Join us   

रात्री झोपेत पायात क्रॅम्प्स येतात-झोप मोड होते? ५ उपाय, पायात गोळे येणं होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 12:38 PM

Night Leg Cramps Solution : जर तुमच्या पायांमध्ये क्रॅम्पस येत असतील तर अंगठे पकडून स्ट्रेच करा. मांड्यांमध्ये क्रॅम्प असल्यास उभं राहून पोश्चर स्ट्रेच करा.

रात्रीच्यावेळी पायांमध्ये मसल्स कॉन्ट्रॅक्शनमुळे काही सेकंदासाठी काल्फ, फूट आणि मांड्यांमध्ये वेदना जाणवतात.  यामुळे तुमची रात्रीची झोप बिघडू शकते. दिवसभराच्या कामाने थकल्यानंतर रात्री झोपताना काही सेकंद काही क्रॅम्पस तसेच राहतात आणि रिलॅक्स  होतात.  अनेकदा जास्तवेळ मसल्स कॉन्ट्रॅक्शन  राहते. (Night Leg Cramps Solution)

क्लीव्हरलँड क्लिनिकच्या रिपोर्टनुसार मज्जातंतू स्त्राव सामान्यतः पायांच्या स्नायूंना खराब रक्त प्रवाह, तणाव किंवा जास्त तीव्रतेच्या व्यायामामुळे होतो. प्रदीर्घ डेस्क जॉब, स्नायूंवर तणाव येणं, काँक्रीटच्या फरशीवर चालणे, खराब मुद्रा, किडनी निकामी होणे, मधुमेही मज्जातंतूंचे नुकसान, खनिजांची कमतरता, रक्तप्रवाहाच्या समस्या यामुळे रात्री क्रॅम्प्स येतात.

१) जर तुमच्या पायांमध्ये क्रॅम्पस येत असतील तर अंगठे पकडून स्ट्रेच करा. मांड्यांमध्ये क्रॅम्प असल्यास उभं राहून पोश्चर स्ट्रेच करा. मसल्समध्ये क्रॅम्प आल्यास  लगेच हात किंवा मसाजरच्या मदतीनं ती जागा दाबा आणि स्नायूंची मसाज करा.  

२) उभं राहून तळवे जमिनीवर जोरात दाबा, गरम पाण्यानं शेका किंवा गरम पाण्यात पाय बुडवून ठेवा. तुम्ही गरम पाण्यानं अंघोळही करू शकता.  

३) एका टॉवेलमध्ये आईस पॅक ठेवा आणि मसल्सभोवती रॅप करून काही मिनिटं शेक घ्या. या उपायानं तुम्हाला लवकरात लवकर आराम मिळेल.

४) व्हिटामीन बी- १२ कॉम्प्लेक्स किंवा मॅग्नेशियम सप्लिमेंट्सचे सेवन करा. रात्री झोपण्याआधी वॉक करा.  हलका व्यायाम तुम्ही करू शकता. 

५) रोज ८ ग्लास पाणी प्या. कॅफेन आणि अल्कोहोलचे सेवन करू नका. जर अनेकदा प्रयत्न करूनही क्रॅम्प जात नसतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

स्ट्रेचिंग व्यायम करा

स्ट्रेचिंग व्यायाम तुमच्यासाठी सर्वात प्रभावी ठरतील. पाय ताणल्यामुळे स्नायूही ताणले जातील आणि रक्ताभिसरण चांगले होईल. यासाठी तुम्ही बेडवर झोपून तुमचे पाय भिंतीच्या साहाय्याने स्ट्रेच करू शकता. याशिवाय घरी हलके व्यायाम करणे देखील फायदेशीर ठरेल.

पायाला सूज किंवा तीव्र वेदना होत असल्यास मिठाच्या पाण्याच्या कॉम्प्रेसने त्यातून लवकर आराम मिळेल. अर्धी बादली पाणी गरम करा. आता त्यात ५ ते ६ चमचे रॉक मीठ टाका. पाणी थोडे थंड झाल्यावर त्यात पाय भिजवा. या पद्धतीमुळे थकवा कमी होण्यासोबतच पाय दुखणे आणि सूज यांपासून लवकर आराम मिळेल.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य