Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > नवरात्र उपवास : रोज न चुकता खा १ काकडी, शुगर कंट्रोलसोबतच हाडांच्या तक्रारींसाठीही सुपरफूड

नवरात्र उपवास : रोज न चुकता खा १ काकडी, शुगर कंट्रोलसोबतच हाडांच्या तक्रारींसाठीही सुपरफूड

Navratri fasting diet tips benefits of cucumber in daily diet : उपवासादरम्यान अॅसिडीटी, पोटाचे विकार नकोत तर खायलाच हवी काकडी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2024 10:21 AM2024-10-04T10:21:20+5:302024-10-04T10:23:39+5:30

Navratri fasting diet tips benefits of cucumber in daily diet : उपवासादरम्यान अॅसिडीटी, पोटाचे विकार नकोत तर खायलाच हवी काकडी...

Navratri fasting diet tips benefits of cucumber in daily diet: Eat 1 cucumber every day without fail, superfood for bone complaints along with sugar control | नवरात्र उपवास : रोज न चुकता खा १ काकडी, शुगर कंट्रोलसोबतच हाडांच्या तक्रारींसाठीही सुपरफूड

नवरात्र उपवास : रोज न चुकता खा १ काकडी, शुगर कंट्रोलसोबतच हाडांच्या तक्रारींसाठीही सुपरफूड

पोळी भाजी सोबत आपण आवर्जून सॅलेडचा समावेश करतो. यामध्ये बीट, गाजर, टोमॅटो, कांदा यासोबतच काकडीही खाल्ली जाते. तोंडी लावण्यासाठी काकडीचे काप किंवा काकडीची कोशिंबीर केली जाते. पण हीच काकडी आपल्या आरोग्यासाठी सुपरफूड असते हे आपल्यातील अनेकांना माहित नसते. काकडीमध्ये ९५ टक्के पाणी असल्याने शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांत तर आवर्जून काकडी खायला सांगितले जाते. सध्या घरोघरी नवरात्रीचे घट बसले असून अनेक जण ९ दिवसांचे उपवासही करतात (Navratri fasting diet tips benefits of cucumber in daily diet). 

ऑक्टोबर म्हणजे कडक उन्हाळा असल्याने या काळात उपवासाचा त्रास होऊ नये तर आपला आहार चांगला असायला हवा. म्हणूनच या उपवासादरम्यान काकडी, ताक, सरबत यांसारख्या शरीराला एनर्जी देणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश हवा. काकडी आरोग्यासाठी चांगली हे ठिक आहे पण याच काकडीला सुपरफूड म्हणण्याची कारणे कोणती आणि काकडीचे शरीराला काय फायदे होतात याविषयी समजून घेऊया..

१. शरीरातील ओलावा टिकण्यासाठी

काकडीमध्ये ९५ टक्के पाणी असते. हवा कोरडी आणि उष्ण असेल तर शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी आपण जास्तीत जास्त पाणी आणि द्रव पदार्थ घेतो. त्यासोबतच काकडीचा आहारात समावेश केल्यास शरीरातील पाण्याची पातळी चांगली राखण्यास मदत होते. अन्नातील पोषक घटक शरीरभर वाहून नेण्यासाठी, शरीरातील अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकण्यासाठी आणि शरीराचे तापमान चांगले राखण्यासाठी काकडी खाणे फायदेशीर ठरते.

२. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त 

काकडीमध्ये कॅलरीजचे प्रमाण अतिशय कमी असते. तसेच पाणी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी काकडीचा चांगला उपयोग होतो. दिवसभरात आपण भरपूर प्रमाणात काकडी खाल्ली तरी चालते. काकडीमुळे पोट भरलेले राहत असल्याने सतत आणि प्रमाणापेक्षा जास्त भूक लागत नाही. त्यामुळे जास्तीच्या खाण्यावर नियंत्रण येते आणि वजन आटोक्यात राहते. 

३. पचनक्रिया सुरळीत होते

काकडीमध्ये असणारे फायबर पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करते. काकडीच्या सालामध्येही चांगल्या प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास उद्भवत नाही. काकडीतील पाण्याच्या जास्त प्रमाणामुळेही पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते.

४. अँटीऑक्सिडंटसचा उत्तम स्त्रोत

काकडीमध्ये फ्लेवोनाइडस, टॅनिन आणि बेटा केरोटीन यासारखे अँटीऑक्सिडंटस असतात. यामुळे शरीरातील हृदयरोग, कर्करोग, कमी वयात वृद्धत्त्वाच्या समस्या यांसारख्या समस्यांवर नैसर्गिकपणे उपाययोजना होतात. नियमितपणे काकडी खाल्ल्यास पेशी सुरक्षित राहतात आणि आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. 

५. हृदयरोगाची भिती कमी 

काकडीमध्ये पोटॅशियम, खनिजे मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. शरीरातील सोडीयमची पातळी चांगली राखण्यास पोटॅशियमचा उपयोग होतो, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. हायपरटेन्शन, हृदयाचे कार्य यांसारख्या क्रिया सुरळीत चालण्यासाठी काकडी खाल्ल्याचा फायदा होतो. 

६. साखर नियंत्रणात राहते 

काकडीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास काकडी खाणे फायदेशीर ठरते. इन्शुलिन रेझिस्ट करण्यासाठीही काकडीमध्ये आवश्यक घटक असतात. त्यामुळे ज्यांना मधुमेह आहे अशांनी नियमित काकडी खावी.

७. त्वचा आणि हाडांसाठी फायदेशीर 

काकडीत व्हिटॅमिन के असते, ज्यामुळे हाडांसाठी उपयुक्त असणारा कॅल्शियम शरारीत शोषला जाण्यास मदत होते. तसेच काकडीत पाण्याचे प्रमाण आणि खनिजे जास्त असल्याने त्वचा चमकदार राहण्यास त्याचा चांगला फायदा होतो. 
 

Web Title: Navratri fasting diet tips benefits of cucumber in daily diet: Eat 1 cucumber every day without fail, superfood for bone complaints along with sugar control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.