सणवार म्हटलं की मसालेदार, तळणीचे, पचायला जड असे गोड पदार्थ जेवणात असतातच. हे पदार्थ खायला आवडतात पण खाल्ल्यानंतर होणारा त्रास सोसवत नाही. छातीत, पोटात आग होणं, पोट फुगणं, अस्वस्थ वाटणं अशा समस्या उद्भवतात. छातीत जळजळ (heart burn) झाली की रात्रीची झोप बिघडते. या दोन्ही गोष्टींचा परिणाम पचनावर होतो. पचन क्रिया मंदावते. पोटातील ॲसिड अन्न नलिकेत आल्यानं छातीत जळजळण्याची समस्या निर्माण होते. ही समस्या दूर करण्यासाठी औषधांपेक्षाही घरगुती उपाय (home remedies on heart burn) केल्यास लवकर आराम पडतो.
Image: Google
1. केळे
केळे खाल्ल्यानं छातीतील जळजळ लगेच कमी होण्यास मदत होते. छातीत-पोटात आग होत असल्यास, पोट फुगल्यास, पोटात गॅसेस झाले आहेत असं वाटल्यास एक केळे खावे. केळे हे नैसर्गिक ॲण्टॅसिड म्हणून ओळखलं जातं. केळामधील जीवनसत्वं पोटाशी निगडित समस्या दूर करतात.
Image: Google
2. बडिशेप
बडिशेप ही मुख शुध्दीसाठी वापरली जाते. मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर बडिशेप अवश्य खावी. यामुळे छातीत जळजळ होत नाही. छातीत जळजळ होत असल्यास बडिशेपाचा चहा करुन प्यावा किंवा थंडं दुधात बडिशेप पावडर मिसळून प्यायल्यास पोटातील आणि छातीतील जळजळीवर लगेच आराम पडतो. मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर बडिशेप चावून खाल्ल्यास पोटात गॅसेस होत नाहीत.
Image: Google
3. आलं
आल्यामध्ये सूज आणि दाहविरोधी, विषाणूविरोधी गुणधर्म आणि ॲण्टिऑक्सिडण्ट्स असतात. हे गुणधर्म छातीत होणारी जळजळ कमी करण्यास फायदेशीर ठरतात. छातीत जळजळ होत असल्यास आल्याचा तुकडा चावून खावा. किंवा आलं पाण्यात उकळून ते पाणी प्यावं. पोटात गुबारा धरल्यास आल्याचं सेवन फायदेशीर ठरतं. आल्याचा चहा प्यायल्यानं ॲसिडिटीचा त्रास कमी होतो.
Image: Google
4. थंड दूध
छातीतील जळजळीवर थंड दूध पिणं हा प्रभावी उपाय आहे. थंड दुधात थोडं मध किंवा मेपल सिरप मिसळून प्यावंं. अर्धा कप किंवा 1 कपा पेक्षा जास्त दूध सेवन करुन नये.
Image: Google
5. कोरफड ज्यूस
कोरफड ज्यूस हे अपचन, आंबट ढेकर, पोट फुगणं, पोटात दुखणं, छातीत जळजळणं या समस्येवर गुणकारी असतं. यासाठी मेडिकलमध्ये मिळणारं कोरफड ज्यूस प्यायलं तरी चालतं. छातीतील जळजळ किंवा पचनाशी निगडित समस्या कमी करण्यासाठी एक बूच कोरफड ज्यूस प्यावं. कोरफड ज्यूस प्यायल्यानं पोटातील वाढलेलं ॲसिड कमी होतं.