शरीरात उद्भवणाऱ्या अधिक समस्या टाळण्यासाठी घरगुती उपायांचा वापर केला जातो हे तुम्ही लहानपणापासून पाहात आले असाल. (Home remedies for leg pain) लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वचजण वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी मीठाच्या पाण्याचा वापर करतात. चालल्यानंतर जर पाय दुखत असतील तर तुम्ही मीठाच्या पाण्याच्या पाय बुडवून ठेवू शकता. (Natural Home Remedies for Leg Pain)
दातांमध्ये वेदना होत असतील तर मीठाच्या पाण्यानं शेकल्यास आराम मिळतो. या पाण्यानं अंघोळही तुम्ही करू शकता. (Natural Remedies To Relieve Leg Pains) मीठाच्या पाण्यात एंटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे सूज कमी होण्यास मदत होते. यामुळे बॉडी टिश्यूजमध्ये जमा झालेलं एक्स्ट्रा फ्लूएड कमी होतं आणि वॉटर रिटेंशनची समस्या दूर होते. (Is it ok to soak your feet in hot water with salt for foot pain)
मीठाच्या पाण्यानं कितपत फायदे मिळतात?
मीठात नैसर्गिक हिलिंग गुण असतात. यामुळे सूज आणि वेदनांपासून आराम मिळण्यास मदत होते. मांसपेशींनाही आराम मिळतो. या पाण्याने वेदनादायक किंवा सुजलेल्या भागावर शेक घेतल्स या समस्यांपासून त्वरित आराम मिळू शकतो. एवढेच नाही तर स्नायूंनाना आराम मिळतो.
जर तुम्हाला सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवत असेल तर कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या करा. यामुळे घश्यातील वेदना, सूज, खोकल्यापासून आराम मिळेल. मीठाचं पाणी प्यायल्यानं पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. गॅस, इन्डायजेशन, वजन कमी घटवण्यासाठी मीठाच्या पाण्याचे सेवन केले जाऊ शकते. याव्यतिरिक्त हाडं निरोगी राहण्यासही हे पाणी फायदेशीर ठरते.
पाय दुखण्याच्या अनेक सामान्य कारणांमध्ये तुम्ही कसे बसता आणि तुम्ही कोणत्या प्रकारचे शूज घालता याचा समावेश होतो. बराच वेळ बसणे किंवा उभे राहणे, जास्त चालणे किंवा धावणे यामुळेही पाय दुखू शकतात, परंतु हे दुखणे औषधोपचाराने किंवा व्यायामाने बरे होते. तात्पुरता उपाय म्हणून तुम्ही मीठाच्या पाण्यानं पाय शेकू शकता. २
ज्याप्रमाणे शरीरात सोडियमचे प्रमाण जास्त असणे हानिकारक असते, त्याचप्रमाणे कमी प्रमाणात सोडियम देखील हानिकारक असते. बरेच लोक जास्त सोडियम टाळण्यासाठी मिठाचे सेवन कमी करतात, ज्यामुळे शरीरात सोडियमची कमतरता होते. पण जर तुम्ही काळ्या मिठाचे सेवन केले तर ते शरीरात सोडियमची पातळी वाढत नाही आणि शरीरात सामान्य पातळी राहते.