Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Natural Mosquito And Fly Repellent : रात्री डास अजिबात झोपू देत नाहीत? फक्त ४ झाडं लावा; डास, माश्या घरापासून राहतील लांब

Natural Mosquito And Fly Repellent : रात्री डास अजिबात झोपू देत नाहीत? फक्त ४ झाडं लावा; डास, माश्या घरापासून राहतील लांब

Natural Mosquito And Fly Repellent : माश्या आपल्याला त्रास देतात तसंच डास चावल्यामुळे त्वचेवर लालसरपणा, पुरळ उठू लागते आणि त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 05:27 PM2022-05-07T17:27:04+5:302022-05-07T18:10:36+5:30

Natural Mosquito And Fly Repellent : माश्या आपल्याला त्रास देतात तसंच डास चावल्यामुळे त्वचेवर लालसरपणा, पुरळ उठू लागते आणि त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती असते.

Natural Mosquito And Fly Repellent : Mosquitoes and flies repellent plants | Natural Mosquito And Fly Repellent : रात्री डास अजिबात झोपू देत नाहीत? फक्त ४ झाडं लावा; डास, माश्या घरापासून राहतील लांब

Natural Mosquito And Fly Repellent : रात्री डास अजिबात झोपू देत नाहीत? फक्त ४ झाडं लावा; डास, माश्या घरापासून राहतील लांब

उन्हाळ्यात सकाळी कडक सूर्यप्रकाश आणि रात्री डासांचा हल्ला. हा ऋतू असा आहे की ज्यावेळी प्रत्येकाला माश्या आणि डासांचा त्रास होतो. तुम्ही खोलीच्या बाहेरही बसू शकत नाही, कारण खोलीच्या बाहेर डासांचा हल्ला दुपटीने वाढतो. (Mosquitoes and flies repellent plants) माश्या आपल्याला त्रास देतात तसंच डास चावल्यामुळे त्वचेवर लालसरपणा, पुरळ उठू लागते आणि त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती असते. त्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही अनेक केमिकल युक्त उत्पादनांचा वापर करू शकता, परंतु ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक देखील असू शकतात. (Natural Mosquito And Fly Repellent)

अशा स्थितीत तुम्ही तुमच्या घरात अशी काही रोपे आणू शकता, ज्यामुळे तुमची समस्या कमी होऊ शकते. पण प्रश्न असा आहे की हे फुलं आणि वनस्पतींनी डासांना दूर ठेवणं शक्य आहे का? होय, तुमच्या आजूबाजूला अशी झाडे ठेवून तुम्ही या बग्सना नक्कीच दूर ठेवू शकता. डास आणि माशांना विशिष्ट वनस्पतींमधून निघणारे सुगंध आणि तेल आवडत नाही. अशा वनस्पती डास किंवा त्यांच्या अळ्यांसाठी देखील विषारी असतात. (Home Hacks and Tips)

1) सिट्रोनेला

सिट्रोनेला ही एक नैसर्गिक रीपेलेंट कल्पना आहे जी डासांना दूर करण्यासाठी वापरली जाते. त्याचे तेल पॅटिओ कॅण्डल्समध्ये देखील वापरले जाते, जेणेकरुन तुम्ही बाहेर जेवताना असताना डास तुमच्याभोवती फिरू नयेत. याविषयी आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे या  वनस्पतीचे दुसरे नाव 'ओडोमॉस' आहे.  सिट्रोनेला हे एक तण आहे जे तुम्ही तुमच्या अंगणात लावू शकता. बहुतेक सिट्रोनेला उत्पादने वनस्पतीपासून काढलेल्या सुगंधी तेलापासून बनविली जातात. काही संशोधनात असेही दिसून आले आहे की या तेलाचे दोन तासांत बाष्पीभवन होते, म्हणून त्याचं रोप लावणे हा एक चांगला पर्याय आहे.

2) निलगिरी

हे झाड पानांसाठी आणि त्याच्या तीव्र सुगंधासाठी ओळखले जाते. निलगिरीची पाने आणि तेलाचे अनेक आरोग्य फायदे आहेत. तुम्ही याच्या मदतीने माश्या आणि डासांना सहजपणे घालवू शकता. त्याचा तीव्र वास माश्या आणि इतर कीटकांना प्रतिबंधित करतो. निलगिरीचे वेगवेगळे प्रकार आहेत जे तुम्ही तुमच्या अंगणात लावू शकता. अन्यथा, त्याची पाने गोळा करा आणि डास आणि माश्या दूर करण्यासाठी वापरा.

बजेट एक हजार रुपयांहूनही कमी, आईला गिफ्ट द्या खास ‘पर्सनल’ वस्तू! पाहा एकापेक्षाएक गिफ्ट आयडिया

3) लेमन ग्रास

चहामध्ये लेमन ग्रास पिण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत असतीलच! पण तुम्हाला माहीत आहे का की याच्या मदतीने तुम्ही डासांनाही दूर करू शकता. आणखी एक अद्भुत डास निरोधक म्हणजे लेमनग्रास, ज्याला सायम्बोपोगन सायट्रेटस असेही म्हणतात. फुलामध्ये सिट्रोनेला नावाचा घटक असतो, हे एक नैसर्गिक तेल आहे जे माश्या, डास यांसारख्या इतर कीटकांना दूर करते. लेमन ग्रास औषधी वापरातही प्रभावी ठरतो. लेमनग्रासमध्ये खास सुगंध आहे आणि म्हणूनच ते प्रसाधने आणि विविध सुगंधी उत्पादनांमध्ये देखील वापरले जाते.

4) तमालपत्र

तमालपत्र हे हळू हळू वाढणारे झुडूप आहे. जे तुम्ही  स्वयंपाकासाठी वापरता. माश्या आणि डासांपासून सुटका मिळवण्यासाठीही तमालपत्र फायदेशीर ठरते. त्यामध्ये तीक्ष्ण सुगंध असलेले तेल असते जे आजूबाजूच्या कोणत्याही किटकांपासून मुक्त होण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तुम्ही ते तुमच्या घराभोवती, बागेत, अंगणात किंवा बाहेर लावू शकता. जर तुम्ही आजूबाजूला एखादे रोप लावू शकत नसाल, तर तुम्ही तमालपत्र जाळून भांड्यात  शकता आणि नंतर त्याचा धूर खोलीत पसरवा. यामुळे डासही पळून जातील आणि तुमचा मूडही फ्रेश होईल.
 

Web Title: Natural Mosquito And Fly Repellent : Mosquitoes and flies repellent plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.