Join us   

नवरात्र स्पेशल : २० रूपयांत मिळणारे ५ केशरी पदार्थ-रोज खा; म्हातारपणातही हाडं राहतील चांगली, फिट राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 9:46 AM

Navtari Special Orange Colour : यातील पोषक तत्व शरीराच्या विकासासाठी आणि रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी फायदेशीर ठरतात.

नवरात्र उत्सवाला (Navratri 2023) सुरूवात  झाली आहे. सण-उत्सवांचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी शरीराची आणि खाण्या-पिण्याची काळजी घेणं फार महत्वाचं असतं. आपल्या रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास आपण गंभीर आजारांचा धोका टाळू शकतो. (Orange Colour) नारंगी रंगाचे पदार्थ आरोग्यासाठी गुणकारी ठरतात.

यातील पोषक तत्व शरीराच्या विकासासाठी आणि रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी फायदेशीर ठरतात.  हे पदार्थ खाण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करावा लागेल असे अजिबात नाही. कमीत कमी खर्चात तुम्ही आहारात या पदार्थांचा समावेश करू शकता. (Eat This Orange Colour Food for Good Health)

१) पपई

सकाळची सुरूवात हेल्दी होण्यासाठी नाश्त्यामध्ये पपईचा समावेश करा. यामुळे  शरीराला पोषक तत्व मिळतात. याशिवाय पूर्ण दिवस एर्नेजेटीक वाटतं. पपई फायबर्स आणि प्रोटीन्सचा भांडार आहे.  यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. व्हिटामीन सी युक्त पपई अनेक आजारांपासून शरीराला वाचवते यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. 

२) संत्री

संत्र्याचा आहारात समावेश केल्याने  आजार दूर होण्यास मदत होते. संत्र्यात व्हिटामीन सी असल्यामुळे फाईन लाईन्स,  सुरकुत्या दूर होण्यासही मदत होते. रोज एक संत्री खाल्ल्याने केस दाट आणि चमकदार होण्यास मदत होईल. यातील पाचक एंजाईम्स पचनक्रिया चांगली ठेवतात. 

३) गाजर

नियमित  स्वरूपात गाजर खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते. गाजर खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते. यात व्हिटामीन E असते ज्यामुळे बीपी रेग्युलेट करण्यास मदत होते. 

हॉटेलसारखे कुरकुरीत साबुदाणा वडे घरीच करा; साबुदाण्यात १ पदार्थ घाला-कमी तेलात होतील वडे

४) मसूर डाळ

कपभर मसूर डाळीत जवळपास  २३० कॅलरीज असतात. जवळपास १५ ग्राम डाएटीर फायबर्स आणि जवळपास  १७ ग्राम प्रोटीन्स असतात. आयर्न आणि प्रोटीन्सनी परिपूर्ण डाळी व्हेजिटेरियन लोकांसाठी एक उत्तम पर्याय आहेत.  चव आणि आहारात बदल म्हणून प्रत्येकाने स्वयंपाकात मसूर डाळीचा समावेश करावा. 

दही वडे कडक होतात? सॉफ्ट, हलके दही वडे करण्याची सोपी रेसिपी-तोंडात टाकताच विरघळतील

५) भोपळा

भोपळ्यात भरपूर फायबर्स असतात.  याच्या बीयांमध्ये असे गुण असतात ते पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करतात. याशिवाय गॅस, एसिडिटीपासूनही बचाव होतो. 

टॅग्स : नवरात्रीअन्नहेल्थ टिप्सआरोग्यनवरात्री गरबा २०२३