शरीराच्या उत्तम कार्यासाठी इतर अवयवांप्रमाणेच किडन्या स्वच्छ आणि निरोगी असणंही तितकंच महत्वाचं असते. शरीरातील घाण काढण्याव्यतिरिक्त ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवणं, रेड ब्लड सेल्स तयार करणं आणि हाडांनाही ते मजबूत बनवते. (Natural Kidney Cleanse at Home) यामुळे हाय ब्लड प्रेशर, हार्ट डिसिज, सारख्या गंभीर आजारांचा धोका टळतो.
किडन्या निरोगी राहण्यासाठी तब्येतीकडे व्यवस्थित लक्ष देणं महत्वाचं आहे. शरीरातला कचरा काढून शरीर स्वच्छ ठेवण्याचं काम किडन्या करतात. न्युट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी ५ अशा औषधी वनस्पतींबद्दल सांगितले आहे ज्या किडनीचे आजार होण्यापासून वाचवतात. (How to cleanse the kidneys)
1) गिलॉय ही एक औषधी वनस्पती आहे जी किडनीला विषारी पदार्थांपासून वाचवू शकते. खरं तर, गिलॉयमध्ये अल्कलॉइड नावाचा घटक असतो, जो किडनीचे संरक्षण करतो. याशिवाय गिलॉयमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे फ्री रॅडिकल्स नष्ट करून किडनीचे नुकसान होण्यापासून वाचवतात. (What to Know About Kidney Cleanses)
2) हळद प्लाझ्मा प्रथिने सुधारते आणि टाइप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये सीरम युरिया आणि क्रिएटिनिनची पातळी कमी करते. हळदीचे सेवन केल्याने किडनीचे कार्य सुधारते.
3) आले हा एक असा कच्चा मसाला आहे, जो जेवणाची चव तर वाढवतोच पण आरोग्याच्या अनेक समस्यांपासूनही आराम देतो. किडनी निरोगी ठेवण्यासाठी आल्याचे सेवन करावे. त्याच्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे, ते मूत्रपिंडाची सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करते.
4) अमलकी, हरितकी आणि बिभिटकी या तीन आयुर्वेदिक औषधी वनस्पतींपासून बनवलेले त्रिफळा हे किडनीसाठी आश्चर्यकारक औषध आहे. हे मूत्रपिंड मजबूत करते, तसेच प्लाझ्मा प्रोटीन, अल्ब्युमिन आणि क्रिएटिनिनचे उत्पादन सुधारते.
५) सिंहपर्णीच्या देठात आयुर्वेदिक औषधी वनस्पतींमध्ये विविध गुणधर्म आढळतात. ज्यामुळे किडनीची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.