Join us   

नवरात्र : उपवासाने पित्ताचा त्रास होतो? खा 'हे' पारंपरिक सूपरफूड, मिळेल भरपूर पोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2024 3:17 PM

Navratri Special healthy diet tips fasting Varai rice Bhagar : वरईचे कोणकोणते पदार्थ करता येतात आणि त्याचे आरोग्यासाठी नेमके काय फायदे होतात याविषयी...

नवरात्र म्हटलं की देवीचे भक्त ९ दिवसांचे उपवास करतात. काही जण हे उपवास खूप कडक म्हणजे काहीच न खाता-पिताही करतात. पण काही जण मात्र थोडं कमी खाऊन, तोंडावर नियंत्रण ठेवून उपवास करतात. सुरुवातीला उपवासाचे काही वाटत नाही पण २-३ दिवस होतात तसं डोकं जड व्हायला लागतं आणि पित्ताचा त्रास सुरू होतो. उपवासाच्या पदार्थांमध्ये साधारणपणे साबुदाणा, बटाटा, दाणे, तळलेले पदार्थ यांचा समावेश असल्याने पित्त होण्याची शक्यता असते. पण हे पदार्थ न खाता किंवा योग्य त्या प्रमाणात खाऊन योग्य तो आहार घेतला तर उपवासाचा त्रास होत नाही (Navratri Special healthy diet tips fasting Varai rice Bhagar). 

९ दिवस सलग उपवास करायचे म्हणजे वेगवेगळे काय करणार किंवा खाणार असा प्रश्न अनेकांना पडतो. पण वरई म्हणजेच ज्याची आपण भगर करतो ती नवरात्रात खाल्ली तर पोटही भरते आणि शरीराला त्याचे बरेच फायदेही होतात. भगरीचे विविध प्रकारही करता येत असल्याने दिवसभराच्या किंवा एक दिवसआडच्या आहारात आपण वरईचा नक्कीच समावेश करु शकतो. वरईचे कोणकोणते पदार्थ करता येतात आणि त्याचे आरोग्यासाठी नेमके काय फायदे होतात पाहूया...

वरईचे पदार्थ

(Image : Google)

१. भगर-आमटी

२. भगर / उपमा

३. थालिपीठ

४. वडे 

५. डोसे 

वरई खाण्याचे फायदे

१. वरईचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने ती मधुमेही रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर ठरते. 

२. वरईमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे पटकन पोट भरते. त्यामुळे लठ्ठपणाची समस्या असेल तर वजन वाढू नये यासाठी वरई खाणे फायदेशीर ठरते. 

३. भगर पचायला हलकी असल्याने पचनाच्या समस्या उद्भवत नाहीत, तसेच पचनाच्या समस्या असतील तर त्या दूर होण्यास मदत होते. 

(Image : Google)

४. वरई ही कॅल्शियम, प्रोटीन्स याचा उत्तम स्त्रोत मानली जाते. त्यामध्ये थोडासा दाण्याचा कूट, आमसूल किंवा ताक घातले तर त्याची पौष्टीकता आणखी वाढते. 

५. लोहाचे प्रमाण वरईमध्ये जास्त असल्याने अॅनिमिया असलेल्या व्यक्तींनी आवर्जून भगर खावी. महिला वर्गामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते, त्यामुळे त्यांना भगर खाण्याचा नक्कीच फायदा होतो. 

६. भगरीमध्ये अँटीऑक्सिडंटस तसेच व्हिटॅमिन ए, सी आणि इ असतात त्यामुळे शरीराचे पोषण होण्यास मदत होते तसेच दिर्घकाळ एनर्जी टिकून राहण्यास ती खाणे फायदेशीर असते. 

७. भगरीसोबत भरपूर तूप किंवा ताक घ्यावे म्हणजे रुक्षपणा किंवा वाताचा त्रास उद्भवत नाही. 

टॅग्स : शारदीय नवरात्रोत्सव २०२४अन्नहेल्थ टिप्सआहार योजनाआरोग्य