Join us   

रोज २ वेळा स्वच्छ घासूनही दातांवर पिवळा थर येतो? ५ उपाय -पांढरेशुभ्र राहतील दात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 2:58 PM

Natural Ways To Whiten Your Teeth : दातांच्या पिवळेपणाला टार्टर असं म्हणतात. तुम्ही जे काही खाता-पिता ज्याचे कण दातांमध्ये आणि हिरड्यांमध्ये अडकतात.

दातांच्या पिवळेपणामुळे सेल्फ कॉन्फिडेंस कमी होऊ शकतो. कारण आपण जेव्हाही हसतो, बोलतो तेव्हा दात दिसून येतात. (How to Get Rid of Yellow Teeth)  दात पिवळे होण्याची अनेक कारणं असू शकतात जसं की वय वाढणं, चहा-कॉफी जास्त प्रमाणात घेणं, स्मोकींग, दात व्यवस्थित स्वच्छ न करणं, चहा-कॉफी जास्त प्रमाणात घेणं. वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास त्रास वाढू शकते. (How to Whiten Yellow Teeth Naturally)

दातांच्या पिवळेपणाला टार्टर असं म्हणतात. तुम्ही जे काही खाता-पिता ज्याचे कण दातांमध्ये आणि हिरड्यांमध्ये अडकतात. दातांची योग्य काळजी न घेतल्यास हे टार्टर मजबूत होऊन हिरड्यांच्या मुळाशी पोहोचते. ज्यामुळे दात आणि हिरड्या कमजोर होऊ शकतात आणि इन्फेक्शनही होते. (Natural Ways To Whiten Your Teeth)

दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी उपाय

१) कडुलिंबाच्या पानांचा उपयोग जिवाणूरोधी आणि एंटी फंगल गुणांसाठी अनेक वर्षांपासून केला जात आहे. कडुलिंबाची पानं चावल्याने किंवा कडूलिंबाच्या टुथपेस्टने ब्रश केल्यानं तोंडातील बॅक्टेरियाज मरतात आणि प्लाक तयार होत नाहीत. 

२) पेरूच्या पानांचा उपयोग सूजविरोधी आणि रोगाणूविरोधी गुणांसाठी केला जातो. पेरूची पानं माऊथवॉशच्या स्वरूपाच चावल्याने सूज कमी होते आणि तोंडातील बॅक्टेरियाज कमी होण्यासही मदत होते. 

रोज चालता तरी १ इंच ही पोट कमी होत नाही? पाहा चालण्याची योग्य पद्धत, झरझर घटेल वजन

३) पवित्र तुळशीची पानं एंटीसेप्टीक आणि सूज विरोधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात. तुळशीची पानं  माऊथववॉशच्या स्वरूपात चावल्याने तुळशीच्या पानांचा अर्क दातांमध्ये प्लाक तयार होण्यापासून रोखतो. यामुळे तोंडातील बॅक्टेरियाज मारण्यास आणि दात निरोगी ठेवण्यास मदत होते. 

४) पानात एंटी सेप्टीक गुणधर्म असतात. पान चावल्याने त्याचा अर्क दातांमध्ये उतरतो आणि बॅक्टेरिया मरतात. यात निर्माण होणारं प्लाक कमी होऊन दात आणि हिरड्या चांगल्या राहण्यास मदत होते. 

रात्री झोपण्यापूर्वी १ ग्लास दूधात 'हा' पदार्थ घालून प्या; ४ इंच घटेल कंबर-झटपट सपाट होईल पोट

५) दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही राईच्या तेलाची मदत घेऊ शकता. आयुर्वेदानसार पिवळ्या दातांची समस्या दूर करण्यासाठी चमकदार दात मिळवण्यासाठी तुम्ही राईच्या तेलाचा वापर गुणकारी ठरतो. दात चमकवण्यासाठी तसंच तोंडातील बॅक्टेरियाज हटवण्यासाठी तुम्ही राईच्या तेलाचा वापर करू शकता. टुथब्रशच्या मदतीने ३ ते ५ मिनिटं हा उपाय केल्यानं फरक दिसून येईल.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल