Join us   

सकाळी उठल्यानंतर तोंडाला घाणेरडा वास येतो? 5 उपाय, दुर्गंधी दूर होऊन नेहमी वाटेल फ्रेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 12:16 PM

Morning Bad breath : अनेकदा तोंडातून वास येणं हे स्वच्छतेची काळजी न  घेतल्यामुळे उद्भवतं. अशा स्थितीत ओरल हायजीन मेटेंन करून तुम्ही ही समस्या टाळू शकता.

रात्री जेवल्यानंतर ब्रश करून झोपणं हा स्वच्छतेचा भाग आहे. पण रात्री ब्रश करून झोपल्यानंतरही सकाळी काहीजणांच्या तोंडातून दुर्गंधी येते. (Mouth Smell) ही खूपच कॉमन समस्या आहे जी प्रत्येकला जाणवते. वास्तविक तोंडातून येत असलेला दुर्गंध हा तुम्ही सेवनन करत असलेल्या अन्नामुळे किंवा पेयांमुळे येऊ शकतो.  (Morning Mouth Smell) अन्नाचे कण दातांमध्ये अडकतात त्यामुळे दुर्गंध येतो. अन्नाचे कण जितका वेळा तोंडात अडकून असतील तितका जास्तवेळ बॅक्टेरिया वाढतात त्यामुळे दुर्गंध येतो. (What Causes Morning Breath and How Do You Prevent It) नॉर्थ स्पेन फेमस ऑर्थेडॉन्टिस्ट डॉ खालिद कासेम यांनी दिलेल्या माहितीनुसार ही समस्या उद्भवल्यास घाबरण्याची काही गरज नाही काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही या समस्येपासून आराम मिळवू शकता.( 5 Ways to Get Rid of Bad Breath)

1) ओरल स्वच्छतेची काळजी (Maintain a good oral routine) 

अनेकदा तोंडातून वास येणं हे स्वच्छतेची काळजी न  घेतल्यामुळे उद्भवतं.  अशा स्थितीत ओरल हायजीन मेटेंन करून तुम्ही ही समस्या टाळू शकता. जेवल्यानंतर दातात अडकलेले अन्न कण काढण्यासाठी फ्लोसिंग करा आणि कमीत कमी दोन मिनिटांपर्यंत ब्रश करा. हिरड्या जीभही स्वच्छ करा. नेहमी फ्लोराईड टुथपेस्ट किंवा एंटी बॅक्टेरिअल माऊथवॉशचा वापर करा.(Morning mouth bad breath smell symptoms causes treatments)

2) स्वत:ला हायड्रेट ठेवा (Keep hydrated) 

आठ तास झोपल्यानं तुमचं तोंड सुकतं. अशावेळी लाळेत बॅक्टेरियाज जमा होतात. त्यामुळे दुर्गंध येतो.  जेव्हा आपण झोपतो तेव्हा लाळेचे उत्पादन कमी होते म्हणूनच झोपेतून उठल्यानंतर खूप तहान लागते. यामुळे  हायड्रेट राहण्यासाठी  भरपूर पाणी प्या.

फक्त १० रूपयात स्वच्छ करा काळं पडलेलं गॅस बर्नर; १ उपाय, किचन दिसेल स्वच्छ

3) तीव्र वास येणारे खाद्यपदार्थ टाळा (Switch out strong-smelling foods) 

अनेकांना जेवणात लसूण, कांदा खूप आवडतो. सकाळी येत असलेल्या दुर्गंधामागे हे कारण असू शकतं.  यामुळे बॅलेंस डाएट घ्या. जेणेकरून ओरल हेल्थ चांगली राहण्यास मदत होईल. बॅक्टेरियाजशी लढण्यास मदत करतील असे अन्नपदार्थ खा

4) रोज संत्री खा  (Eat oranges daily) 

संत्री खाल्ल्यानं दात स्वच्छ होण्यास मदत होते. कारण संत्र्यात व्हिटामीन सी असते.  यामुळे लाळेचे उत्पादन वाढून श्वासांची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. म्हणून रोज संत्री खायला हवं. 

नळातून कमी वेगानं पाणी येतं? ४ ट्रिक्स वापरा, प्लंबरला न बोलावताच पाण्याचा वेग वाढेल

5) कॅल्शियमयुक्त दही खा (Eat calcium-rich yogurt)

दह्यात लॅक्टोबॅसिलस नावाचे बॅक्टेरियाज असतात ते बॅक्टेरिअल बॅलेंन्स आणि श्वासाची दुर्गंधी कमी करण्यास मदत करतात. फ्लेवर्ड दही खाण्यापेक्षा कॅल्शियमयुक्त, फॅट नसलेलं दही खा. जर समस्या वाढत असतील तर डेंटिस्ट्ना जरूर भेटा. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स