Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > नाश्ता करूनही थकवा जाणवतो? वारंवार भूक लागते? सकाळी उठताच ५ पैकी एक गोष्ट खा; आरोग्यासाठी उत्तम

नाश्ता करूनही थकवा जाणवतो? वारंवार भूक लागते? सकाळी उठताच ५ पैकी एक गोष्ट खा; आरोग्यासाठी उत्तम

Morning superfoods: Here's what to eat on an empty stomach : नवं वर्षापासून लावा स्वतःला चांगली सवय, नाश्त्यापूर्वी रोज खा एक पदार्थ; वजन होईल कमी-दिवसभर राहाल एर्नेजेटिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2024 11:44 AM2024-01-01T11:44:52+5:302024-01-01T11:45:35+5:30

Morning superfoods: Here's what to eat on an empty stomach : नवं वर्षापासून लावा स्वतःला चांगली सवय, नाश्त्यापूर्वी रोज खा एक पदार्थ; वजन होईल कमी-दिवसभर राहाल एर्नेजेटिक

Morning superfoods: Here's what to eat on an empty stomach | नाश्ता करूनही थकवा जाणवतो? वारंवार भूक लागते? सकाळी उठताच ५ पैकी एक गोष्ट खा; आरोग्यासाठी उत्तम

नाश्ता करूनही थकवा जाणवतो? वारंवार भूक लागते? सकाळी उठताच ५ पैकी एक गोष्ट खा; आरोग्यासाठी उत्तम

बिघडलेल्या जीवनशैलीमुळे सगळं चक्र बिघडतं. वेळेवर जेवण न करणे, व्यायामाचा अभाव, यासह योग्य आहाराचे सेवन न केल्यामुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. मुख्य म्हणजे अनेकांना कशासोबत काय खावे? याची माहिती नसते. चुकीच्या फूड कॉम्बिनेशनमुळे पोटाचे विकार वाढतात. शिवाय दिवसभर काम करण्याची उर्जाही कमी होते. त्यामुळे तज्ज्ञ सकाळचा नाश्ता (Morning breakfast) हा योग्य आहाराने करावा असा सल्ला देतात. मात्र, नाश्ता करण्याआधीही असे काही पदार्थ आहेत, ज्याच्या सेवनाने आपल्याला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळू शकते (Health benefits). काही जण सकाळचा नाश्ता हा भरपेट करतात. पण ही पद्धत चुकीची आहे.

न्यूट्रिशनिस्ट किरण कुकरेजा यांच्या मते, 'नाश्ता करण्याआधी काही पदार्थ खाणं गरजेचं आहे. हे पदार्थ पॉवर बुस्टर म्हणून काम करतात. तसेच, शरीराला डिटॉक्स करण्यासाठीही फायदेशीर ठरतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यामध्ये जड अन्न खाण्याआधी ५ पैकी एक पदार्थ खा'(Morning superfoods: Here's what to eat on an empty stomach).

ब्रेकफास्टपूर्वी काय खावे?

भिजवलेला सुका मेवा

उत्तम आरोग्य हवं असेल तर, सकाळी न चुकता भिजवलेला सुका मेवा खा. यामुळे पचनक्रिया सुधारते, शिवाय पोषक तत्वांचे शोषण वाढवते. रिकाम्या पोटी रात्रभर भिजवलेले काजू, बदाम खाल्ल्याने मेंदूचे आरोग्य सुधारते. यासह दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते.

५ रुपयांच्या कढीपत्त्यात दडले असंख्य फायदे.. कोलेस्ट्रॉल ते बद्धकोष्ठतेचा त्रास कमी; आयुर्वेदिकतज्ज्ञ आचार्य बालकृष्ण सांगतात..

पपई

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पपई खाणे खूप फायदेशीर ठरते. यामुळे पचनक्रिया सुधारते. यामधील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे नाश्ता करण्याआधी नेहमी एक बाऊल पपई नक्की खा.

भाज्यांचा रस

रिकाम्या पोटी भाज्यांचा रस प्यायल्याने शरीरातील पोषक तत्वांचे प्रमाण वाढू शकते. शिवाय शरीर हायड्रेट तर होतेच, यासह बॉडी डिटॉक्स करण्यास मदत करते. यामुळे आरोग्याला अनेक फायदेही मिळतात.

भिजवलेले मनुके

सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खाल्ल्याने पोटाला आराम मिळतो. यातील आयर्न ब्लड सेल्स वाढवण्यास मदत करतात. यासह पचनक्रिया सुधारते. भिजवलेले मनुके हे उर्जेचं उत्तम स्त्रोत आहे. सकाळी मनुके खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते.

गायीचं की म्हशीचं? कोणतं दूध उत्तम? कोणत्या दुधामुळे हाडं मजबूत होतात? कधी, कोणी आणि कोणतं दूध प्यावं? पाहा..

बडीशेप

पोटाच्या आरोग्यासाठी बडीशेप फायदेशीर ठरते. बडीशेप खाल्ल्याने गॅस, अपचन आणि पोट फुगणे यांसारखे समस्या दूर होतात. आपण सकाळी रिकाम्या पोटी बडीशेपचा चहा तयार करून पिऊ शकता. यामुळे अपचनापासून आराम मिळतो.

केळी

रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते. मुख्य म्हणजे नियमित सकाळी एक केळी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. शिवाय दीर्घकाळ पोट भरलेले राहते. अशावेळी आपण उलट सुलट खाणं टाळतो. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

Web Title: Morning superfoods: Here's what to eat on an empty stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.