्याही भाजीत किंवा कोणत्याही डिशमध्ये वापर करू शकतो. पदार्थात लसूण घातल्याने चव दुपट्टीने वाढते. जर मुलांना लसूण आवडत नसेल तर, त्यांना लसूण चटणी खायला द्या. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढेल.

३०० रुपयांचे दागिने ६ कोटींना विकले, आरोपही फेटाळले- परदेशी महिलेला भारतीय सराफाने ' असा ' घातला गंडा

हळद

हळद आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. कर्क्यूमिन नावाचे तत्व असते. ज्यामुळे शरीराला अँटी-ऑक्सिडंट मिळते. आपण लहान मुलांना हळदीचा चहा तयार करून देऊ शकता. किंवा दुधात थोडी हळद मिक्स करून देऊ शकता. यामुळे त्यांना चांगली झोप येण्यास मदत होईल आणि संसर्गाशी लढण्यासही मदत होईल.

कारलं

कारल्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. जे लहानग्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. मुलांना साधारणपणे कारलं आवडत नाही. त्यामुळे त्यांना कारल्याचे चविष्ट पदार्थ बनवून खायला द्या.

अदिती सारंगधरला लागले होते बिअर पिण्याचे डोहाळे; पण गरोदरपणात बिअर प्यावी? स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात..

हंगामी फळे

पावसाळ्यात जी फळं उपलब्ध आहेत, ती फळं आपण लहान मुलांना खायला देऊ शकता. ब्लॅकबेरी, लिची, चेरी, प्लम्स आणि पीच मुलांना खायला द्या. शिवाय सफरचंद, केळी, नाशपाती आणि पपई देखील द्यावीत.

Web Title: Monsoon tips for children: How to boost immunity in kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.