Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दात पिवळे, चिकट झालेत? १ चुटकी मिठात 'हा' पदार्थ मिसळून दात घासा, पांढरेशुभ्र दिसतील दात

दात पिवळे, चिकट झालेत? १ चुटकी मिठात 'हा' पदार्थ मिसळून दात घासा, पांढरेशुभ्र दिसतील दात

Natural Ways To Whiten Your Teeth : दातांवर पिवळेपणा किंवा तोंडाला येणारा वास दूर करण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता.  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 03:20 PM2024-02-16T15:20:17+5:302024-02-16T15:31:34+5:30

Natural Ways To Whiten Your Teeth : दातांवर पिवळेपणा किंवा तोंडाला येणारा वास दूर करण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता.  

Natural Ways To Whiten Your Teeth : Natural Ways to Get White Teeth How Remedies for Yellow Teeth | दात पिवळे, चिकट झालेत? १ चुटकी मिठात 'हा' पदार्थ मिसळून दात घासा, पांढरेशुभ्र दिसतील दात

दात पिवळे, चिकट झालेत? १ चुटकी मिठात 'हा' पदार्थ मिसळून दात घासा, पांढरेशुभ्र दिसतील दात

दात पांढरेशभ्र चमकावेत असं सर्वांनाच वाटतं. पण दातांवर पिवळेपणा यायला वेळ लागत नाही. (Health Tips) कितीही स्वच्छ, व्यवस्थित दात घासले तरीही दात पिवळे होतात अशी अनेकांची तक्रार असते. दातांची किड कशी काढून टाकायची हाच मोठा प्रश्न असतो. (Oral Health Tips) दातांवर पिवळेपणा किंवा तोंडाला येणारा वास दूर करण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता.  ज्यामुळे प्लाक निघून जाण्यास मदत होईल. दात आणि हिरड्याही मजबूत राहतील. (Natural Ways to Get White Teeth How Remedies for Yellow Teeth)

प्लेजेंट फॅमिली डेंटिनस्ट्रीच्या रिपोर्टनुसार ऑईल पुलिंग, बेकिंग सोडा-हायड्रोजन पेरोक्साईडने पेस्ट करणं, फळांच्या सालीने दात घासणं यामुळे दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होते. रोज न चुकता दिवसातून दोन वेळा ब्रश करायला हवं.  थंड पेय किंवा कोणतीही गरम वस्तू खाल्ल्यामुळे दात पिवळे होऊ शकतात.

डिटॉक्स करण्यासाठी महागडे उपाय कशाला, १ रुपयाही खर्च न करता करा १ सोपा उपाय-व्हा फ्रेश

ओरल हायजीनकडे वेळीच लक्ष न दिल्यास दातांवर पिवळेपणा येतो. हळूहळू हा पिवळेपणा दात किडण्याचं कारण ठरू शकतो. टार्टरमुळे दातांच्या गंभीर समस्या उद्भवतात. डॉक्टर दिपीका राणा यांनी काही घरगुती उपाय सुचवले आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही पांढरेशुभ्र दात मिळवू शकता. 

दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी २ चिमुटभर मीठ, ५ ते ६ थेंब मोहोरीचे तेल हे साहित्य लागेल.  २ चिमुट मीठात  ५ ते ६ थेंब मोहोरीचे तेल मिसळून लावा, दोन्ही वस्तू व्यवस्थित मिसळा,  यामुळे दात आणि हिरड्या मजबूत राहतात. हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर पाण्याने व्यवस्थित गुळण्या करा. 

२ चिमुटभर मीठ, ५ ते ६ लिंबाचा रस व्यवस्थित मिसळा. हे मिश्रण दातांवर व्यवस्थित लावा,   हे मिश्रण दातांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. नंतर पाण्याने गुळण्या करा. मीठ आणि तेलात असे तत्व असतात. हिरड्या मजबूत करण्यासाठी मदत होईल. मीठ आणि लिंबाचे मिश्रण हिरड्यांना स्ट्राँग बनवते. पिवळ्या दातांच्या समस्या टाळण्यासाठी हा परिणामकारक उपाय आहे. पिवळ्या दातांच्या समस्या टाळण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. 

Web Title: Natural Ways To Whiten Your Teeth : Natural Ways to Get White Teeth How Remedies for Yellow Teeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.