आपल्या रोजच्या जेवणात थोडंसं का असेना पण तूप असायलाच पाहिजे. कारण तुपामध्ये हेल्दी फॅट खूप जास्त प्रमाणात असतात. याशिवाय तुपामधून ओमेगा ३, ओमेगा ६, प्राेटीन्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के देखील चांगल्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे तूप खायलाच पाहिजे. पण तूप खाताना आपण चुकत तर नाही ना याचीही काळजी घेण्याची गरज आहे. कारण बरेच लोक तूप खाताना एक कॉमन चूक करतात आणि ती चूक करून तूप खाण्यापेक्षा ते न खाणं बरं असं आयुर्वेदतज्ज्ञ सांगत आहेत (Correct Method Of Eating Ghee). कारण त्या चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही तूप खाल्लं तर त्यामधले सगळे पौष्टिक घटक नष्ट होतात आणि एवढंच नाही तर ते आरोग्यासाठी घातकही ठरतं..(most of people makes common mistakes while eating ghee)
तूप खाण्याची योग्य पद्धत कोणती?
तूप खाण्याची योग्य पद्धत कोणती याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ तज्ज्ञांनी amiettkumar या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
मुलांचं वजन वाढण्यासाठी मदत करणारे ५ पदार्थ
यामध्ये त्या सांगत आहेत की तूप कधीही गॅसवर गरम करून खाऊ नका. बऱ्याचदा आपण पुरणपोळीवर किंवा पराठ्यांवर तूप घालून ते खातो. पण असं करताना अनेक घरांमध्ये तुपाचं भांडं थेट गॅसवर ठेवून तूप गरम केलं जातं. अशा पद्धतीने तूप गरम करणं अतिशय चूक आहे. कारण या पद्धतीने तूप तापवल्यामुळे त्यातले पौष्टिक घटक नष्ट होतात.
त्यामुळे एक तर तूप गरम करून खाणेच टाळले पाहिजे असं त्या सांगतात. आणि त्याशिवाय दुसरं म्हणजे जर तूप गरम करायचंच असेल तर डबल बॉईलिंग पद्धतीने ते गरम करावे.
'यापेक्षा' स्वस्त आणि मस्त स्किन केअर रुटीन असूच शकत नाही! फक्त ५ गोष्टी- पिंपल्स- पिगमेंटेशन गायब
म्हणजेच एका भांड्यात गरम पाणी घ्यावे आणि त्या गरम पाण्यावर तुपाचे भांडे ठेवून त्यातले तूप वितळू द्यावे. या पद्धतीने तूप गरम केल्यास त्याच्यातील पौष्टीक घटक जशासतसे टिकून राहतात.