Join us   

उपवास करत असाल तर या ५ चुका करू नका, तब्येत सुधारण्याऐवजी बिघडेल, पडाल आजारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2023 12:17 PM

Navratri Fasting Rules and Food: What to eat and what not to eat : नवरात्रीचे उपवास करताना बरेच लोक आजारी पडतात, याचे कारण म्हणजे उपवासात अशा चुका करणे ज्याने आपल्या शरीराला हानी पोहोचू शकते...

नवरात्रीचा सण सगळीकडे अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे. हा सण साजरा करण्यासोबतच काहींचे नवरात्रीचे उपवास देखील असतात. नवरात्री दरम्यान उपवास करणाऱ्यांची संख्या अधिक असते. नवरात्रीत श्रद्धेने केल्या जाणाऱ्या या उपवासाचे काही फायदे व तोटे देखील आहेत. तज्ज्ञांच्या मते, उपवास केल्याने आपले शरीर डिटॉक्स होते. काही दिवस कमी खाल्ल्याने किंवा सात्विक अन्न खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात आणि शरीर स्वच्छ होते. यामुळे यकृत आणि किडनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. उपवास केल्याने (What are the things we should not do when fasting?) रक्तातील साखरेची पातळी, उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या समस्यांचा धोका कमी होतो. परंतु हे उपवास करताना योग्य ती काळजी देखील घेतली पाहिजे. वेळीच योग्य ती काळजी न घेतल्यास शरीरावर याचे वाईट परिणाम दिसून येतात(What are the mistakes people make during fasting?).

 उपवासा दरम्यान जर आपण निष्काळजीपणा केल्यास आपली प्रकृती सुधारण्याऐवजी (The five common mistakes people make when fasting) बिघडू शकते. उपवासा दरम्यान नेमकी आहाराची व आरोग्याची कोणती काळजी घ्यावी हे आपल्याला माहित नसते. त्यामुळे आपण काही लहान चुका करतो, ज्याने आपली तब्येत बिघडू शकते. असे होऊ नये म्हणून नवरात्री दरम्यान नेमकी कोणती काळजी घ्यावी हे समजून घेऊयात. दिल्लीच्या होली फॅमिली हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ  सनाह गिल यांनी उपवासा दरम्यान आपली काळजी कशी घ्यावी याबद्दल काही टिप्स दिल्या आहेत(Shardiya Navratri Fast 2023: What to Eat and Avoid for a Healthy and Fulfilling Fast)

उपवास करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी ? 

१. फलआहार करताना जास्त गोड किंवा साखरेचे प्रमाण अधिक असलेली फळं खाणे टाळा. 

उपवासा दरम्यान फलआहार करताना काहीवेळी आपण खूप गोड पदार्थ किंवा फळं खातो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. त्यामुळे उपवासादरम्यान गोड पदार्थ आणि साखरेचे प्रमाण जास्त असलेली फळं खाणे टाळा. अशी अनेक फळे आहेत ज्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. जसे केळी, अननस, चिकू आणि चेरी इ. त्याऐवजी आपण पेर, संत्री आणि पपई यांसारखी फळं खाऊ शकता.

नवरात्रीच्या उपवासादरम्यान असे करा डाएट, नऊ दिवसात कणभरही वजन वाढणार नाही...

 नवरात्रीच्या उपवासापूर्वी करा ५ गोष्टी, उपवास करूनही नऊ दिवसात व्हाल फिट अँड फाईन...

२. उपवास करताना योग्य प्रमाणांत पाणी न पिणे, यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो. 

उपवास करताना जास्तीत जास्त द्रव पदार्थ पिण्याला प्राधान्य द्यावे. लिक्विड पदार्थ जास्त घेतल्याने डिहायड्रेशनची समस्या टाळता येते. पाण्यासोबतच ग्रीन टी, ताक, भाज्यांचा रस, शहाळाचे पाणी आणि ताज्या फळांच्या रसाचा रोजच्या आहारात समावेश करावा. जर तुम्ही उपवासात पुरेसे पाणी प्यायले नाही तर तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो. यामुळे उपवासा दरम्यान योग्य त्या प्रमाणात पाणी पिऊन आपले शरीर हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करावा. 

३. उपवासा दरम्यान खूप जास्त प्रमाणात झोप घेणे. 

काहीजण उपवास करतात आणि दिवसभर विश्रांती घेतात. या सवयीमुळे उपवासा दरम्यान आपली तब्येतही बिघडू शकते. जर तुम्ही रिकाम्या पोटी झोपत असाल तर झोपेतून उठल्यानंतर तुम्हाला डोकेदुखी आणि तणाव जाणवेल. त्यामुळे उपवासा दरम्यान स्वतःला व्यस्त ठेवा आणि जास्त विश्रांती घेणे टाळा. 

नवरात्रात उपवास करताना थकवा आला, गळाल्यासारखं झालं तर खा ५ पदार्थ, मिळेल इन्स्टंट एनर्जी...

४. उपवास केला असताना जास्त वेळ उन्हांत फिरु नका. 

जर आपण उपवास करत असाल तर पुरेशी विश्रांती घेणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. बहुतेक लोकांना दीर्घकाळ उपवास करण्याची सवय नसते. अशा परिस्थितीत जेव्हा ते अचानक उपवास करतात तेव्हा त्यांची तब्येत बिघडते, म्हणून तुम्ही उपवासाच्या वेळी जास्त शारीरिक श्रम करणे टाळावे आणि उपवासा दरम्यान जास्त वेळ उन्हात जाणे टाळावे. यामुळे आपल्याला डिहायड्रेशन होऊन शरीरांतील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे तब्येतीला त्रास होऊ शकतो. 

उपवास करताना तब्येत बिघडू नये म्हणून कोणते मीठ खावे ? तज्ज्ञ सांगतात, मीठ खाणार असाल तर...

५. उपवास सोडताना अचानक अधिक प्रमाणात एकाच वेळी खाणे. 

उपवास सोडताना जास्त प्रमाणात अन्न खाणे शक्यतो टाळावे. उपवासानंतर जास्त खाल्ल्याने बद्धकोष्ठता किंवा अ‍ॅसिडिटी होऊ शकते. जर तुम्ही उपवासानंतर अचानक जास्त खाल्ले तर तुमच्या पचनावर ताण पडेल आणि तुम्ही आजारी पडू शकता.

टॅग्स : शारदीय नवरात्रोत्सव 2023नवरात्रीआरोग्यहेल्थ टिप्सफिटनेस टिप्स