Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सतत होणारे मूड स्विंग्ज टाळा, खा ५ गोष्टी- सतत मूड जा-ये करणार नाही- वाटेल एनर्जेटिक

सतत होणारे मूड स्विंग्ज टाळा, खा ५ गोष्टी- सतत मूड जा-ये करणार नाही- वाटेल एनर्जेटिक

Mood Food: 5 Foods That Can Really Boost Your Spirits आपला मूड नक्की कशाने जातो, आपण काय खातो त्याचा मूडवर काय परिणाम होतो हे तपासून पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2023 07:11 PM2023-06-22T19:11:52+5:302023-06-22T19:13:05+5:30

Mood Food: 5 Foods That Can Really Boost Your Spirits आपला मूड नक्की कशाने जातो, आपण काय खातो त्याचा मूडवर काय परिणाम होतो हे तपासून पाहा.

Mood Food: 5 Foods That Can Really Boost Your Spirits | सतत होणारे मूड स्विंग्ज टाळा, खा ५ गोष्टी- सतत मूड जा-ये करणार नाही- वाटेल एनर्जेटिक

सतत होणारे मूड स्विंग्ज टाळा, खा ५ गोष्टी- सतत मूड जा-ये करणार नाही- वाटेल एनर्जेटिक

मूड खराब होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. कामाचा तणाव, फॅमिली टेन्शन, अपूरी झोप, अनियमित जीवनशैली या कारणांमुळे मुड ऑफ होण्याची समस्या निर्माण होते. मुड खराब असताना कोणतंच काम करण्याची इच्छा होत नाही, आणि झालीच तर ते काम हमखास बिघडतं. कारण आपलं मन काम करण्यात साथ देत नाही.

शरीरातील उर्जा संपल्यासारखी वाटते. काही लोकं मूड ऑफ झाल्यानंतर स्ट्रेस - इटिंग करतात. ज्यामुळे वजन वाढू शकते.  हार्वर्ड मेडिकलने मूड सुधारण्यासाठी काही खाद्यपदार्थांची यादी तयार केली आहे, ज्याद्वारे नैराश्य दूर करून मूड सुधारला जाऊ शकतो(Mood Food: 5 Foods That Can Really Boost Your Spirits).

से नो टू पॅक्ड फूड

हार्वर्ड हेल्थनुसार, पॅकेज व प्रक्रिया केलेल्या पदार्थांऐवजी साधं अन्न खा. धान्य, भाज्या, फळे, सुका मेवा, हिरव्या पाले भाज्या, ऑलिव्ह ऑईल, बिया, बदाम इत्यादी पदार्थांचा आहारात समावेश करा.

डायबिटीस असेल तर नक्की प्या ४ गोष्टी, शुगर राहील नियंत्रणात

ज्यूस नको फळं खा

ताजी फळे आणि भाज्या खा. फ्रोजन फ्रूट व एडेड शुगर फ्रूट खाणे टाळा. यामुळे कॅलरीज वाढू शकते. नेहमी फ्रेश फळे आणि भाज्या खा. ज्यूस नको.

फायबरयुक्त धान्य

गहू, बार्ली, ब्राऊन राईस इत्यादींमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ते खा.

कष्टाने कमी केलेलं वजन पुन्हा भरभर वाढते? कारण तुम्ही करता ४ चुका..

मसाले

हार्वर्ड हेल्थच्या पोषणतज्ज्ञ उमा नायडू सांगतात, ''गरम मसाले मूड सुधारण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. मसाल्यांमध्ये अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट असतात. जे मेंदूमधून मुक्त रॅडिकल्स सोडतात, ज्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस येत नाही. मसाल्यांमध्ये दालचिनी आणि हळदीचे सेवन  प्रमाणात करा.

सुका मेवा

बदाम, अक्रोड, शेंगदाणे इत्यादींमध्ये अनेक प्रकारचे अँटी-ऑक्सिडंट असतात. जे मेंदूचे कार्य त्वरित सक्रिय करतात. याशिवाय यात दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात, जे मेंदूतील मुक्त रॅडिकल्स काढून टाकतात. त्यामुळे तुमचा मूड सुधारायचा असेल तर हे आरोग्यदायी पदार्थ खा.

Web Title: Mood Food: 5 Foods That Can Really Boost Your Spirits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.