Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > नव्या वर्षाचा संकल्प करताय, फिट व्हायचंय? सकाळी उठल्याउठल्या करा फक्त १ काम, दिवसभर राहाल फ्रेश

नव्या वर्षाचा संकल्प करताय, फिट व्हायचंय? सकाळी उठल्याउठल्या करा फक्त १ काम, दिवसभर राहाल फ्रेश

Morning Routine Tips Health Care Tips Ayurveda : आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपल्याला आहार-विहार आणि जीवनशैलीतील काही गोष्टींमध्ये आवर्जून बदल करावे लागतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2022 04:45 PM2022-12-12T16:45:29+5:302022-12-12T17:12:17+5:30

Morning Routine Tips Health Care Tips Ayurveda : आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपल्याला आहार-विहार आणि जीवनशैलीतील काही गोष्टींमध्ये आवर्जून बदल करावे लागतात.

Morning Routine Tips Health Care Tips Ayurveda : If you want a healthy new year, just do 1 thing when you wake up in the morning, you will stay fresh all day | नव्या वर्षाचा संकल्प करताय, फिट व्हायचंय? सकाळी उठल्याउठल्या करा फक्त १ काम, दिवसभर राहाल फ्रेश

नव्या वर्षाचा संकल्प करताय, फिट व्हायचंय? सकाळी उठल्याउठल्या करा फक्त १ काम, दिवसभर राहाल फ्रेश

Highlightsसकाळी उठल्यावर आपण पहिल्यांदा काय करतो यावर आपला संपूर्ण दिवस अवलंबून असतो..चहा-कॉफीची सवय वाईट असल्याने त्याऐवजी काय घेणे आरोग्यासाठी चांगले याबाबत..

डिसेंबर महिना म्हणजे इंग्रजी कॅलेंडरनुसार वर्षाचा शेवटचा महिना. नवं वर्ष सुरू होताना आपण गेल्या वर्षात काय केलं आणि येत्या वर्षात आपल्याला काय करायचं आहे याचं गणित मांडतो. येणारं वर्ष आनंदाचं आणि सुखासमाधानाचं जावं अशा शुभेच्छाही आपण एकमेकांना देतो. आता हे नवीन वर्ष चांगलं जायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आपले आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपल्याला आहार-विहार आणि जीवनशैलीतील काही गोष्टींमध्ये आवर्जून बदल करावे लागतात. येणारं वर्ष चांगले जावे यासाठी प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. नितिका कोहली यांनी इन्स्टाग्रामवर २१ दिवसांचे चॅलेंज असे म्हणत रोज आहाराशी निगडीत काही गोष्टी शेअर करण्याचे ठरवले आहे (Morning Routine Tips Health Care Tips Ayurveda). 

(Image : Google)
(Image : Google)

यातील पहिल्या पोस्टमध्ये डॉ. कोहली एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्याशी शेअर करतात. ती म्हणजे आपण सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिल्यांदा चहा किंवा कॉफी घेऊन दिवसाची सुरुवात करतो. वर्षानुवर्षे आपल्यापैकी अनेकांना हीच सवय असते. मात्र असे करणे चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याऐवजी सकाळी उठल्यावर चहा-कॉफी न घेता कोमट पाण्याने दिवसाची सुरुवात करायला हवी. सुरुवातीला ही गोष्ट तुम्हाला काहीशी अवघड जाईल. पण एकदा सवय झाली आणि तो तुमच्या दिनचर्येचा भाग झाला की तुमचा तुम्हाला यातील फरक कळेल. यामुळे केवळ तुमचे पचनकार्यच सुधारेल असे नाही, तर शरीरातील अनावश्यक टॉक्सिन्स बाहेर पडण्यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग होईल. काही काळ हा उपाय केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होण्यासही याचा चांगला उपयोग होईल. 

त्या म्हणतात, सकाळची वेळ ही आयुर्वेदानुसार आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाची वेळ असते. दिवसभर आपले शरीर वेगवेगळ्या अवस्थेतून जात असते आणि दिवसभर एनर्जी टिकून ठेवण्यासाठी कार्यरत असते. म्हणून दिवसाची सुरुवात चांगली होणे आवश्यक असते. सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफी घेणे यामुळे पचनाच्या नैसर्गिक क्रियेत अडचणी उद्भवतात आणि चेहऱ्यावर बरेच पिंपल्सही येतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर चहा-कॉफी घेण्याची सवय असेल तर ती सोडायला हवी असे डॉ. कोहली आवर्जून सांगतात.  

Web Title: Morning Routine Tips Health Care Tips Ayurveda : If you want a healthy new year, just do 1 thing when you wake up in the morning, you will stay fresh all day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.