Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > लहान मुलांच्या डोळ्यांना मायोपियाचा धोका! मुलांचे डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी ५ गोष्टी, नजरेवर परिणाम कायमचा

लहान मुलांच्या डोळ्यांना मायोपियाचा धोका! मुलांचे डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी ५ गोष्टी, नजरेवर परिणाम कायमचा

Eye Care Tips For Kids: लहान मुलांमध्ये मायेपिया या डोळ्यांचा आजाराचा धोका वाढतो आहे, असं सांगणारा नुकताच एक अभ्यास प्रकाशित झाला आहे...(parents must do 5 things for saving eyesight of their kids)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2024 04:59 PM2024-12-02T16:59:40+5:302024-12-02T17:14:22+5:30

Eye Care Tips For Kids: लहान मुलांमध्ये मायेपिया या डोळ्यांचा आजाराचा धोका वाढतो आहे, असं सांगणारा नुकताच एक अभ्यास प्रकाशित झाला आहे...(parents must do 5 things for saving eyesight of their kids)

myopia is increasing rapidly in indian kids, parents must do 5 things for saving eyesight of their kids | लहान मुलांच्या डोळ्यांना मायोपियाचा धोका! मुलांचे डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी ५ गोष्टी, नजरेवर परिणाम कायमचा

लहान मुलांच्या डोळ्यांना मायोपियाचा धोका! मुलांचे डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी ५ गोष्टी, नजरेवर परिणाम कायमचा

Highlightsडोकेदुखी, टीव्ही बघताना डोळे बारीक करून टीव्ही- मोबाईल बघणं किंवा डोळ्यांतून सतत पाणी येणं अशी लक्षणं मुलांमधे दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

हल्ली मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप असं काहीही न बघणारे लहान मूल क्वचितच एखादं सापडेल. बहुतांश मुलांना मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही या स्क्रीनचं अक्षरश: वेड लागलं आहे. उठल्या उठल्या आधी मोबाईल बघणारे आणि दिवसभर कामानिमित्त लॅपटॉपच्या स्क्रिनला चिटकून बसणारे, त्यानंतरही घरी आल्यावर टीव्ही पाहून रिलॅक्स होणारे पालक घरात असल्यावर मुलं वेगळं तरी काय करणार. पण लहान मुलांचे डोळे नाजूक असतात. त्यामुळे जास्त प्रमाणात स्क्रिन पाहिल्याने त्यांच्यामध्ये मायोपिया हा दृष्टीदोष वाढतो आहे (myopia in kids), असं सांगणारा अहवाल “Time trends on the prevalence of myopia in India - A prediction model for 2050” या अभ्यासात मांडण्यात आला आहे.(Eye Care Tips For Kids)

 

मायोपिया म्हणजे नेमकं काय?

मायोपिया हा दृष्टीशी संबंधित एक आजार असून यामध्ये मुलांना दुरचं दिसायला त्रास होतो. आधीच स्क्रीन बघण्याचं वाढलेलं प्रमाण, मैदानी खेळ न खेळणं आणि त्यात योग्य आहाराची कमतरता.

पोटावरची चरबी वाढल्याने साडी नेसल्यावर पोट मोठं दिसतं? ६ टिप्स- दिसाल एकदम सुडौल- स्मार्ट

यामुळे हा आजार मुलांमध्ये खूपच वाढला आहे, असं या अभ्यासात सांगण्यात आलं असून २०५० पर्यंत तर हा आजार खूपच वाढणार असल्याचं नेत्रतज्ज्ञ सांगतात. पुस्तकं वाचताना किंवा लिखाण करताना काही मुलं पुस्तक डोळ्याच्या खूपच जवळ धरतात. यामुळेही डोळ्यांना हा त्रास होऊ शकतो.

 

मुलांना मायोपियाचा त्रास होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?

मुलांना मायोपियाचा त्रास होऊ नये म्हणून पालकांनी मुलांची कशा पद्धतीने काळजी घ्यावी, याविषयी तज्ज्ञांनी सांगितलेल्या काही  महत्त्वाच्या गोष्टी...

१. मुलांना काही त्रास होवो अथवा न होवो, पण दर ६ महिन्यांनी मुलांची डोळे तपासणी करायलाच पाहिजे.

२. मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी किंवा घराबाहेर पडून काहीतरी खेळण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित करा.

मार्गशीर्ष गुरुवार विशेष रांगोळ्या- फक्त ५ मिनिटांत काढा सुरेख रांगोळी- पाहूनच मन होईल प्रसन्न

३. मुलांचा स्क्रिनटाईम खूप मर्यादित करा. कारण हल्ली मुलांना टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप यापासून दूर ठेवताच येत नाही. पण त्यांचं गॅझेट्स बघण्याचं प्रमाण मात्र मर्यादित ठेवा.

४. डोकेदुखी, टीव्ही बघताना डोळे बारीक करून टीव्ही- मोबाईल बघणं किंवा डोळ्यांतून सतत पाणी येणं अशी लक्षणं मुलांमधे दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

५. मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्या. डोळ्यांच्या आरोग्यासाठी पोषक ठरणारे पदार्थ मुलांना जास्त प्रमाणात खायला द्या. 

 

Web Title: myopia is increasing rapidly in indian kids, parents must do 5 things for saving eyesight of their kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.