दातांचा विचार सौंदर्य आणि आरोग्य या दोन्ही बाजुंनी केला तर दात निरोगी राहातात. दात निरोगी असतील तर जेवण करताना अन्न नीट चावलं जातं, त्यामुळे पचन सुधारतं. पण दात जर किडलेले असतील तर ही क्रिया नीट होत नाही आणि दातही दुखत राहातात. केवळ टूथपेस्ट वापरुन किडलेल्या दातांची समस्या सुटत नाही आणि दातही निरोगी होत नाही यासाठी टूथपेस्टच्या पलिकडे जावून उपाय करायला हवा. नैसर्गिक घटकांचा वापर करत घरगुती मंजन तयार करुन ते वापरल्यास केवळ किडलेल्या दातांची समस्या सुटते असं नाही तर दात निरोगी होऊन दातांशी निगडित अनेक समस्या सहज दूर होतात. किडलेल्या दातांवर उपचार म्हणून आणि निरोगी दातांसाठी उपाय म्हणून कडुनिंबच्या पानांचा उपयोग करुन परिणामककारक घरगुती मंजन तयार करता येतं.
घरच्याघरी मंजन तयार करण्यासाठी
दातांसाठी घरगुती मंजन करण्यासाठी 2 चमचे आवळा पावडर, 1 चमचा कडुनिंबाची पावडर, छोटा अर्धा चमचा दालचिनी पावडर, छोटा अर्धा चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा भाजलेल्या लवंगांची पूड आणि छोटा अर्धा चमचा मीठ घ्यावं.
मंजन तयार करण्यासाठी कडुनिंबाची पानं वाळवून त्याची पूड करुन घ्यावी. एका मोठ्या भांड्यात कडुनिंबाची पावडर घ्यावी. त्यात आवळा पावडर, दालचिनी पावडर, लवंगाची पूड,बेकिंग सोडा आणि मीठ घालावं. सर्व साहित्य नीट मिसळून घ्यावं. तयार मंजन एका बाटलीत भरुन ठेवावं. जशी गरज असेल तसं हे मंजन वापरावं.
Image: Google
कडुनिंबाचं हे घरगुती मंजन वापरतना आधी हात स्वच्छ धुवून घ्यावेत. हातावर मंजन घेऊन बोटानं ते दातांवर आणि हिरड्यांवर व्यवस्थित घासावं. किडलेल्या दातांसोबतच जर पिवळ्या दातांची समस्या असल्यास दात स्वच्छ होण्यासाठी टूथब्रशनं ही पावडर दातांवर घासावी.
Image: Google
कडुनिंबाचं मंजन वापरल्यास
1. कडुनिंबात आयसोटीन आणि सोर्बिटाॅल हे दोन घटक असतात. यामुळे दातांचा पिवळेपणा दूर होतो. कडुनिंबामुळे हिरड्यातून रक्त येण्याची समस्या दूर होते. दातांसोबतच हिरड्याही मजबूत होतात.
2. कडुनिंबात ॲण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाण भरपूर असतं. म्हणूनच दातांसाठी कडुनिंब वापरल्यानं दात निरोगी होतात. कडुनिंबातील ॲण्टिऑक्सिडण्टस मुक्त मुलकांशी ( फ्री रॅडिकल्स) लढतात आणि दातांची समस्यांपासून सुरक्षा करतात.
3. दात किडलेले असल्यास तोंडाचा वास येण्याची समस्याही असते. तोंडाचा वास येण्याची समस्या कडुनिंबाच्या मंजनाचा वापर केल्यानं दूर होते. कडुनिंबामुळे दात मजबूत होतात आणि दातांचं किडीपासून संरक्षण होतं.