Blood Cleaning : शरीरातील रक्त अशुद्ध झाल्यावर वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. आपण जे काही खातो किंवा पितो ते रक्तात मिक्स होतं. अशात जेव्हा आपण जे काही अनहेल्दी खातो त्याचेही कण रक्तात मिक्स होतात. ते साफ करण्याचं किंवा बाहेर काढण्याचं काम किडनी आणि लिव्हर करत असतं.
मात्र, अनेकदा रक्तात इतके जास्त विषारी तत्व असतात की, लिव्हर किंवा किडनीही ते बाहेर काढू शकत नाही. ते रक्तात वाढू लागतात आणि शरीराला आतून नुकसान पोहोचवत असतात. अशात हे विषारी तत्व बाहेर काढण्यासाठी किडनी आणि लिव्हरवर जास्त दबाव पडत असल्यानं हे अवयवही डॅमेज होण्याचा धोका असतो.
अशात डॉक्टर सलीम जैदी यांनी रक्त शुद्ध करण्यासाठी एक नॅचरल उपाय सांगितला आहे. डॉक्टरांनुसार, या उपायानं २ मिनिटात चार पट वेगानं रक्त शुद्ध करण्यास मदत मिळते. यासाठी तुम्हाला कडूलिंबाच्या पानांचा योग्य वापर करावा लागेल.
रक्तात टॉक्सिन वाढण्याची कारणं
डॉक्टर सलीम जैदी यांनी सांगितलं की, प्रदूषण किंवा अनहेल्दी लाइफस्टाईलमुळे रक्तात टॉक्सिन जमा होतात. हे विषारी तत्व लिव्हर आणि किडनीवर दबाव टाकतात. ज्यामुळे शरीरात आळस आणि कमजोरी जाणवते.
नॅचरल ब्लड क्लीनर कडूलिंब
कडूलिंबाची पानं हे नॅचरल डिटॉक्सिफायर असतात. कडूलिंबाची पानं किंवा त्याचं रक्त शुद्ध करण्यासाठी एक बेस्ट पर्याय आहे. कडूलिंबात अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. यानं रक्त शुद्ध होण्यासोबतच त्वचेवर ग्लो येतो आणि इम्यून सिस्टीमही मजबूत होतं. कडूलिंबाच्या पानांची पेस्टही तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता.
कसा कराल वापर?
रोज सकाळी उपाशीपोटी ३ ते ४ कडूलिंबाची पाने चावून खावीत. त्याशिवाय ५ ते ७ पानं पाण्यात उकडून घ्या. हलकं कोमट पाणी गाळून पिऊ शकता. कोणत्याही केमिकल्सच्या वापराशिवाय तुम्ही याप्रमाणे रक्त शुद्ध करू शकता.