Join us   

सौंदर्यच नाही तर तब्येतही जपणाऱ्या ३ घटकांची असते अनेक महिलांमध्ये कमतरता! तुम्हीही त्यांच्यापैकीच नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2022 12:52 PM

Women's Health: बहुतांश महिलांमध्ये तब्येतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या या ३ घटकांची कमतरता (deficiency of 3 food items) दिसून येते. खालीलपैकी काही त्रास होत असेल, तर तुमच्यातही या काही घटकांची कमतरता नाही ना, हे एकदा तपासून पहा...

ठळक मुद्दे सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पुजा माखिजा यांनी एक व्हिडिओ नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला असून यामध्ये त्यांनी बहुतांश महिलांच्या शरीरात ज्या ३ व्हिटॅमिन्सची प्रमुख कमतरता दिसून येते, त्याविषयी माहिती दिली आहे. 

कुटूंबातील सगळ्या सदस्यांची काळजी घेणाऱ्या, घरातील प्रत्येकाच्या पोटात पौष्टिक पदार्थ (healthy food) जावेत म्हणून धडपडणाऱ्या महिला स्वत:च्या तब्येतीच्या बाबतीत मात्र तेवढ्याच उदासिन दिसतात. स्वत:चा आहार आणि व्यायाम, स्वत:ची तब्येत या गोष्टींकडे अनेकजणी दुर्लक्ष करतात. त्यामुळेच तर मग कमी वयातच तब्येत (most common health issues in women) कुरकुरायला लागते. पण अनेक जणी त्याकडेही फार गांभिर्याने लक्ष देत नाहीत. पण भविष्यात कोणतं आजारपण नको असेल तर कमी वयापासूनच स्वत:ची तब्येत सांभाळा आणि आहाराकडे लक्ष द्या. सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पुजा माखिजा यांनी एक व्हिडिओ नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला असून यामध्ये त्यांनी बहुतांश महिलांच्या शरीरात ज्या ३ व्हिटॅमिन्सची प्रमुख कमतरता (deficiency of vitamins) दिसून येते, त्याविषयी माहिती दिली आहे. 

 

तुमच्याही शरीरात या व्हिटॅमिन्सची कमतरता नाही ना? १. व्हिटॅमिन डी (vitamin D) - यालाच आपण सनशाईन व्हिटॅमिन म्हणूनही ओळखतो.

हिरव्या रंगाची कॉफी, वेटलॉससाठी अतिशय उपयुक्त, बघा नेमका काय हा प्रकार- कशी करायची हिरवी कॉफी  - या व्हिटॅमिनची कमतरता असेल तर रक्तातील साखरेची पातळी आणि इन्सुलिनचे प्रमाण यावर खूप परिणाम होतो. - त्यातून अनेक महिलांना लठ्ठपणाचा त्रास उद्भवतो. - तसेच बऱ्याच जणींना पीसीओएसचा त्रासही होतो. - दही, दूध, तूप, संत्री या पदार्थांतून तसेच कोवळ्या सुर्यप्रकाशात काही काळ थांबल्याने व्हिटॅमिन डी मिळते.

 

२. व्हिटॅमिन बी १२ (Vitamin B12) - या व्हिटॅमिनची कमतरता असणाऱ्या महिलांचे प्रमाण खूप जास्त आहे. - बी १२ च्या कमतरतेमुळे शरीरात लाल रक्तपेशी तयार होण्याचे प्रमाण कमी होते.

३० दिवसांचं वॉटर चॅलेंज! वजन घटवण्याच्या नव्या ट्रेण्डमागे पब्लिक पागल, पण तज्ज्ञ सांगतात.. - यामुळे पचन क्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे पचनाच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. - मेंदूशी संबंधित अनेक क्रियांमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे मेंदूशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढतो. 

 

३. क्रोमियम (chromium) - पीसीओएसचा त्रास वाढविण्यासाठी क्रोमियमची कमतरता कारणीभूत ठरते. - यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण आणि शरीरात इन्सुलिन तयार होणे, या दोन्ही गोष्टींवर परिणाम होतो.  - द्राक्ष, टोमॅटो, संत्री, हिरव्या रंगाच्या शेंगा यातून क्रोमियम मिळते. 

 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सइन्स्टाग्राम