Join us   

National Blue Jeans Day : रंगबिरंगी टाइट जिन्स घालताय? ३ दुष्परिणाम, स्किन ॲलर्जीचाही धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2022 6:37 PM

Jeans Day 2022 : आज नॅशनल ब्लू जीन्स डे, टाईट आणि रंगीत जीन्स शरीरासाठी हानिकारक, ॲलर्जी होण्याचा धोका

सध्या जीन्सचा ट्रेण्ड सुरू आहे. अनेक प्रकारचे जीन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. काळी आणि निळी रंगाची जीन्स सगळ्यांकडे असते. हा कलर आता कॉमन झाला आहे. सध्या विविध रंगांच्या जीन्सला मागणी जोर धरू लागली आहे. महिलांमध्ये देखील जीन्सची क्रेझ पाहायला मिळते. कोणत्याही कपड्यांवर जीन्स सूट होते. आज नॅशनल ब्लू जीन्स डे आहे. या दिनानिमित्त आपण रंगीत जीन्स घालण्याचे दुष्परिणाम जाणून घेऊयात.

रंगीत जीन्स घालण्याचे तोटे

जीन्स रंगवण्यासाठी अनेक रसायने वापरली जातात. अशा परिस्थितीत आपल्या स्कीनवर केमिकलचे दुष्परिणाम होऊ शकतात. जीन्सला रंग देण्यासाठी सिंथेटिक रंगांचा वापर केला जातो. याने आपल्या त्वचेवर गंभीर दुष्परिणाम होतात. जर आपल्याला ऍलर्जीचा त्रास असेल तर, रंगीत जीन्स अधिक वेळ घालणे टाळा. 

रक्ताभिसरण

बहुतांश जणांना टाईट जीन्स घालायला आवडते. कारण ती फिट आणि व्यवस्थित दिसते. मात्र, फिट जीन्स घालणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. टाईट जीन्स घातल्याने रक्ताभिसरण नीट होत नाही. त्यामुळे शरीरात सूज येणे, दुखणे यासारख्या समस्या उद्भवू लागतात.

त्वचेची समस्या

टाईट जीन्स त्वचेसाठी हानिकारक मानले जाते. त्यामुळे विविध समस्या उद्भवू शकतात. टाईट जीन्समुळे रक्ताभिसरण आणि नर्वस सिस्टमवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे टाईट रंगीत जीन्स घालणे टाळा.

टॅग्स : आरोग्यलाइफस्टाइल