Join us   

Mouth smell home remedies : रोज व्यवस्थित ब्रश करूनही तोंडातून दुर्गंधी येते? ५ उपाय घ्या वेळी अवेळी येणारी दुर्गंधी नेहमी राहील दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 11:43 AM

Mouth smell home remedies : तुम्ही अशा काही घरगुती पदार्थांचाही वापर करू शकता जे माऊथ फ्रेशनर म्हणून काम करतात. यामुळे तुमच्या तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीपासून आराम मिळू शकतो

रोज दोनवेळा ब्रश करूनही अनेकांच्या तोंडाला दुर्गंधी जाणवते. खरं तर हे सकाळी घडते कारण रात्रभर तोंडात बॅक्टेरिया जमा होतात. त्यामुळे तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. जरी ही एक अतिशय सामान्य गोष्ट आहे. परंतु काही लोकांमध्ये ही समस्या कायम जाणवते.  (How can I remove bad smell from my mouth) अशा स्थितीत चार चौघात गेल्यानंतर तोंडात जाणवणारा दुर्गंध समस्येचं कारण ठरू शकतो.  तुम्ही अशा काही घरगुती पदार्थांचाही वापर करू शकता जे माऊथ फ्रेशनर म्हणून काम करतात. यामुळे तुमच्या तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीपासून आराम मिळू शकतो.  (Mouth smell home remedies)

मध आणि दालचीनी

मध आणि दालचिनी हे दोन्ही त्यांच्या गुणधर्मांमुळे शतकानुशतके भारतीय आयुर्वेदाचा भाग आहेत. अशा स्थितीत जर तुमच्या तोंडातून दुर्गंधी येत असेल तर तुम्ही या दोन्हीची पेस्ट दातांवर आणि हिरड्यांवर लावू शकता. याच्या नियमित वापराने तोंडातून येणारा वास आणि हिरड्यांमधून येणारे रक्त थांबवता येते.  दालचिनी आणि मधामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात, जे दात आणि हिरड्यांची काळजी घेतात आणि श्वासाच्या दुर्गंधीच्या समस्येपासून देखील आराम देतात.

खूप पाणी प्या

जर तुम्ही दिवसभर पाणी कमी प्यायले तर हे देखील तुमच्या तोंडातून दुर्गंधी येण्याचे कारण असू शकते. अशा स्थितीत  वासापासून सुटका मिळवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्यावे.  तोंडातील बॅक्टेरिया पाण्याद्वारे बाहेर पडतात, तसेच त्यांची संख्या वाढत नाही.  जर तुमच्या तोंडाला दुर्गंधी येत असेल तर तुम्ही भरपूर पाणी पिण्यास सुरुवात करा. याशिवाय पाण्यात लिंबाचा रस टाकूनही पिऊ शकता.

हार्ट अटॅकचं लक्षणं की इतर कारणांमुळे छातीत दुखतंय? जाणून घ्या ७ लक्षणं, कारणं आणि उपाय

लवंग चावून खा

लवंग हा भारतीय स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्‍या जुन्या मसाल्यांपैकी एक आहे.  लवंगात असे गुणधर्म आहेत जे तोंडाच्‍या आत बॅक्टेरियाची संख्‍या कमी करतात आणि श्‍वासाच्या दुर्गंधीपासून ते किडणे आणि रक्तस्‍राव यांसारख्या दातांच्या इतर समस्यांपासून आराम देतात. यासाठी तुम्ही लवंगाचे काही तुकडे तोंडात ठेवू शकता किंवा चघळू शकता. असे केल्याने तोंडाला वास येणार नाही.

जीम, डाएटचं टेंशन विसरा; रोज रात्री फक्त एक काम केल्यानं लवकर वजन होईल कमी

दालचिनी

गोड-चविष्ट दालचिनीची साल लवंगाप्रमाणे तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीपासूनही आराम देते. यासोबतच ते तोंडात असलेल्या बॅक्टेरियाला वाढण्यापासून रोखते. तुम्हाला फक्त दालचिनीच्या सालाचा एक छोटा तुकडा काही वेळ तोंडात ठेवावा लागेल आणि नंतर फेकून द्यावा लागेल.

मीठाच्या पाण्याच्या गुळण्या

तुम्ही याआधी अनेक वेळा मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्या असतील.  मिठाच्या पाण्यानं गुळण्या केल्यानं दुर्गंधीपासून आराम तर मिळतोच याशिवाय तोंडात उपस्थित बॅक्टेरियाजची वाढही थांबते. एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा मीठ घालून त्या पाण्यानं  गुळण्या केल्यास आराम मिळेल.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य