Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > गॅसेसचा त्रास फार, पोट सतत फुगते? १ सोपा उपाय, पोटाला मिळेल चटकन आराम

गॅसेसचा त्रास फार, पोट सतत फुगते? १ सोपा उपाय, पोटाला मिळेल चटकन आराम

Nabhi massage for gas and constipation problems : ना चूर्ण पावडर-ना आयुर्वेदिक पाणी. गॅसेसमुळे पोट फुग्यासारखे फुगले असेल तर, तर एक सोपा उपाय करून पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2023 03:30 PM2023-12-03T15:30:01+5:302023-12-03T16:26:17+5:30

Nabhi massage for gas and constipation problems : ना चूर्ण पावडर-ना आयुर्वेदिक पाणी. गॅसेसमुळे पोट फुग्यासारखे फुगले असेल तर, तर एक सोपा उपाय करून पाहा..

Nabhi massage for gas and constipation problems | गॅसेसचा त्रास फार, पोट सतत फुगते? १ सोपा उपाय, पोटाला मिळेल चटकन आराम

गॅसेसचा त्रास फार, पोट सतत फुगते? १ सोपा उपाय, पोटाला मिळेल चटकन आराम

आपली लाईफस्टाईल आणि खाण्याच्या सवयींचा थेट परिणाम गट हेल्थवर (Gut Health) होतो. सध्या लोकं हेल्दी पदार्थ खाण्याऐवजी फास्ट फूड आवडीने खात आहेत. ज्यामुळे पोट तर बिघडतेच, शिवाय आरोग्यावरही परिणाम होते. आरोग्याचे केंद्र पोट आहे, जर यात गडबड झाली तर संपूर्ण आरोग्य बिघडते. त्यामुळे आपल्या आहारात नेहमी पौष्टीक पदार्थांचा समावेश करा.

अनेकदा जेवल्यानंतर पोट फुगते, कधीकधी पोटातील गॅस नीट पास होत नाही. ज्यामुळे अस्वस्थता, पोटदुखी, फुगणे या समस्यांना सामोरे जावे लागते. जर पोटातील गॅस पास करण्याचे इतर उपाय फेल ठरत असतील तर, हेल्थ आणि योगा एक्स्पर्ट नुपूर रोहतगी यांनी सांगितलेला एक उपाय करून पाहा. या उपायामुळे काही मिनिटात आराम मिळेल. शिवाय पोटात पुन्हा गॅसेसचा त्रास होणार नाही(Nabhi massage for gas and constipation problems).

यासंदर्भात हेल्थ एक्स्पर्ट नुपूर रोहतगी सांगतात, 'जर आपल्याला अन्न खाल्ल्यानंतर हेविनेस, ब्लोटिंग किंवा गॅसेसचा त्रास होत असेल तर, नाभीजवळ मसाज करा. यामुळे आपल्याला त्वरित आराम मिळेल. शिवाय पोटात पुन्हा गॅसेसचा त्रास होणार नाही.'

पोट साफ होत नाही, जोर लावावा लागतो? बद्धकोष्ठतेवर घरगुती ५ उपाय, पोट होईल साफ-सकाळी एकदम ओके

गॅस पास करण्यासाठी नाभी मसाज

- नाभी मसाज करण्यासाठी सर्वप्रथम सरळ उभे राहा.

- नंतर एका मिनिटासाठी नाभीजवळ बोटाने क्लॉक आणि अँटी क्लॉक डायरेक्शनमध्ये मालिश करा.

- त्याचप्रमाणे नाभीच्या खाली क्लॉक आणि अँटी क्लॉकच्या दिशेने मालिश करा.

- असं वारंवार केल्याने पोटात अडकलेली गॅस निघून जाईल. पोटाला आराम मिळेल.

इतर उपाय

सारा अली खान आणि अनन्या पांडे ज्याच्या फॅन, त्या ओरीचा फिटनेस फंडा वाचा..उगीच नाही सेलिब्रिटी त्याच्यावर फिदा..

- पोटात वारंवार गॅस तयार होत असेल तर, जेवल्यानंतर बडीशेप, जिरे किंवा ओवा खा. त्यांनतर पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि पाणी घालून प्या.

- जेवल्यानंतर नेहमी शतपावली करा. यामुळे पोटातील गॅस निघून जाते. अडकून राहत नाही.

- अन्न नीट ३२ वेळा चावून खा.  पोटात गॅस निर्माण करणारे पदार्थ खाणं टाळा.

Web Title: Nabhi massage for gas and constipation problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.