पावसाळ्याच्या (MonSoon) दिवसांत अनेक रानभाज्या दिसायला सुरूवात होते. कंटोळ्यांची भाजी खाल्ल्यानेही शरीराला अनेक फायदे मिळतात. कंटोळ्यांच्या भाजीला ककोडा, गोड कारलं, कार्कोटका असंही म्हटलं जातं. (Vegetable Kantola Health Benefits) ही एक पौष्टीक भाजी आहे जिच्या सेवनाने शरीराला वेगवेगळे फायदे मिळतात. (Most Powerful Indian Vegetable Kantola Health Benefits For Cholesterol Diabetes And Weight Loss)
कंटोल्यांमध्ये (Kantola) उच्च प्रमाणात फायबर्स असतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि ही भाजी अनेक समस्यांपासून आराम देते. कंटोल्यांच्या भाजीचे सेवन केल्यानं ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. यात असे काही गुण असतात ज्यामुळे शरीरातील साखरेचा स्तर संतुलित राहण्यास मदत होते होते. कंटोळ्यांमुळे ग्लायसेमिक इंडेक्स कमी होते. शुगरच्या रुग्णांसाठी हा चांगला पर्याय आहे.
कंटोळ्यांमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया सोपी होते. यात फॅट्सही कमी असतात वजन कमी करण्यासाठी ही उत्तम भाजी आहे. कंटोळ्यांमध्ये व्हिटामीन सी चे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे इम्यून सिस्टिम वाढण्यास मदत होते. शरीर संक्रमणांपासून बचाव करते. यातील एंटी ऑक्सिडेंट्स शरीराला फ्री रॅडिकल्सपासून होणारं नुकसान वाचवतात. कंटोळ्यांचे नियमित सेवन केल्यानं रक्तातील कोलेस्टेरॉलचा स्तर कमी होते.
पोट कमी करायचंय-पण डाएट नको? रोज किती चपात्या खाव्यात याचं सोपं गणित पाहा; स्लिम राहाल
ज्यामुळे हृदयाच्या आजारांचा धोकाही कमी होतो. यात पोटॅशियमचे प्रमाण असते ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते. कंटोळ्यांची भाजी तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपात शिजवू शकता. भाजून किंवा ग्रेव्ही भाजीच्या स्वरूपातही खाऊ शकता.
कंटोळ्यांची भाजी, हाय बीपीच्या समस्या टाळण्यास मदत होते. यात मॅग्नेशियम, पोटॅशियम भरपूर असते. हृदयाचे आरोग्य चांगले राहते. बीपी कंट्रोल करण्यास मदत होते. ब्लड वेसल्स हेल्दी राहतात. ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. हाय बीपी रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.
मुलांचा मेंदू तल्लख होईल-स्मरणशक्ती वाढेल; रोज ५ पदार्थ खायला द्या, शार्प माईंड होईल
कंटोळा एंटी बॅक्टेरिअल आणि एंटीफंगल गुणांनी परिपूर्ण असते. ज्यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवत नाहीत. इन्फेक्शन कमी होते. ज्यामुळे हंगामी आजारांपासून बचाव होतो. कंटोळे उकळवून खा नंतर याचे पाणी प्या. ज्यातून जास्तीत जास्त एक्स्टॅक्ट मिळेल.